मुरैना (मध्य प्रदेश) - आरपीएफ स्टेशन प्रभारी मीना आपल्या कर्मचाऱ्यांसह रेल्वे स्टेशन परिसरात गस्त घालत होता. त्यावेळी त्याला एक तरुण त्रस्त अवस्थेत उभा असल्याचे दिसले. चौकशी केली असता त्याने आपले नाव रामभजन योगी रा. मोटुका राजस्थान असल्याचे सांगितले. त्याने सांगितले की, त्याचा भाऊ भुरा योगी महाराष्ट्रात मजूर म्हणून काम करतो. तीन जणं त्याचे अपहरण करून झेलम एक्स्प्रेसने घेऊन जात आहेत. (kidnappers of laborer from Maharashtra).
Breaking News : महाराष्ट्रातून मजूराचे अपहरण करणाऱ्यांना मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांनी पकडले - महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज
21:29 November 21
महाराष्ट्रातून मजूराचे अपहरण करणाऱ्यांना मध्य प्रदेश रेल्वे पोलिसांनी पकडले
20:25 November 21
बांद्रा टर्मिनसच्या तिकीट खिडकीजवळ कचऱ्याला आग
मुंबई - बांद्रा रेल्वे टर्मिनसच्या तिकीट खिडकी जवळ असलेल्या कचऱ्याला आज सायंकाळी आग लागली. या आगीवर मुंबई अग्नीशमन दलाने २० मिनिटात नियंत्रण मिळवले आहे. या आगीत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
19:30 November 21
संजय राऊत प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती कर्णिक यांच्या बेंचसमोर
मुंबई - शिवसेना नेते संजय राऊत यांच्या विरोधातील ईडीने याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या बेंचसमोर सुनावणी होणार होती. मात्र 25 नोव्हेंबरला न्यायमूर्ती एम. एस. कर्णिक यांच्या बेंचसमोर सुनावणी होणार आहे. अंतर्गत विभागीय कामकाजाच्या सोईनुसार ही सुनावणी कर्णिक यांच्यापुढे होईल.
18:48 November 21
पोलीस निरीक्षकांच्या नावाने दीड लाखांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक
सोलापूर - पोलीस निरीक्षकांच्या नावाने दीड लाखांची लाच मागणाऱ्या दोघांना अटक. एसीबीने ही कारवाई केली आहे. सोलापुरातील मांडवली बादशहा अशी या दोघांची ओळख होती. पोलीस निरीक्षक देखील एसीबीच्या रडारवर होते.
18:20 November 21
दारू पिऊन झोपणाऱ्या शिक्षकाला जाब विचारणाऱ्या सरपंचाला मारली थोबाडीत
पालघर - धामणगाव शाळेमधील शिक्षक दारू पिऊन झोपत होते म्हणून सरपंच जाब विचारायला गेले असता सरपंचाला शिवीगाळ करून सरपंचाच्या थोबाडीत मारले. त्यामुळे तलासरी पोलीस स्टेशनला गुन्हा नोंदणीसाठी सरपंच व कार्यकर्ते गेले आहेत. शिक्षकाच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात येत आहे.
18:14 November 21
राज्यपालांच्या डोक्यावरील काळी टोपी आणणाऱ्यास ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखांकडून लाखाचे बक्षीस जाहीर
बीड: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याविरुद्ध राज्यातभरात पडसाद उमटत आहेत. बीडमध्ये ठाकरे गटाने राष्ट्रीय महामार्ग रोखून राज्यपालांच्या प्रतिमेला जोडो मारून निषेध आंदोलन केले. यावेळी एक घोषणाही करण्यात आली. जो कोणी राज्यपालांच्या डोक्यावरील काळी टोपी घेऊन येईल त्याला एक लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल अशी घोषणा ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी केली.
18:01 November 21
अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश
मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो-मुंबई (NCB) ने अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. त्यांच्याकडून 2.80 किलो कोकेन जप्त केले आहे. याप्रकरणी दोन परदेशी नागरिकांनाही अटक करण्यात आली आहे.
17:34 November 21
लग्नापूर्वी मुलाने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून मारहाण
औरंगाबाद - लव्ह जिहाद प्रकरणात अनेक मुस्लिम मुलांनी हिंदू मुलींना लग्नासाठी मुस्लिम बनवले असे आरोप प्रत्यारोप आपण पाहिले. मात्र औरंगाबादेत एक वेगळेच प्रकरण पुढे आले आहे. यात, मुस्लिम मुलीचे एका हिंदू मुलासोबत प्रेम संबंध होते. त्यातून लग्नापूर्वी मुलाने मुस्लिम धर्म स्वीकारला नाही म्हणून मारहाण करण्यात आली. कुटुंबाचा छळ केल्याचा आरोपही होत आहे. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे.
