ETV Bharat / state

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोरोना अपडेट एका क्लिकवर.. - पंढरपूर कोरोना अपडेट

राज्यातील विविध जिल्ह्यांमधील कोरोना परिस्थितीचा आढावा एका क्लिकवर..

थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या
थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या
author img

By

Published : Aug 6, 2020, 10:49 PM IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवीन पंधरा बाधितांची भर

सिंधुदुर्ग - जिल्ह्यात आजपर्यंत एकूण ३२३ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १५ व्यक्तींचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामध्ये कणकवली तालुक्यातील १२, सावंतवाडी तालुक्यातील २, वेंगुर्ला तालुक्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत तपासण्यात आलेले एकूण नमुने ६९८९ आहेत. यापैकी अहवाल प्राप्त झालेले नमुने ६८४८ आहेत. यामध्ये आतापर्यंत पॉझिटिव्ह आलेले नमुने ४३४ असून निगेटिव्ह आलेले नमुने ६४१४ आहेत. अजून १३४ अहवाल प्राप्त न झालेले नमुने आहेत. तर सध्यस्थितीत जिल्ह्यातील १०८ सक्रिय रुग्ण आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विलगीकरण कक्षात १२६ रुग्ण दाखल आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत संस्थात्मक अलगीकरणातील १९७२५ व्यक्तींना ठेवण्यात आले होते. तर २ मे २०२० रोजीपासून आतापर्यंत जिल्ह्यात १ लाख ८० हजार ५७७ लोक दाखल झाले आहेत. सद्यस्थितीत सक्रीय कंटेन्मेंट झोनची संख्या ४७ आहे.

जिल्ह्यात सध्या चाकरमान्यांचा येण्याचा ओघ सुरू असून त्यांची जिल्ह्याच्या सीमा भागात तपासणी केली जात आहे. आता कुडाळ तालुक्यातही अँटीजेन टेस्ट सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली. जिल्ह्यात गणेश चतुर्थीच्या काळात मुंबईहून येणाऱ्या चाकरमान्यांच्या माध्यमातून कोरोनाचा फैलाव होऊ नये, यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी करून चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिला जात असून त्यांना होम कॉरंटाईन केले जात आहे. तर संशयित वाटणाऱ्या चाकरमान्यांना संस्थात्मक विलगीकरणात पाठवले जात आहे. ७ ऑगस्टपर्यंत चाकरमान्यांना कोकणात येण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना १४ दिवस विलगीकरणात रहावे लागणार आहे. त्यामुळे सध्या जिल्ह्याच्या सीमेवर चाकरमान्यांच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या पहायला मिळत आहेत. यामुळे आरोग्य आणि महसूल व पोलीस खात्यावरही ताण वाढलेला दिसत आहे.

--------------------

80 रुग्ण सापडले पॉझिटिव्ह तर 18 जणांनी केली कोरोनावर मात

अकोला - कोरोना तपासणी अहवालात आज दिवसभरात 55 जण पॉझिटिव्ह सापडले. तर रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये 25 असे एकूण 80 जण पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर 18 जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत असल्याने अकोलेकरांमध्ये चिंता वाढली आहे.

५५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात ३२ महिला व २३ पुरुष आहेत. त्यात अकोट येथील १२, आगर ता. अकोला येथील सात, शास्त्रीनगर सहा, सिंधी कॅम्प चार, पुनोती ता. बार्शी टाकळी येथील तीन तर रामनगर, कौलखेड, शिवनी, वाशिम बायपास, जुना कॉटन मार्केट, गणेश नगर, गोरक्षण रोड, डाळंबी ता. अकोला व सांगवा मेळ ता. मूर्तीजापूर येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत. तसेच त्यात वाडेगाव येथील नऊ, रिधोरा येथील तीन तर पुनोती ता. बार्शीटाकळी येथील दोन जण याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान, बुधवारी रात्री रॅपिड ॲन्टीजेन टेस्टमध्ये २५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा समावेशही आजच्या एकूण पॉझिटिव्ह व ॲक्टिव्ह रुग्ण संख्येत करण्यात आला आहे.

