मुंबई : मालाडच्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीला भीषण आग लागली आहे.
Breaking News : मालाडच्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीला भीषण आग - आदित्य ठाकरे प्रत्युत्तर
21:11 March 13
मालाडच्या आनंद नगर भागातील झोपडपट्टीला भीषण आग

19:53 March 13
सरकारी कर्मचाऱ्यांना संपावर न जाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन, मागण्यांवर विचार करण्यासाठी अधिकाऱ्यांची समिती स्थापन
मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारी कर्मचार्यांच्या संघटनांनी मंगळवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमिवर मागणांकडे लक्ष देण्यासाठी समिती स्थापन केली आहे. जुन्या पेन्शन संदर्भात काय करता येईल याचा अहवाल ही समिती देईल, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी सरकारी कर्मचार्यांनी संप करु नये असे आवाहन केले आहे.
19:41 March 13
अपघात रोखण्यासाठी समृद्धी महामार्गावर 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम'चा वापर करणार - फडणवीस
मुंबई - समृद्धी महामार्गावरील अपघात थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महामार्गावरही 'इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम'चा वापर करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले..
19:32 March 13
ठाण्यात राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या 4 कार्यकर्त्याना तडीपारीच्या नोटीसा
ठाणे - पोलिसांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्याना तडीपारीच्या नोटीसा बजावल्या आहेत. हेमंत वाणी, अभिजित पवार, विक्रम खामकर, विशाल गायकवाड या चार जणांच्या विरोधात सराईत गुन्हेगार म्हणून ठाणे पोलिसांनी वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद केली आहे. चारही जणांना 20 मार्च 2023 पर्यंत जबाब नोंदवण्यासाठी ठाणे पोलिसांनी वेळ दिला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि ठाकरे गट यांच्यावर शिवसेना पक्षाकडून अनेक गुन्हे ठाणे पोलिसात दाखल होत आहेत.
19:28 March 13
अनिल परब यांची दापोली रिसॉर्टप्रकरणी ईडीचा खटला रद्द करण्यासाठी हायकोर्टात धाव
मुंबई - माजी मंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते अनिल परब यांनी आज मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांनी दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दाखल केलेला मनी लॉन्ड्रिंगचा खटला रद्द करण्याची मागणी कोर्टात याचिकेद्नवारे केली.
19:21 March 13
इंग्लंडची एचएसबीसी विकत घेणार सिलिकॉन व्हॅली बँक
लंडन : यूके ट्रेझरी आणि बँक ऑफ इंग्लंडने सिलिकॉन व्हॅली बँक यूकेची एचएसबीसीला विक्री करण्याची सोय केली आहे. त्यांनी बँकेती 6.7 अब्ज पौंड (USD 8.1 अब्ज) ठेवींची सुरक्षा सुनिश्चित केली आहे. ब्रिटीश अधिकाऱ्यांनी आठवड्याच्या शेवटी खरेदीदार शोधण्यासाठी काम केले. गेल्या आठवड्यात याबाबत प्रयत्न यशस्वी झाले नाहीत, मात्र आता याला यश आले आहे.
19:03 March 13
बाबुळगाव येथील नगरपंचायत नगरसेवकाची हत्या
यवतमाळ - बाबुळगाव येथील नगरपंचायत नगरसेवकाची हत्या. बाबूळगाव शहर कडकडीत बंद.
18:55 March 13
एकनाथ शिंदे यांच्यावर माझा पूर्ण विश्वास - भूषण देसाई
मुंबई - शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर भूषण देसाई यांनी सांगितले की, बाळासाहेब हेच माझे दैवत आहे. बाळासाहेब आणि शिवसेना हे दोन सोडून माझ्या डोळ्यासमोर काही आलेले नाही. बाळासाहेबांचे विचार पुढे कोण घेऊन जात असेल तर ते एकनाथ शिंदे आहेत. यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. त्यांच्या कामाचा वेग त्यांची क्षमता त्यांचे निर्णय आणि सर्वसामान्य जनतेला कामाचा अनुभव मिळतो आणि त्यामुळे त्यांच्या पाठीशी उभा राहण्याचा मी निर्णय घेतला आहे. माझ्या प्रत्यक्ष अप्रत्यक्ष जे काम होते ते मी करत होतो. त्यांचे काम बघून प्रेरित होऊन मी शिवसेनेत आलो आहे. मी हा निर्णय यापूर्वीच घेतला होता, जेव्हा हा सरकार स्थापन झाले होते. निवडणूक किंवा कोणत्याही पदासाठी मी आलेलो नाही, पण जबाबदारी मिळेल ती पार पाडेन असे त्यांनी स्पष्ट केले.