17:16 November 21
दोन तोतया पत्रकारांना खंडणी प्रकरणी भाईंदर पोलिसांनी केली अटक
ठाणे - घर दुरुस्तीचे काम करणाऱ्या एका व्यक्तीला पत्रकार असल्याचे सांगून वीस हजाराची खंडणी मागणाऱ्या दोन तोतया पत्रकारांना भाईंदर पोलिसांनी रंगेहात हात अटक केली आहे. याप्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात सदर आरोपी अरविंद राजभर राहुल सिंग यांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
16:49 November 21
लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार, सनदी अधिकाऱ्यांसह मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनाही जाब विचारता येणार
मुंबई - ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केलेल्या मागणीनुसार लोकायुक्त कायद्याचा मसुदा तयार झाला आहे. मुख्यमंत्री, मंत्री, सनदी अधिकाऱ्यांचा या लोकायुक्त कायद्यात समावेश केला जाणार आहे. येत्या हिवाळी अधिवेशनात हा मसुदा विधिमंडळात मांडला जाण्याची शक्यता आहे.
16:42 November 21
सोलापुरात प्रतिकात्मक राज्यपालांची गाढवावरून धिंड
सोलापूर - प्रतिकात्मक राज्यपालांची गाढवावरून धिंड काढत प्रहारने निषेध केला. शिवाजी महाराजांचे मावळे असतील तर राजभवनासमोर जमा व्हा, असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी मोठ्या प्रमाणावर राज्यपालांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
16:18 November 21
भाजपने आदिवासींची जमीन 2-3 उद्योगपतींच्या घशात घातली - राहुल गांधी
सुरत (गुजरात) - आदिवासी हे भारताचे पहिले मालक आहेत पण भाजप त्यांना 'वनवासी' म्हणतो. ज्यांची जमीन भाजपने हिसकावून 2-3 उद्योगपतींना दिली आहे. आदिवासींनी शहरात राहावे, शिक्षण, आरोग्य आणि रोजगार मिळावा, अशी त्यांची इच्छा नाही, असा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. ते प्रचाराच्या सभेत बोलत होते.
15:52 November 21
राज्यपालांच्या विरोधात आंदोलन, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात
मुंबई - राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विरोधात वादग्रस्त विधान केले आहे. यामुळे अनेक राजकीय पक्ष आणि संघटना संतप्त झाल्या आहेत. राज्यपालांचा ते निषेध करत आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
15:40 November 21
राजस्थान - एका घरामध्ये पती, पत्नी आणि 4 मुले आढळली मृतावस्थेत
उदयपूर - एका घरामध्ये पती, पत्नी आणि 4 मुले मृतावस्थेत आढळून आली आहेत. श्वान पथक आणि फिरत्या तपास पथकाला घटनास्थळी पाचारण केले आहे. मृत्यूचे कारण स्पष्ट करण्यासाठी पुरावे देखील गोळा केले जात आहेत, असे पोलिसांनी सांगितले. महिलेच्या डोक्यावर जखम आढळली आहे, असेही कुंदन कावरिया, एएसपी ग्रामीण, उदयपूर यांनी सांगितले.
14:30 November 21
मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प - गोदरेजच्या हरकतीवर आजच उत्तर दाखल करण्याचे राज्य सरकारला निर्देश
मुंबई - मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. बुलेट ट्रेन विरोधात गोदरेज अँड बॉईस कंपनीच्या वतीने याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर राज्य सरकारने आज कोर्टात उत्तर दाखल करण्याकरता वाढीव वेळ मागितला. मात्र न्यायालयाने वेळ वाढवून देण्यास नकार देत आजच उत्तर दाखल करण्याचे राज्य सरकारला निर्देश दिले. राज्य सरकारविरोधात, गोदरेजतर्फे मुंबई हायकोर्टात दाखल याचिकेवर 5 डिसेंबरपासून सलग सुनावणी होणार आहे. विक्रोळीतील 10 हेक्टर जमिनीचे भूसंपादन रखडले असून गोदरेज कंपनीची ही जमीनहस्तांतरणास विरोध आहे. भूसंपादन मोबदला म्हणून राज्य सरकार देत असलेली 264 कोटींची नुकसानभरपाई, गोदरेजला अमान्य आहे. दुसरीकडे गोदरेजच्या आडमुठ्या भूमिकेमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 1 हजार कोटींचा बोजा पडत असल्याचा दावा सरकारने केला आहे.
14:25 November 21
राष्ट्रपतींनी राज्यपाल कोश्यारी यांना समज द्यावी किंवा महाराष्ट्राबाहेर बदली करावी - महेश तपासे
मुंबई - राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्याने राज्याचे सामाजिक समीकरण बिघडत आहे. त्यांची तात्काळ महाराष्ट्राबाहेर बदली करावी किंवा समज द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पत्राद्वारे केली आहे.
