ETV Bharat / state

सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांच्या विकासासाठी राज्य सरकारचा सीडबी सोबत सामंजस्य करार

राज्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचा विकास व्हावा यासाठी उद्योग विभागाने सीडबी या संस्थेसोबत करार केला. हा करार उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत झाला. करारानुसार प्रकल्प व्यवस्थापन घटक स्थापन करण्यात येईल. सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाची विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रमांची आखणी करणे, अशा प्रकारची कामे या सामंजस्य करारांतर्गत करण्यात येतील.

mumbai latest news
मुंबई लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Sep 2, 2020, 9:59 PM IST

मुंबई- मिशन बिगीन अंतर्गत राज्य सरकार अर्थव्यवस्था रुळावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचा विकास व्हावा यासाठी उद्योग विभागाने आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. देशातील सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमाच्या वाढीसाठी, सुलभ वित्त पुरवठा व विकासासाठी काम करणाऱ्या भारतीय लघु उद्योग विकास बँक (सीडबी) या संस्थेसोबत राज्य शासनाने आज सामंजस्य करार केला आहे. सामंजस्य करारावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत उद्योग विभागाच्या वतीने उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे व सीडबीच्या वतीने उपव्यवस्थापकीय संचालक व्ही.एस.व्ही राव यांनी स्वाक्षरी केली. यावेळी उद्योग विभागाचे प्रधान सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी हे उपस्थित होते.

हेही वाचा-१३ वर्षापासून प्रतीक्षा करणारे पत्राचाळवासी शुक्रवारी करणार आंदोलन

सामंजस्य करारांतर्गत सिडबी मार्फत उद्योग विभागात एक प्रकल्प व्यवस्थापन घटक (PMU) स्थापन करण्यात येणार आहे. या प्रकल्प व्यवस्थापन घटकाची भूमिका ही सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमाची विकासासाठी विविध योजना आणि कार्यक्रमांची आखणी करणे असे असणार आहे. यात सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना भाग भांडवल सहाय्य, व्याज अनुदान, आजारी पडण्याच्या मागावर असलेल्या सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांना सहाय्य, तसेच विद्यमान सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांचे मूल्यमापन करुन आवश्यकतेनुसार सहाय्य करणे याचा समावेश राहील.

हेही वाचा-पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवरून संदीप देशपांडे यांचा सरकारवर हल्लाबोल, म्हणाले...

राज्यातील सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांच्या विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या विद्यमान योजना आणि कार्यक्रमांचा अभ्यास करुन सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांची गुणवत्ता वाढावी व त्यांच्या अडी अडचणी दुर करण्याच्या अनुषंगाने विद्यमान योजना व कार्यक्रम इत्यादी मध्ये आवश्यकता असल्यास त्याप्रमाणे प्रकल्प व्यवस्थापन घटकाकडून सुधारणा सुचविण्यात येणार आहेत.

राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या विकासासाठी पूरक वातावरण निर्मिती करुन या उद्योगांना बळकटीकरण प्राप्त करुन देण्याचा सीडबी यांचा मानस आहे. महाराष्ट्र शासनास सहकार्य करुन राज्यातील सुक्ष्म, लघु आणि मध्यम उपक्रमांच्या सर्वकष विकासाकरीता प्रभावी अवलंब करुन विद्यमान धोरणांचा आणि योजनांचा कायाकल्प करणे आणि अधिक प्रमाणात प्रतिसाद देणारी पुरवठा साखळी सक्षम करणे हे मुख्य उद्दिष्ट सीडबी यांचे असेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.