18:49 March 13
भूषण देसाई यांना मुख्यमंत्र्यांच्या शुभेच्छा, मुंबईत काम करताना त्यांना प्रोत्साहन देणार
मुंबई - भूषण देसाई या यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक मुद्दे मांडले, ते म्हणाले की, विधान परिषदेच्या अधिवेशन सुरू आहे. बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार स्थापन झाले आहे. त्यांचे विचार पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे. मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते विविध पक्षातले शिवसेनेमध्ये दाखल होत आहेत. राज्यातून हजारो लोकांचा पाठिंबा मिळत आहे. बाळासाहेबांच्या सोबत ज्यांनी काम केले ते आमच्यासोबत आले. पक्षप्रवेशाची प्रक्रिया निरंतर सुरू आहे. सर्वसामान्य लोकांच्या हिताचे प्रतिबिंब अर्थसंकल्पात रेखाटले आहे. राज्याचा विकास करणारा निर्णय आम्ही घेतला. सहा महिन्यात मुंबईचे रुप बदलत आहे. मुंबईत अनेक वर्षांची सत्ता होती त्यांना हे करता आलेले नाही. लोकांमध्ये भावना निर्माण झाली आहे की हे काम करणारे सरकार आहे. बाळासाहेबांचे विचार आणि सरकारचे काम लक्षात घेऊन भूषण देसाई यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांचे मनापासून अभिनंदन करतो. शुभेच्छा देतो जो काय विकास डोळ्यासमोर ठेवून प्रकल्प काम आणि भूमिका त्यांना मुंबईत काम करायचे असेल त्यांना न्याय द्यायचे काम आम्ही करू, एवढाच विश्वास व्यक्त करतो.
18:18 March 13
उद्धव ठाकरे गटाचे नेते भूषण देसाई यांचा शिवसेनेत प्रवेश
मुंबई - उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना नेते भूषण देसाई यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्ष प्रवेश केला आहे. त्यांचे पक्षात स्वागत आहे, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. वडील सुभाष देसाई हे ठाकरे गटामध्ये आहेत. त्याबद्दल विचारले असता. त्यांचे आणि आपले विचार वेगळे असल्याचे भूषण यांनी यावेळी स्पष्ट केले.
17:09 March 13
मुंबई-गोवा महामार्ग पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर ८४ किमी रस्त्याचे काम युध्दपातळीवर पूर्ण करावे - मंत्री रविंद्र चव्हाण
मुंबई - मुंबई-गोवा महामार्गावरील पनवेल ते कासु व कासु ते इंदापूर या ८४ किमीच्या रस्त्याच्या रखडलेल्या कॉक्रीटीकरणाचे काम युध्दपातळीवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज दिले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे हेच या सरकारचे उद्दीष्ट आहे. महामार्गाचे काम १० पॅकेजेसमध्ये सध्या सुरू आहे. त्यापैकी ५ पॅकेजेसचे काम पूर्ण झाले असून उर्वरित पॅकेजेसचे काम प्रगतीपथावर आहे.
16:53 March 13
अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांची बहीण मधु मार्कंडेय यांचा संशयास्पद मृत्यू
पुणे - प्रसिद्ध मराठी अभिनेत्री भाग्यश्री मोटे यांची बहीण मधु मार्कंडेय यांचा मृत्यू झाला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये त्यांचा मृत्यू झाला. मृतदेहावर जखमेच्या खुणा असल्याने पोलीस अधिक चौकशी करत आहेत. वाकडमध्ये त्यांचा केक तयार करण्याचा भागिदारीत व्यवसाय होता.
