मुंबई Mahaparinirvan Divas Special Train : 'भारतरत्न' डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांच्या सुविधेकरिता मध्य रेल्वेनं 5 आणि 6 डिसेंबर 2023 च्या मध्यरात्री (मंगळवार-बुधवार) परळ-कल्याण आणि कुर्ला-पनवेल स्थानकांदरम्यान 12 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतलाय. तसंच या गाड्या सर्व स्थानकांवर थांबणार असल्याची माहिती मध्य रेल्वेनं दिलीय.
-
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई विभाग/मध्य रेल्वे, ५/६ डिसेंबर'२३ (मंगळवार/बुधवार) च्या रात्री मेन लाइन व हार्बर लाइन वर एकुण १२ विशेष उपनगरीय फेऱ्या चालवत आहे.
— Central Railway (@Central_Railway) December 2, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
सर्व प्रवाशांनी कृपया खालील विशेष उपनगरीय फेऱ्यांच्या वेळापञकाची नोंद घ्यावी... pic.twitter.com/rvbaIN8k7E
">महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई विभाग/मध्य रेल्वे, ५/६ डिसेंबर'२३ (मंगळवार/बुधवार) च्या रात्री मेन लाइन व हार्बर लाइन वर एकुण १२ विशेष उपनगरीय फेऱ्या चालवत आहे.
— Central Railway (@Central_Railway) December 2, 2023
सर्व प्रवाशांनी कृपया खालील विशेष उपनगरीय फेऱ्यांच्या वेळापञकाची नोंद घ्यावी... pic.twitter.com/rvbaIN8k7Eमहापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबई विभाग/मध्य रेल्वे, ५/६ डिसेंबर'२३ (मंगळवार/बुधवार) च्या रात्री मेन लाइन व हार्बर लाइन वर एकुण १२ विशेष उपनगरीय फेऱ्या चालवत आहे.
— Central Railway (@Central_Railway) December 2, 2023
सर्व प्रवाशांनी कृपया खालील विशेष उपनगरीय फेऱ्यांच्या वेळापञकाची नोंद घ्यावी... pic.twitter.com/rvbaIN8k7E
विशेष गाड्यांचे वेळापत्रक खालीलप्रमाणे -
मेन लाइन-अप विशेष (परळ-कल्याण विभाग) :
- कुर्ला-परळ विशेष कुर्ला येथून 00.45 वाजता सुटेल आणि परळ येथे 01.05 वाजता पोहोचेल.
- कल्याण-परळ विशेष कल्याण येथून 01.00 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.15 वाजता पोहोचेल.
- ठाणे-परळ विशेष ठाणे येथून 02.10 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.55 वाजता पोहोचेल.
मेन लाइन-डाऊन विशेष (कल्याण-परळ विभाग) :
- परळ-ठाणे विशेष परळ येथून 01.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 1.55 वाजता पोहोचेल.
- परळ-कल्याण विशेष परळ येथून 02.25 वाजता सुटेल आणि कल्याण येथे 3.40 वाजता पोहोचेल.
- परळ-कुर्ला विशेष परळ येथून 03.05 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3.20 वाजता पोहोचेल.
हार्बर लाइन-अप विशेष (पनवेल-कुर्ला विभाग) :
- वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून 01.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.10 वाजता पोहोचेल.
- पनवेल-कुर्ला विशेष पनवेल येथून 01.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.45 वाजता पोहोचेल.
- वाशी-कुर्ला विशेष वाशी येथून 03.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 03.40 वाजता पोहोचेल.
हार्बर लाईन-डाऊन विशेष (कुर्ला-पनवेल विभाग) :
- कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून 02.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे 03.00 वाजता पोहोचेल.
- कुर्ला-पनवेल विशेष कुर्ला येथून 03.00 वाजता सुटेल आणि पनवेल येथे 04.00 वाजता पोहोचेल.
- कुर्ला-वाशी विशेष कुर्ला येथून 04.00 वाजता सुटेल आणि वाशी येथे 04.35 वाजता पोहोचेल.
''सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी आणि सुविधेचा लाभ घ्यावा. तसंच प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी योग्य तिकीट काढून प्रवास करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे"- मध्य रेल्वे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे
हेही वाचा -