मुंबई - भांडुप येथे काल (सोमवारी) दुपारी यास्मिता साळुंखे या शिक्षिकेचे हत्या करून मृतदेह वक्रतुंड पॅलेस या इमारतीच्या वाहन पार्किंगमध्ये सोडून दिला होता. आरोपीने शिक्षिकेच्या डोक्यावर जड वस्तूने प्रहार करून हत्या केली होती. मात्र, आज आरोपी किशोर सावंत (वय- 46) याचा पोलीस शोध घेत असतानाच त्याने भांडुपमधील कल्पतरू क्रेस्ट इमारतीवरून उडी घेत आत्महत्या केली आहे.
यास्मिता साळुंखेची हत्या त्यांचा जुना मित्र किशोर सावंत याने केला असल्याचा संशय पोलिसांना होता आणि त्यासाठी पोलिसांची दोन पथक किशोर सावंत यांच्या मागावर होती. भांडुपमधील कल्पतरू क्रेस्ट इमारतीमध्ये किशोर याचा शोध पोलीस घेत होते. परंतु, किशोर याने पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी इमारतीतच एका ठिकाणी लपून राहण्याचा प्रयत्न केला होता. काल रात्री त्यानी अखेर या इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस आरोपीपर्यंत पोहोचले देखील होते परंतु अचानक झालेल्या या घटनेमुळे पोलीस देखील चक्रावून गेले. किशोर याने यास्मिता यांची हत्या करून स्वतः आत्महत्या का केली याचा शोध सध्या भांडुप पोलीस घेत आहेत.