ETV Bharat / state

आले किती गेले किती? पक्षनिष्ठा म्हणजे काय रं भाऊ..! जिथं सत्ता तिथं जाऊ - पक्षनिष्ठा म्हणजे काय रं भाऊ

लोकसभेच्या निवडणुकीपासून सुरू झालेल्या पक्षांतराच्या उड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील रोज कोणता ना कोणता नेता भाजपच्या गोटात दाखल होत आहे. अनेक मातब्बर, निष्ठावंत म्हणवले जाणारे नेते तर या रांगेत पहिल्या यादीत दिसतील.

जिथं सत्ता तिथं आम्ही
author img

By

Published : Sep 17, 2019, 12:13 PM IST

मुंबई - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. भाजप-शिवसेना जोमात तर काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात असेच चित्र आज घडीला दिसून येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून सुरू झालेल्या पक्षांतराच्या उड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील रोज कोणता ना कोणता नेता भाजपच्या गोटात दाखल होत आहे. अनेक मातब्बर, निष्ठावंत म्हणवले जाणारे नेते तर या रांगेत पहिल्या यादीत दिसतील. भाजपकडून त्यांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. त्यामुळे पक्षनिष्ठा, तत्वनिष्ठा काय असते रं भाऊ? जिथं सत्ता तिथं आम्ही, असेच चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे.

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या मरगळीचे वातावरण असल्याने आघाडीचा भाजपसमोर टीकाव लागण्याची शक्यता फार कमी आहे, हे दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या नेत्यांनी जाणल्याचे दिसतंय. तसेच चौकशींचा ससेमिरा पाठी लागण्यापेक्षा भाजपवासी होणे अनेकजण पसंत करत आहेत.

सत्ता तिथं आम्ही

1) राधाकृष्ण विखे-पाटील :

लोकसभा निवडणुकी वेळीच सर्वात आधी अहमदनगरच्या विखे कुटुंबाने काँग्रेसशी बंड केले. विधानसभेत विरोधी पक्षनेता असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटीलांचा मुलगा डॉ. सूजय विखेंनी भाजपात प्रवेश केला. याची देशभरात चर्चा झाली. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटीलांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि मंत्रिपदही मिळवले. त्यामुळे काँग्रेस बरोबर अनेक वर्षे निष्ठावंत राहिलेले आणि काँग्रेसमध्ये सत्ता भोगलेले हे घराणे भाजपकडे सत्ता असल्याने त्यांच्या मंच्यावर जाऊन बसले.

2) विजयसिंह मोहिते-पाटील :

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपूत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसत्तेचा वापर सामान्य माणसाला मोठे करण्यासाठी झाला पाहिजे, अशी भूमिका घेत त्यांनी पक्षाला रामराम केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. आघाडी सरकारमध्ये या घराण्याने मंत्रिपदासह महत्त्वाची पदे उपभोगली. विजयसिंह मोहिते-पाटील हेतर उपमुख्यमंत्री पदावर होते. मात्र भाजपकडे सत्ता गेल्याने त्यांनीही भाजपाचे कमळ हाती घेण्याचा निर्णय घेतला.

3) मधुकर पिचड :

मुंबईतील गरवारे कल्बमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीतील आमदार, नेते चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक हे देखील भाजपमध्ये दाखल झाले. मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मधुकर पिचड पवारांसोबत राहिले. 35 वर्ष त्यांनी अकोले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना सतत मंत्रिपद मिळाले. विरोधी पक्षनेते म्हणूनही मधुकर पिचड यांनी काम पाहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली आणि ते विजयीही झाले. 35 वर्षांच्या काळात बरीच पदे, मंत्रिपदे मिळाली असताना पवारांची साथ सोडून भाजपला त्यांनीही जवळ केले.

4) पद्मसिंह पाटील :

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीत सिंह यांनी सोलापुरात भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी मोठा धक्का बसला. शरद पवारांचे जवळचे नातेवाईक आणि पवारांचे बोट पकडून राजकारणात आलेले नेते अशी पद्मसिंह पाटील यांची ओळख होती. त्यांनी मंत्रिपदासह महत्त्वाची पदे भूषवली. 1978 ते 2009 - विधानसभा आमदार, 1978 ते 1980 - उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री, 1986 ते 1988 - उपसभापती, विधानसभा, 1995 ते 1999 - विरोधी पक्ष उपनेता, 1999 ते 2002 - उर्जा व जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार, 2002 ते 2004 - जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार, 2009 - लोकसभा खासदार. पक्षाने भरपूर दिले असतानाही हे घराणे सत्तेत असलेल्या भाजपच्या वळचणीला गेले.