14:11 November 21
इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपात किमान 20 लोकांचा मृत्यू
जकार्ता - इंडोनेशियाच्या जावा बेटावर झालेल्या भूकंपात सुमारे 20 लोकांचा मृत्यू झाला असून किमान 300 लोक जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात हलवण्यात येत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
13:41 November 21
श्रद्धा हत्या - दिल्ली पोलीस पॉलीग्राफ चाचणीसाठी परवानगीच्या प्रतीक्षेत
नवी दिल्ली - श्रद्धा खून प्रकरणी दिल्ली पोलिस आणि आमच्या संचालकांनी या प्रकरणावर जलद कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. आम्ही नार्को चाचणी घेण्यापूर्वी महत्त्वाच्या असलेल्या काही बाबींवर काम करत आहोत, असे न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचे सहाय्यक संचालक डॉ. संजीव गुप्ता यांनी आफताबच्या नार्को चाचणीवर बोलताना स्पष्ट केले. त्याचबरोबर नार्को चाचणीपूर्वी पॉलीग्राफ चाचणी करणे आवश्यक आहे ज्यासाठी संमती आवश्यक आहे. न्यायालयाने नार्को चाचणीला परवानगी दिली आहे आणि पॉलीग्राफ चाचणीसाठी आम्ही अद्याप परवानगीच्या प्रतीक्षेत आहोत. एकदा आम्हाला परवानगी मिळाल्यावर, बाकी सर्व काही 10 दिवसांत केले जाईल असे फॉरेन्सिक सायकोलॉजी विभागाचे प्रमुख पी पुरी यांनी स्पष्ट केले.
13:27 November 21
उरला सुरला शिल्लक राहिलेला पक्ष वाचवण्यासाठी ठाकरेंचे प्रयत्न - उपाध्ये
मुंबई - उद्धव ठाकरे म्हणाले, लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र यायला हवे. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत कार्यक्रम होता. उद्धव ठाकरे यांनी केलेला हा मोठा विनोद आहे, असं मत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मांडले आहे. उरला सुरला शिल्लक राहिलेला पक्ष वाचवण्यासाठी प्रयत्न ठाकरे करत आहेत, असे ते म्हणाले. बाळासाहेबांच्या नावाशिवाय ते काहीच करत नाहीत. पक्ष वाचवण्याची केविलवाणी धडपड सुरू आहे. दहशत माजवण्याचा प्रयत्न केला त्या संभाजी बिग्रेड सोबत युती, नक्षलवादींसोबतही ते जात आहेत. काँग्रेस समोर त्यांनी गुडघे टेकले, सत्तेसाठी स्वाभिमान सोडून दिला, अशी टीकाही उपाध्ये यांनी केली. लोकशाही वाचवण्याच्या गप्पा मारतात. स्वतःच्या पक्षात लोकशाही आहे का ते आधी पाहा? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. बाळासाहेबांची पुण्याई आणि भाजपच्या साथेमुळे सत्तेपर्यंत पोहचले होते, असा टोलाही त्यांनी लगावला.
12:24 November 21
राज्यपालांविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गिरगावात आंदोलन
मुंबई - राज्यपाल भगतसिंग कौश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने गिरगाव येथे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिवसेना विभाग प्रमुखांसह इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
12:20 November 21
शिवसेनेकडून क्रांतीचौक भागात आंदोलन
औरंगाबाद - शिवसेनेकडून क्रांतीचौक भागात आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी खैरे यांच्यासह घोसाळकर उपस्थितीत आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात येत आहे.
12:17 November 21
मुदिगेरेचे भाजपचे नेते कुमारस्वामी यांचे कपडे हुल्लेमाने गावातील स्थानिकांनी फाडले
चिक्कमगलुरु - हत्तीच्या हल्ल्यात एका महिलेचा मृत्यू झाल्यानंतर मुदिगेरेचे भाजपचे नेते कुमारस्वामी यांचे कपडे हुल्लेमाने गावातील स्थानिकांनी फाडल्याचा आरोप आहे. आमदार हत्तींच्या हल्ल्याला योग्य प्रतिसाद देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
12:11 November 21
भयंकर गुन्हे करणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावीच लागेल - सुप्रिया सुळे
पुणे : भयंकर गुन्हे करणाऱ्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि मोठी किंमत चुकवावीच लागेल. महाराष्ट्राच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. मी केंद्र आणि राज्य सरकारांना विनंती केली आहे की श्रद्धाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालला पाहिजे. जेणेकरून भारतातील महिलांना योग्य न्याय मिळू शकेल, असे मत श्रद्धा खून प्रकरणावर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.