16:48 March 13
समलिंगी विवाह प्रकरणी सुप्रीम कोर्टात 18 मार्चला घटनापीठापुढे सुनावणी
नवी दिल्ली - समलिंगी विवाह प्रकरणी सर्वोच्च न्यायालय पुढील सुनावणीसाठी 18 एप्रिल रोजी करणार आहे. सुप्रीम कोर्टाने समलिंगी विवाहाच्या मुद्द्याला कायदेशीर मान्यता देण्यासंदर्भातील याचिका घटनापीठासमोर मांडण्याचे निर्देश दिले आहेत.
16:34 March 13
राहुल गांधींनी माफी मागावी असे काहीही केले नाही - शशी थरूर
नवी दिल्ली - यूकेमध्ये राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर सत्ताधारी भाजपने सडकून टीका केली आहे. त्यावर काँग्रेस खासदार शशी थरूर त्यांच्या समर्थनार्थ बोलले. त्यांनी सांगितले की लोकांची माफी मागण्याची गरज नाही. संसदेच्या आवारात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना थरूर म्हणाले, भाजपचे हे निंदनीय प्रकारचे राजकारण आहे. कारण राहुल गांधींनी त्यांच्यावर काय आरोप केले आहेत ते सांगितले नाही. त्यांनी स्पष्ट केले की 'आम्ही अंतर्गत समस्या सोडवू आणि प्रत्येकाने जागरूक राहावे, अशी इच्छा आहे. लोकशाही ही जागतिक सार्वजनिक हिताची गोष्ट आहे. त्यासाठी त्यांनी माफी मागावी असे काहीही नाही.
15:44 March 13
सरकारी, निमसरकारी, शिक्षक, आरोग्य, पालिका सर्व विभागातील १८ लाख कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर
मुंबई - सरकारी, निमसरकारी, शिक्षक, आरोग्य, पालिका सर्व विभागातील १८ लाख कर्मचारी उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत. मुख्य सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत त्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. बैठकीत कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे हे सर्व कर्मचारी संपावर जाणार आहेत.
सरकार जुन्या पेंशन बाबत उदासीन
- सुकाणू समितीची विधानभवनात तातडीची बैठक,
उद्या पासून बैठकीत बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय
सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्राचे निमंत्रक
विश्वास काटकर यांची पत्रकार परिषदेत माहिती
15:31 March 13
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरुद्ध अजामीनपात्र अटक वॉरंट जारी
कराची - इस्लामाबादमधील जिल्हा व सत्र न्यायालयाने सोमवारी पीटीआयचे अध्यक्ष पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यासाठी अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले. पाकिस्तानी माध्यमात हे वृत्त आले आहे.
15:25 March 13
अल्पवयीन मुलीचे अपहरण आणि बलात्कार प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
मुंबई - एका अल्पवयीन मुलीवर 2 मार्च रोजी पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास ती औषध घेण्यासाठी जात असताना तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. तिचे 2 आरोपींनी अपहरण करून पालघर जिल्ह्यातील विरार येथे नेऊन तिच्यावर बलात्कार केला. वांद्रे पोलिसांनी 2 आरोपींना या प्रकरणी अटक केली आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली. आरोपीने या घटनेचा व्हिडिओ बनवला आणि तिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली.दोघांविरुद्ध भादंवि कलम ३७६(२)(एन), ३६६(ए), ३२८, ५०६,३२३,३४ आणि पोक्सो कलम ४,८,१२ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला
15:16 March 13
वीज दरवाढ होणार हे अटळ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई - वीज दरवाढ अटळ आहे मात्र ती भरमसाठ नाही असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले. सदतीस टक्के वीज दरवाढ होणार नाही तर अकरा टक्के दरवाढ होणार. कोळसा दर दुप्पट झाले आहेत त्यामुळे महावितरण अडचणीत आहे. काहीतरी वीज दरवाढ होणारच आहे. पण ती जास्त होऊ नये यासाठी सरकार वीज नियामक आयोगाकडे विनंती करीत आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
15:03 March 13
हे सरकार फक्त गद्दार स्वतःचा विचार करणारे - आदित्य ठाकरे
मुंबई - आ. आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. या सरकारला शेतकऱ्यांबद्दलच काय तर कोणासाठीही काही पडलेले नाही. हे सरकार फक्त गद्दार व स्वतःचा विचार करत आहे.