दरम्यान, दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून १०, मूर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयातून दोन, आयकॉन रुग्णालयातून तीन व ओझोन ओझोन रुग्णालयातून तीन अशा १८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

*आज प्राप्त अहवालानुसार*

*प्राप्त अहवाल- ३२४

*पॉझिटिव्ह- ५५

*निगेटिव्ह-२६९

*आता सद्यस्थिती*

*एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २४३९+४४१=२८८०

*मयत-११३

*डिस्चार्ज- २३०४

*दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह)- ४६३

--------------------

अहमदनगर जिल्ह्यात दुपारपर्यंत ३८ नवे रुग्ण, आज ३८५ कोरोनामुक्त

अहमदनगर-जिल्ह्यात काल (बुधवार) सायंकाळी वाजल्यापासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्ण संख्येत ३८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २२६३ इतकी झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात आज ३८५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रूग्णांची संख्या आता ४९६५ इतकी झाली.

काल सायंकाळपासून आज दुपारपर्यंत जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ३८ रुग्ण बाधित आढळून आले. बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये श्रीगोंदा ०१ - बेलवंडी फाटा ०२, श्रीरामपूर १७ - शहर १६, श्रीरामपूर सब जेल ०१, राहुरी ०२ - देवळाली प्रवरा ०२, मनपा ०५ - शहर ०४, केडगाव ०१, कॅन्टोन्मेंट ०५,

पारनेर ०५ - डिकसळ ०१, वाडेगव्हाण ०१, देवीभोयरे ०१, पारनेर ०१, पाडळी ०१, नेवासा ०१, कोपेरगाव ०२ - खडकी ०१, शिंगणापूर ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज एकूण ३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले. यामध्ये, मनपा क्षेत्र १८९, संगमनेर ३१, राहाता १४, पाथर्डी २५, नगर ग्रा.२४, श्रीरामपूर २९, कॅन्टोन्मेंट १३, नेवासा २४, श्रीगोंदा २, पारनेर ८, अकोले २, शेवगाव २, कोपरगाव ३, कर्जत १९.

-बरे झालेले एकूण रुग्ण:४९६५

-उपचार सुरू असलेले रूग्ण:२२६३

-मृत्यू: ८८

-एकूण रूग्ण संख्या: ७३१६

---------------

भंडारा जिल्ह्यात पाच दिवसात नवीन 87 रुग्णांची भर

भंडारा - जिल्ह्यात मागील पाच दिवसात कोरोनाच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत असून पाच दिवसात तब्बल 87 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. गुरुवारी सुद्धा 24 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. विशेष म्हणजे 24 पैकी 21 रुग्ण एकट्या भंडारा तालुक्यातील आहेत. तर या चोवीसमध्ये दोन डॉक्टरांचा समावेश आहे. तसेच 24 पैकी 2 रुग्ण हे बाहेर जिल्ह्यातून आले असून उर्वरित 22 रुग्णांना कोरोनाच्या रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे बाधा झाली आहे.

आज आढळल्या 24 कोरोनाबाधित रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढून 342 झाली आहे. आज चार लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून आतापर्यंत 231 लोकांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर 103 रुग्णांवर सध्या भंडारा येथील करून सेंटरमध्ये उपचार सुरू असून सहा संदर्भीय रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहेत. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आज मिळालेल्या 24 रुग्णांपैकी भंडारा तालुक्यातील 21, लाखनी 1 व मोहाडी तालुक्यातील 2 व्यक्तींचा समावेश आहे. भंडारा तालुक्यातील 21 रुग्णांपैकी एक 27 वर्षीय महिला व 21 वर्षीय महिला या दोघेही पुण्यावरून आलेले आहेत. उर्वरित 19 लोक यामध्येएक 40 वर्षीय महिला डॉक्टर, 40 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, 2 वर्षीय मुलगी, 30 वर्षीय पुरुष, 6 वर्षीय मुलगा, एक 28 वर्षीय महिला, एक 22 वर्षीय मुलगा, दोन 41 वर्षीय महिला तसेच 62 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, 52 वर्षे पुरुष, 65 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय महिला, 40 वर्षीय पुरुष, 36 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 6 वर्षे मुलगी असे एकूण 19 व्यक्ती हे कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मोहाडी तालुक्यातील दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये एक 57 वर्षे पुरुष डॉक्टर तसेच 42 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच लाखनी तालुक्यातील एक 52 वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह सापडला आहे.