5) हर्षवर्धन पाटील -

काँग्रेसचे नेते, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पाटील यांच्या प्रवेशाने काँग्रेसला मोठा धक्का बसला. ते दीर्घकाळ आघाडीच्या सत्तेत मंत्रिपदावर होते. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विधानसभा मतदार संघांचे त्यांनी सलग चार वेळा आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये सलग तीन वेळेस अपक्ष आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे. युती सरकारच्या काळात ते मंत्रिपदी होते. त्यानंतर राज्यात आलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्येही १४ वर्ष मंत्रिपदावर होते. हर्षवर्धन पाटील यांनी सहा मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळात काम केले आहे. असे असतानाही यावेळी इंदापुरातील राष्ट्रवादीच्या भूमिकेचे कारण देत त्यांनी काँग्रेसशी फारकत घेत, भाजपमध्ये डेरेदाखल झाले.

6) सत्यजित देशमुख :

सांगलीच्या शिराळ्यातील काँग्रेस नेते, राज्य सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक वर्षांपासून देशमुख घराणे काँग्रेसशी एकनिष्ठ होते. सत्यजित देशमुख हे विधान परिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे सुपूत्र व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे साडू आहेत. शिवाजीराव देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते १९९६ आणि २००२ मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्याआधी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० असे चार वेळा ते विधानसभा निवडणुकीत निवडून आले. राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची हॅट्ट्रिक शिवाजीराव देशमुख यांनी केली होती. ते ऑगस्ट २००४ ते एप्रिल २००८ आणि एप्रिल २००८ ते मार्च २०१५ पर्यंत असे ११ वर्षे सभापती पदी होते. या घराण्यानेही राष्ट्रवादीच्या भूमिकेचे कारण देत काँग्रेससोबतची निष्ठा गुंडाळत सत्तेतील भाजपमध्ये प्रवेश केला.

या मोठ्या नेत्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला ठोकला रामराम -

साताऱ्याचे खासदार उदनराजे भोसले, नवी मुंबईचे गणेश नाईक, गुहागरचे काँग्रेसचे माजी मंत्री भास्कर जाधव, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, सातारच्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार, पृथ्वीराज चव्हाणांचे विश्वासू जयकुमार गोरे, औरंगाबादच्या सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार इत्यादी.

Intro:Body:

आले किती गेले किती? पक्षनिष्ठा म्हणजे काय रं भाऊ..! जिथं सत्ता तिथं आम्ही

मुंबई - राज्यात सध्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. भाजप-शिवसेना जोमात तर काँग्रेस-राष्ट्रवादी कोमात असेच चित्र आज घडीला दिसून येत आहे. लोकसभेच्या निवडणुकीपासून सुरू झालेल्या पक्षांतराच्या उड्या अद्याप थांबलेल्या नाहीत. काँग्रेस-राष्ट्रवादीतील रोज कोणता ना कोणता नेता भाजपच्या गोटात दाखल होत आहे. अनेक मातब्बर, निष्ठावंत म्हणवले जाणारे नेते तर या रांगेत पहिल्या यादीत दिसतील. भाजपकडून त्यांना विविध आमिषे दाखवली जात आहेत. त्यामुळे पक्षनिष्ठा, तत्वनिष्ठा काय असते रं भाऊ? जिथं सत्ता तिथं आम्ही, असेच चित्र राज्याच्या राजकारणात दिसत आहे.  

काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सध्या मरगळीचे वातावरण असल्याने आघाडीचा भाजपसमोर टीकाव लागण्याची शक्यता फार कमी आहे, हे दीर्घकाळ सत्ता भोगलेल्या नेत्यांनी जाणल्याचे दिसतंय. तसेच चौकशींचा ससेमिरा पाठी लागण्यापेक्षा भाजपवासी होणे अनेकजण पसंत करत आहेत.

सत्ता तिथं आम्ही

1) राधाकृष्ण विखे-पाटील :

लोकसभा निवडणुकी वेळीच सर्वात आधी अहमदनगरच्या विखे कुटुंबाने काँग्रेसशी बंड केले. विधानसभेत विरोधी पक्षनेता असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटीलांच्या मुलानेच सूजय विखेंनी भाजप प्रवेश केल्याने याची राज्यासह देशभरात चर्चा झाली. त्यानंतर राधाकृष्ण विखे-पाटीलांनीही भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि मंत्रिपदही मिळवले. त्यामुळे काँग्रेसशी अनेक वर्षे निष्ठावंत राहिलेले आणि काँग्रेसमध्ये सत्ता भोगलेले हे घराणे भाजपकडे सत्ता असल्याने त्यांच्या मंच्यावर जाऊन बसले.