14:55 March 13
मुंबईत आजही उन्हाचा तडाखा, मार्चमध्ये दुसऱ्यांदा झाली देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद
मुंबई - मुंबईत मार्चमध्येच कडाक्याचा उन्हाळा जाणवत आहे. काल जवळजवळ 40 डिग्रीवर मुंबईचे तापमान गेले होते. आजही मुंबईत उष्णतेची लाट दिसून येईल. त्यामुळे तापमानाचा पारा चढताच राहणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
14:48 March 13
विद्यार्थ्यांना अश्लील व्हिडिओ दाखवणाऱ्या शिक्षकाला अटक
गोंदिया - जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील 52 वर्षीय शिक्षकाला त्याच्या वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आज ही माहिती दिली. तक्रारीच्या आधारे, कलम 354 (महिलेचा विनयभंग करण्याच्या हेतूने तिच्यावर हल्ला करणे किंवा फौजदारी बळजबरी करणे) आणि भारतीय दंड संहिता आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्याच्या इतर संबंधित तरतुदींनुसार गुन्हा नोंदवण्यात आला.
14:40 March 13
पतीला रजा नाकारल्याने पत्नीचे अनोखे आंदोलन, एसटी आगार प्रमुखांच्या केबीनबाहेर झोपून निषेध
सांगली - नवऱ्याला रजा मिळत नसल्याने एका बायकोने अनोखे आंदोलन केले. तिने सांगलीच्या आटपाडी येथील एसटी आजारामध्ये ठिय्या आंदोलन केले आहे. आगार प्रमुखाच्या केबिन बाहेरच अंथरून टाकत झोपून तिने आंदोलन केले. या आंदोलनाची आटपाडीमध्ये जोरदार चर्चा रंगली होती.
14:26 March 13
राहुल गांधींच्या भाषणावरुन संसदेत गदारोळ, दोन्ही सदनाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब
नवी दिल्ली - काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या लंडनमधील भाषणावरून झालेल्या गदारोळामुळे राज्यसभेचे कामकाज उद्यापर्यंत तहकूब करण्यात आले. लोकसभेचे कामकाजही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले.
14:18 March 13
वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी गोंदियातील शिक्षकाला अटक
महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्यातील एका प्राथमिक शाळेतील ५२ वर्षीय शिक्षकाला त्याच्या वर्गातील विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी सोमवारी दिली.
13:54 March 13
रामचंद्र पौडेल यांनी घेतली नेपाळच्या राष्ट्रपती पदाची शपथ
काठमांडू - रामचंद्र पौडेल यांनी काठमांडू येथील राष्ट्रपती भवनात नेपाळचे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली.
13:51 March 13
महालक्ष्मी रेसकोर्स लीज नूतनीकरण प्रकरणावर सुनावणी करण्यापासून मुंबई उच्च न्यायालयाने महामानवाधिकार आयोगाला रोखले
मुंबई उच्च न्यायालयाने महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाला (एमएसएचआरसी) मध्य मुंबईतील 220 एकरच्या महालक्ष्मी रेसकोर्सच्या लीज नूतनीकरणाशी संबंधित प्रकरणावर सुनावणी करण्यापासून रोखले आहे.
13:50 March 13
चालू महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईत सलग कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सियसची नोंद
चालू महिन्यात दुसऱ्यांदा रविवारी मुंबईत देशातील सर्वाधिक कमाल तापमान ३९.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. आयएमडीने रविवार आणि सोमवार उष्णतेची लाट येण्याचा इशारा दिला होता.