12:06 November 21
लाइव्ह जिहाद एक जुमलाच - अशोक गेहलोत
नवी दिल्ली - काही दुर्दैवी घटना घडत आहेत. त्याला एक नाव देण्यात आले आहे आणि 'जुमला' केले आहे. आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाह बऱ्याच काळापासून होत आहेत. पण ज्या पद्धतीने एका समाजाला लक्ष्य केले जात आहे, त्यावरून राजकारण केले जात आहे. 'लाइव्ह जिहाद'वर राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हे स्पष्ट मत व्यक्त केले आहे.
12:02 November 21
श्रद्धा खून प्रकरणी आतापर्यंत 11 जणांचे जबाब
पालघर - श्रद्धा खून प्रकरणी आतापर्यंत वसई, पालघर जिल्ह्यातील दिल्ली पोलिसांच्या पथकाने 11 जणांचे जबाब नोंदवले आहेत.
11:45 November 21
नवले अपघातप्रकरणी गुन्हा दाखल, चालक फरार
पुणे : नवले अपघातप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनीलाल यादव चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक हा मध्य प्रदेशचा आहे. काल रात्री झालेल्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आहे. सिंहगड रोड पोलीस ठाण्यात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चालक फरार असून चालकाचा शोध सुरू आहे.
11:24 November 21
रुळावरून मालगाडी घसरल्याने अपघात, मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
आज सकाळी मालगाडी रुळावरून घसरून झालेल्या प्रवाशांच्या मृत्यूबद्दल रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शोक व्यक्त केला. मंत्र्यांनी पीडितांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. गंभीर जखमींना 2 लाख रुपये, किरकोळ जखमींना 25 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.
11:18 November 21
श्रद्धा खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करावा, वकिलाची दिल्ली उच्च न्यायालयात याचिका
श्रद्धा खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात एका वकिलाने केली आहे.
10:09 November 21
मालगाडी रुळावरून घसरल्याने 2 जणांचा मृत्यू
ईस्ट कोस्ट रेल्वे अंतर्गत कोराई स्टेशनवर आज पहाटे मालगाडी रुळावरून घसरल्याने 2 जणांचा मृत्यू झाला. दोन्ही रेल्वे मार्ग ठप्प झाले. रेल्वे स्थानकाच्या इमारतीचेही नुकसान झाले. बचावकार्य सुरू आहे.
09:31 November 21
अरुण गोयल यांनी भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून स्वीकारला पदभार
अरुण गोयल यांनी भारताचे नवे निवडणूक आयुक्त म्हणून आज पदभार स्वीकारला.
09:30 November 21
दिल्ली-एनसीआरमध्ये मदर डेअरीचे दूध महागले!
मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये आजपासून फुल-क्रीम दुधाची किंमत 63 रुपये प्रति लिटरवरून 64 रुपये प्रति लिटर आणि टोकन दुधाची किंमत 48 रुपये प्रति लिटरवरून 50 रुपये केली आहे.
08:46 November 21
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाचे लोकार्पण
हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांच्या स्मारकाचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. मंत्रालय समोरील हुतात्मा राजगुरू चौकात हे स्मारक उभारण्यात आले आहे. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधान सभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आदी यावेळी उपस्थित होते.
07:59 November 21
वैशाली येथे अपघात झालेल्या मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत-नितीश कुमार यांची घोषणा
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी वैशाली येथील रस्ता अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या कुटुंबांप्रती तीव्र शोक व्यक्त केला आहे. मुख्यमंत्र्यांनी नातेवाईकांना प्रत्येकी 5 लाख रुपये सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा केली. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
06:48 November 21
भरधाव ट्रकने चिरडले, ८ जणांचा मृत्यू
बिहारमधील वैशाली येथे रस्ता अपघात झाला आहे. येथे भरधाव ट्रकने अनेक मुलांना चिरडले. या अपघातात आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आहे.
06:34 November 21
पंतप्रधान मोदींनी अचानक भाजप कार्यालयाला दिली भेट
पंतप्रधान मोदींनी अचानक भाजप कार्यालयाला भेट देत भाजप कार्यकर्त्यांना आश्चर्यचकित केले. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी गप्पा मारत पक्षकार्याच्या जुन्या आठवणी सांगितल्या आहेत.
06:06 November 21
Maharashtra Breaking News रुळावरून मालगाडी घसरल्याने अपघात, मृताच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर
मुंबई: पुण्यातील नवले ब्रिज येथे आज रात्री टँकरच्या धडकेने झालेल्या अपघातात अनेक वाहने दुर्घटनाग्रस्त झाली. या अपघाताची माहिती कळताच तो नक्की कुणाच्या निष्काळजीपणामुळे झाला ते शोधण्याचे तात्काळ निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.