आज 6 ऑगस्ट रोजी आयसोलेशन वार्डमध्ये 117 व्यक्ती भरती असून 791 व्यक्तींना आयसोलेशन वार्डमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1975 व्यक्तींची अँटिजेन तपासणी करण्यात आली असून त्यात 34 व्यक्ती पॉझिटिव्ह तर 1941 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

-----------------

हिंगोलीत एकाच दिवशी आढळले ५८ कोरोनाबाधित रुग्ण

हिंगोली - जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली असताना आज एकाच दिवशी जिल्ह्यात तब्बल ५८ कोरोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले आहेत. यामध्ये सहा रुग्ण हे अँटीजन तपासणीत तर ५२ रुग्ण हे आरटीपीसीआर तपासणीत आढळले आहेत. ५ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्यामुळे त्यांना प्रशासनाच्यावतीने सुट्टी देण्यात आली आहे. एकाच दिवशी एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

नव्याने आढळलेल्यामध्ये महसूल कॉलनी १, फलटण ३, कळमनुरी येथील साईनगर येथे २ असे नव्याने ६ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर आर टी पी सी आर तपासणीत हिंगोली शहरातील सरस्वती नगर १, रिसाला बाजार २, पेन्शनपुरा १, जिल्हा परिषद क्वॉटर १, देवगलल्ली १, गाडीपुरा ९, नगर परिषद कॉलनी ३, महादेव वाडी १, वंजारवाडा ३, तोफखाना २, बोरीशिकारी १, सेनगाव तालुक्यातील गोरेगाव ४, गोंदनखेडा १, वसमत येथे ६, वसमत तालुक्यातील वापटी १, वसमत पंचायत समिती १, जुमापेठ १, वसमत तालुक्यातील चिखली १, कळंबा १, सतीपांगारा १, कळमनुरी तालुक्यातील डोंगरकडा २, कळमनुरी शहरातील विद्यानगर १, भीमनगर ३, बी. एस. एन.एल. जवळ १ असे एकूण ५८ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.

एकंदरीत आता जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा हा ७९६ वर पोहोचला आहे. तर ५५५ रुग्ण हे बरे झाले असल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. तर आज घडीला २३३ कोरोनाबाधित रुग्णांवर कोरोना वार्ड तसेच कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. तर आज पाच जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना प्रशासनाच्या वतीने सुट्टी देण्यात आली आहे, तर उपचार घेत असलेल्या एकूण रुग्णांपैकी सात जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन सुरू आहे. तर पाच रुग्ण हे अतिगंभीर आहेत, त्यामुळे त्या रुग्णांना बायपँप मशीनवर ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.

-------------------

पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह 82 जणांना सुट्टी, नवे 46 जण बाधित

यवतमाळ : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड तसेच विविध कोविड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 82 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आज एका कारोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याने मृतांची एकूण संख्या 37 झाली आहे. तसेच गुरुवारी 46 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहेत.

गुरुवारी मृत झालेली महिला ही 58 वर्षीय असून पुसद शहरातील आहे. तर आज नव्याने पॉझिटिव्ह आलेल्या 46 जणांमध्ये 27 पुरुष आणि 19 महिला आहेत. यात दारव्हा येथील अंबिकानगर येथील एक पुरुष, दिग्रस शहरातील पाटीपुरा येथील एक पुरुष, दारव्हा शहरातील दोन महिला, पांढरकवडा शहरातील न.प. आखाडा वॉर्ड येथील एक पुरुष, पांढरकवडा शहरातील एक पुरुष, पांढरकवडा तालुक्यातील अर्ली येथील पाच महिला व एक पुरुष, पुसद तालुक्यातील पारडी येथील एक पुरुष व एक महिला, श्रीरामपूर येथील एक महिला, पुसद शहरातील राजे ले-आऊट येथील एक महिला, आंबेडकर वॉर्ड येथील एक पुरुष, वसंत नगर येथील एक पुरुष, तसेच पुसद शहरातील एक महिला व दोन पुरुष, यवतमाळ शहरातील दोन महिला व एक पुरुष, लोखंडी पुल येथील एक पुरुष, तेलीपुरा येथील दोन पुरुष, गोदाम फैल येथील एक महिला, शास्त्री नगर येथील एक पुरुष, कुंभारपूरा येथील एक पुरुष, नेर शहरातील वॉर्ड क्रमांक 1 येथील एक पुरुष, नेर शहरातील एक महिला व दोन पुरुष, नेर तालुक्यातील घारफळ येथील चार पुरुष व दोन महिला, महागाव शहरातील एक पुरुष, उमरखेड तालुक्यातील मरसूळ येथील दोन पुरुष व एक महिला, ढाणकी येथील एक पुरुष व एक महिला.