2) विजयसिंह मोहिते-पाटील :

राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विजयसिंह मोहिते-पाटील यांचे सुपूत्र माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. राज्यसत्तेचा वापर सामान्य माणसाला मोठे करण्यासाठी झाला पाहिजे, अशी भूमिका घेत त्यांनी पक्षाला रामराम केला. त्यांच्या भाजप प्रवेशामुळे सोलापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला. आघाडी सरकारमध्ये या घराण्याने मंत्रिपदासह महत्त्वाची पदे उपभोगली. विजयसिंह मोहिते-पाटील हेतर उपमुख्यमंत्री पदावर होते. या आघाडीमध्ये दीर्घकाळ सत्तेत असतानाही त्यांनी भाजपकडे सत्ता गेल्याने भाजपवासी होणे पसंत केले.

3) मधुकर पिचड :

मुंबईतील गरवारे कल्बमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड आणि पुत्र वैभव पिचड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत काँग्रेस-राष्ट्रवादीतील आमदार, नेते चित्रा वाघ, शिवेंद्रराजे, संदीप नाईक हे देखील भाजपमध्ये दाखल झाले. मधुकर पिचड हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जात होते. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मधुकर पिचड पवारांसोबत राहिले. 35 वर्ष त्यांनी अकोले मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. आदिवासी विकास मंत्री म्हणून त्यांना सतत मंत्रिपद मिळाले. विरोधी पक्षनेते म्हणूनही मधुकर पिचड यांनी काम पाहिले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे पुत्र वैभव पिचड यांनी राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवली. सध्या ते निवडूनही आले. 35 वर्षांच्या काळात बरीच पदे, मंत्रिपदे मिळाली असताना पवारांची साथ सोडून भाजपला जवळ केले.

 4) पद्मसिंह पाटील :

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांचे पुत्र राणा जगजीत सिंह यांनी सोलापुरात भाजपचे अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी मोठा धक्का बसला. शरद पवारांचे जवळचे नातेवाईक आणि पवारांचे बोट पकडून राजकारणात आलेले नेते अशी पद्मसिंह पाटील यांची ओळख होती. त्यांनी मंत्रिपदासह महत्त्वाची पदे भूषवली. 1978 ते 2009 - विधानसभा आमदार, 1978 ते 1980 - उर्जा व उत्पादन शुल्क मंत्री, 1986 ते 1988 - उपसभापती, विधानसभा, 1995 ते 1999 - विरोधी पक्ष उपनेता, 1999 ते 2002 - उर्जा व जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार, 2002 ते 2004 - जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र सरकार, 2009 - लोकसभा खासदार. पक्षाने भरपूर दिले असतानाही हे घराणे सत्तेत असलेल्या भाजपच्या वळचणीला गेले.  

5) सत्यजित देशमुख :

सांगलीच्या शिराळ्यातील काँग्रेस नेते, राज्य सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. अनेक वर्षांपासून देशमुख घराणे काँग्रेसशी एकनिष्ठ होते. सत्यजित देशमुख हे विधान परिषदेचे माजी सभापती, ज्येष्ठ दिवंगत नेते शिवाजीराव देशमुख यांचे सुपूत्र व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे साडू आहेत. शिवाजीराव देशमुख काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते १९९६ आणि २००२ मध्ये ते विधानपरिषदेवर निवडून गेले होते. त्याआधी १९७८, १९८०, १९८५ आणि १९९० असे चार वेळा ते विधानसभा निवडणुकीत निवडून आले. राज्याच्या विधानपरिषदेच्या सभापतीपदी बिनविरोध निवडून येण्याची हॅट्ट्रिक शिवाजीराव देशमुख यांनी केली होती. ते ऑगस्ट २००४ ते एप्रिल २००८ आणि एप्रिल २००८ ते मार्च २०१५ पर्यंत असे ११ वर्षे सभापती पदी होते. या घराण्यानेही राष्ट्रवादीच्या भूमिकेचे कारण देत काँग्रेससोबतची निष्ठा गुंडाळत सत्तेतील भाजपमध्ये प्रवेश केला.

या मोठ्या नेत्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीला ठोकला रामराम -

साताऱ्याचे खासदार उदनराजे भोसले, गुहागरचे काँग्रेसचे माजी मंत्री भास्कर जाधव, कोल्हापूरचे राष्ट्रवादीचे माजी खासदार धनंजय महाडिक, सातारच्या माण-खटाव विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेस आमदार, पृथ्वीराज चव्हाणांचे विश्वासू जयकुमार गोरे, औरंगाबादच्या सिल्लोडचे काँग्रेस आमदार अब्दुल सत्तार इत्यादी.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.