13:00 March 13
जुनी पेन्शन योजना पुर्ववत सुरू करण्यासाठी बीडमध्ये लक्ष्यवेधी टरबूज आंदोलन
बीड - राज्यातील शासकीय, निमशासकीय, कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यात यावी. या प्रमुख मागणीसह शासन तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी आमदारांचे निवृत्तीवेतन बंद करण्यात यावे. तसेच 14 मार्चपासून पुकारलेला बेमुदत संप मोडून काढण्यासाठी सरकारने अत्यावश्यक सेवा परीरक्षण (मेस्मा) कायदा लागू करण्यासाठी या कायद्याचे विधेयक घाईघाईत मांडण्याच्या सरकारच्या धोरणाचा निषेध. त्याचबरोबर बेमुदत संपाला पाठिंबा देण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्य डाॅ. गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्ष्यवेधी टरबूज आंदोलन करण्यात आले.
12:55 March 13
साडेआठ महिन्यात १२ हजार कोटी रुपये अनुदान सरकारने शेतकऱ्यांना दिले - शंभूराज देसाई
मुंबई - मुख्यमंत्र्यांनी सर्वात जास्त प्रती क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केले आहे. ज्या पद्धतीने कांदा खरेदी होईल त्या पद्धतीने अनुदान दिले जाईल, अशी माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कांद्याला सरासरी भाव १० रुपये भाव मिळाला आहे. म्हणून शेतकऱ्याला या ३०० रुपये अनुदानाचा फायदा झाला आहे. साडेआठ महिन्यात १२ हजार कोटी रुपये या सरकारने शेतकऱ्यांना दिले आहेत. शिंदे-फडणवीस सरकार ने आतापर्यंत सर्वात जास्त अनुदान शेतकऱ्यांना दिले आहे, असेही देसाई यांनी सांगितले.
12:50 March 13
विरोधकांचे सरकारच्या विरोधात गाजर हलवा आंदोलन
मुंबई - अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या आठवड्याच्या पहिल्या दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुन्हा आक्रमक पवित्र घेतला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर सरकार विरोधात घोषणाबाजी केली. हातात गाजर घेऊन सरकार केवळ गाजर हलवा अशा घोषणा दिल्या. सरकारच्या हातात गाजर कृतीमध्ये मात्र शून्य आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करा या घोषणांनी विधानभवनाच्या परिसर दणाणून सोडला होता.
12:31 March 13
भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र
लंडन - वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 साठी ओव्हल येथे ऑस्ट्रेलियाशी सामना करण्यासाठी भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलसाठी पात्र ठरला आहे.
12:19 March 13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदेंचे नाव?
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधान परिषद गटनेतेपदी एकनाथ शिंदेंचे नाव देण्यात आले आहे. यावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जयंत पाटील यांनी खिल्ली उडवली आहे. विधान परिषदेच्या उपसभापतींकडून या प्रकारचे पत्र दिले गेले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे सर्वपक्षीय नेते झाले आहेत का, अशी विचारणार राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी सभागृहात केली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या जयंत पाटील यांना हे पत्र दिले. एवढेच नाही तर हे पत्र वेबसाईटवरही टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.
12:11 March 13
गोवंडी परिसरातील क्षय रोगामुळे दगावलेल्यांबाबत अहवाल सादर करणार - मुख्यमंत्री
मुंबई - गोवंडी शिवाजीनगर परिसरातील क्षय रोगामुळे दगावलेल्या व्यक्तींबाबत आठवडाभरात अहवाल सादर करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत दिली. आमदार अबू आजमी यांनी यासंदर्भात मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. हा अतिशय गंभीर प्रश्न असून यासंदर्भात सरकारने निवेदन करावे असे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निर्दश दिले.
12:02 March 13
मोदींच्या नेतृत्वात कायदा आणि लोकशाहीचे अस्तित्व संपुष्टात - खरगे
नवी दिल्ली - मोदींच्या नेतृत्वात कायदा आणि लोकशाही अस्तित्वातच नाही. ते हुकूमशाहीप्रमाणे देश चालवत आहेत. दुसरीकडे ते लोकशाहीबद्दल बोलतात, अशी टीका राज्यसभेतील विरोधीपक्ष नेते आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी संसदेत केली.
