ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करा; युवक काँग्रेसची मागणी - Maha youth congress news

अंतिम वर्ष परीक्षा घेतल्या तर विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते,असे युवक काँग्रेसने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

youth congress demands to cancel exams
युवक काँग्रेसची परीक्षा रद्द करण्याची मागणी
author img

By

Published : Jul 22, 2020, 8:20 AM IST

मुंबई- महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी अंतिम वर्ष परीक्षा रद्द करण्यासाठी निवेदन द्यावे, असे आवाहन केले होते. तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्य काँग्रेसचे पदाधिकारी आणि युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तहसीलदारामार्फत राष्ट्रपती यांना निवेदन दिले.

दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहे.देशातील 12 लाखांच्या जवळ पोहोचली आहे. यापैकी तीन लाखांपेक्षा जास्त रुग्णसंख्या महाराष्ट्रात आहे. अंतिम वर्ष परीक्षा घेतल्या तर विद्यार्थी, शिक्षक आणि त्यांच्या कुटुंबियांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

समूह संक्रमणाचा धोका बघता अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द कराव्यात. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क घेऊ नये आणि मागील सत्राच्या मिळवलेल्या गुणांच्या आधारे गुण देऊन निकाल जाहीर करावा, अशा तीन मागण्या राष्ट्रपतींकडे करण्यात आल्या.

भारतातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून या विषाणूचे समूह संक्रमण सुरू झाले आहे, असा दावा विविध वैद्यकीय तज्ञांनी केला आहे. या परिस्थितीत देखील परीक्षा घेण्याचे आदेश काढणे म्हणजे जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे व त्यांच्या कुटुंबियांचे जीव धोक्यात घालण्यासारखे आहे, असे तांबे यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.