जिल्ह्यातील दोन कोरोनाबाधित रुग्णांना नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रेफर केल्यामुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 323 एवढी आहे. जिल्ह्यात सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1356 झाली आहे. यापैकी 994 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 37 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 125 जण भरती आहेत.

----------------

7) लॉकडाऊन काळात ग्रामीण भागात रॅपिड अँटिजेन टेस्ट - गटविकास अधिकारी रविकिरण घोडके

पंढरपूर (सोलापूर) -कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी आजाराची लक्षणे असणाऱ्या व कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी तालुक्यातील ग्रामीण भागात व्यापक प्रमाणात रॅपिड ॲटिजेन टेस्ट करण्याची मोहीम राबविणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी दिली.

तालुक्यातील ग्रामीण भागातील भोसे, खेडभोसे व रोपळे कोरोनाबाधित रुग्ण सापडल्याने त्यांच्या संपर्कातील नागरिकांची व आजाराची लक्षणे असणाऱ्या नागरिकांची ॲटीजेन टेस्ट घेण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यामध्ये आज 175 रॅपिड ॲटिजेन टेस्ट घेण्यात आल्या आहेत. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे.

जे नागरिक आजाराची लक्षणे अथवा कोरोना बाधितांच्या संपर्कात असून देखील तपासणीसाठी पुढे येत नाहीत अशा नागरिकांसाठी शोध मोहीम राबवून जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी केली जाणार आहे. ही मोहीम तालुक्याच्या आठ प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात येणार आहे. ज्यांना सर्दी, ताप, खोकला व श्वसनाचा त्रास अशी लक्षणे आढल्यास जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून घ्यावी घ्यावी, असे आवाहनही गटविकास अधिकारी घोडके यांनी केले आहे.

---------------------------

उपराजधानी नागपुरात पुन्हा कोरोना ब्लास्ट, दिवसभरात ५३९ रुग्णांची नोंद, तर १५२ रुग्णांची कोरोनावर मात

नागपूर - आज नागपुरात कोरोना रुग्ण संख्येचा उद्रेक झाला आहे. दिवसभरात तब्बल ५३९ नवीन रुग्णांची नोंद झाल्याने नागपुरात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात बाहेर जाताना दिसत आहे.

आज पहिल्यांदा कोरोनाने पाचशेचा टप्पा ओलांडला आहे. आज तब्बल ५३९ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाल्याने ७२९१ इतकी झाली आहे. यामध्ये ११८ रुग्ण हे नागपूर जिल्ह्या बाहेरील आहेत. एकूण रुग्ण संख्येपैकी २३५२ रुग्ण नागपूर ग्रामीणच्या विविध तालुक्यातील आहेत तर ४९३९ रुग्ण नागपूर शहरातील आहेत.

आज पॉझिटिव्ह आलेल्या ५३९ रुग्णांपैकी २५१ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत, तर २८८ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांना लक्षणे दिसून आल्यानंत त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा कोरोना अवहाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आज १५२ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४०८५ इतकी झाली आहे. या शिवाय आज २५ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नागपुरात एकूण २२९ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे २२९ पैकी १८८ मृत्यू हे नागपूर जिल्ह्यातील आहेत तर ४१ मृत्यू हे नागपूर जिल्ह्याबाहेरील रुग्णांचे आहेत.

यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या नागपुरातील २८ ठिकाणी २९७७ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपुरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ५५.०२ टक्के इतके आहे. तर एकूण मृत्यू दर हा ३.१४ इतका आहे. शिवाय मूळ नागपुरातील रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची टक्केवारी २.५७ इतकी आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.