11:55 March 13
वाळू बाबतीतले धोरण अधिवेशन संपण्यापूर्वी आणणार - विखे पाटील
मुंबई - राज्यसरकार वाळू बाबतीतले धोरण अधिवेशन संपण्यापूर्वी आणणार आहे. खडी क्रशर तसेच शासकीय योजनांसाठी लागणारी वाळू याबाबतही तरतूद करण्यात येणार आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तरात तासामध्ये ही माहिती दिली.
11:43 March 13
मुंबईतील जोगेश्वरी भागात भीषण आग
मुंबईतील जोगेश्वरी भागातील राम मंदिराजवळील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली. अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. या घटनेत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही
11:42 March 13
ठाणे जिल्हा न्यायालयाने 16 जणांना अटकपूर्व जामीन नाकारला
ठाणे जिल्हा न्यायालयाने खुनाचा प्रयत्न आणि शस्त्रास्त्र कायद्याच्या आरोपाखाली अटक केलेल्या एक व्यक्ती आणि त्याच्या दोन मुलांसह 16 जणांना अटकपूर्व जामीन नाकारला आहे. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश अमित शेटे यांनी नमूद केले की, अर्जदारांना जामिनाचा कोणताही अधिकार नाही.
11:37 March 13
राहुल गांधींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा - गिरीराज सिंह
नवी दिल्ली - लंडनमध्ये राहुल गांधी म्हणाले की, खासदारांना संसदेत बोलू दिले जात नाही. हा लोकसभेचा अपमान आहे. या वक्तव्यावर सभागृह अध्यक्षांनी त्यांच्यावर कारवाई करावी. आमच्या लोकशाहीचा अपमान केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणी केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी केली आहे.
11:23 March 13
राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित
राज्यसभेचे कामकाज २ वाजेपर्यंत स्थगित झाले आहे. राहुल गांधी यांनी देशात बोलण्याची परवानगी नसल्याचे लंडनमध्ये वक्तव्य केले होते. त्यावर सत्ताधारी नेत्यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे.
11:23 March 13
मॉर्फ व्हिडिओमागे विधानसभेत गदारोळ, कामकाज १० मिनिटासाठी तहकूब
मॉर्फ व्हिडिओमागे कोण आहे हे शोधा, अशी मागणी करत आमदार मनिषा चौधरी विधानसभेत आक्रमक झाल्याचे दिसून आले. मॉर्फ व्हिडिओची चौकशी करा, अशी त्यांनी मागणी केली आहे. त्यानंतर
11:09 March 13
शेतकऱ्याला प्रति क्विंटल ३०० रुपये देण्यात येणार-मुख्यमंत्र्यांची घोषणा
शेतकऱ्याला प्रति क्विंटल ३०० रुपये देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात केली आहे.
10:54 March 13
हे शेतकरी विरोधी सरकार आहे-अंबादास दानवे
हे शेतकरी विरोधी सरकार आहे, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदार संघात 3 शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या, अशी टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे.
10:15 March 13
इंडिगोचे विमान कराचीला वळविण्यात आले-एअरलाइन्स अधिकाऱ्यांची माहिती
दोहाला जाणारे इंडिगोचे विमान विमानात वैद्यकीय आणीबाणीमुळे पाकिस्तानच्या कराचीला वळवण्यात आले, असे एअरलाइन्सच्या अधिकाऱ्याने वृत्तसंस्थेला सांगितले.
09:47 March 13
भविष्यात १५ ते २० कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती देणार-संजय राऊत
आम्ही कोणत्याही चौकशीला घाबरत नाही. भविष्यात १५ ते २० कारखान्यातील भ्रष्टाचाराची माहिती देणार आहे. भीमा पाटस कारखान्यातील भ्रष्टाचार हे फडणवीसांसाठी परीक्षा असल्याचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.
08:28 March 13
नाटू नाटू गाण्यासाठी भारताला दुसरा ऑस्कर
नाटू नाटू गाण्यासाठी भारताला दुसरा ऑस्कर मिळाला आहे.
08:03 March 13
जुन्या पेन्शनसाठी 5 लाख शिक्षक देखील संपात उतरणार, परीक्षांवर संपाचे सावट
उद्यापासून जुन्या पेन्शनसाठी 5 लाख शिक्षक देखील संपात उतरणार परीक्षांवर संपाचे सावट आहे. राज्यातील पाच ते सात लाख शिक्षक आणि 14 लाख शासकीय दिन शासकीय कर्मचारी देखील संपावर जाणार आहेत.
07:35 March 13
राहुल कुल यांच्या साखर कारखान्यात ५०० कोटींचे मनी लाँड्रिंग, ईडीकडून कारवाई होण्याची संजय राऊतांची मागणी
दौंडमधील राहुल कुल यांच्या साखर कारखान्यात ५०० कोटींचे मनी लाँड्रिंग झाल्याचा गंभीर आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्याबाबतचे पत्र खासदार राऊत यांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना लिहित प्रकरण ईडी व सीबीआयकडे देण्याची मागणी केली आहे.
07:31 March 13
भारताच्या द एलिफंट व्हिसपर्स डॉक्युमेंटरीला ऑस्कर
भारताच्या द एलिफंट व्हिसपर्स डॉक्युमेंटरीला ऑस्कर मिळाला आहे.
07:29 March 13
शितल म्हात्रे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणात शिवसेना कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यकर्त्याला बेदम मारहाण
शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वे (शिंदे गट) आणि एका शितल म्हात्रे यांचा मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ बनवल्याबद्दल शिवसेना कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ता राजेश गुप्ता यांना बेदम मारहाण केली. त्यांच्या चेहऱ्यावर शाई लावत संताप व्यक्त केला.
07:26 March 13
आरआरआरला मिळणार का ऑस्कर? थोड्याच वेळात जाहीर होणार पुरस्कार
अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथील डॉल्बी स्टुडिओमध्ये 95 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडत आहे. यावेळी भारताला ऑस्करकडून खूप अपेक्षा आहेत. भारतातील 'आरआरआर' चित्रपटातील 'नातू-नातू' या सुपरहिट गाण्याला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याच्या श्रेणीत नामांकन मिळाले आहे. आता संपूर्ण देशाच्या नजरा 'आरआरआर'च्या विजयाकडे लागल्या आहेत. थोड्याच वेळात ऑस्कर पुरस्कार विजेत्यांची नावे जाहीर केली जात आहेत.
07:01 March 13
कृषीमंत्री दादा भुसे यांच्याबरोबरची बोलणी निष्फळ, किसान सभेचा लाँग मार्च विधानभवनावर धडकणार
किसान सभेचा लाँग मार्च विधानभवनाच्या दिशेने जात आहे. कृषीमंत्री दादा भुसे यांच्याबरोबरची बोलणी निष्फळ ठरली आहे. शेतीमालाला हमीभाव देण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे.
06:51 March 13
संत शरण बसवेश्वर यांच्या 201 व्या पुण्यतिथीनिमित्त भाविकांची यात्रेत मोठी गर्दी
18व्या शतकातील विद्वान आणि संत शरण बसवेश्वर यांच्या 201 व्या पुण्यतिथीनिमित्त कलबुर्गी येथील 'शरणाबसवेश्वर जत्रे'मध्ये मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते.
06:21 March 13
Maharashtra Breaking News : जनतेला असले आरोप आवडत नाहीत.. आदित्य ठाकरे यांच्या टीकेला मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर
मुंबई : ‘सीएम’ ( CM) या संक्षिप्त शब्दाचा अर्थ आता ‘भ्रष्टाचारी माणूस’ असा होतो. हे सरकार राज्यघटना बदलणार आहे, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. हे कंत्राटदारांचे सरकार आहे, अशी टीका माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईत केली आहे. या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुंबईतील जनतेला असे आरोप आवडत नाहीत. जनतेला बदल हवा आहे. जनतेला आम्ही करत असलेले चांगले काम हवे आहे. मेट्रोचे काम वेगाने सुरू आहे. गेली 25 वर्षे ते मुंबईत सत्तेत होते, त्यामुळे त्यांनी जे काही केले त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, असा पलटवारदेखील मुख्यमंत्र्यांनी केला आहे.