ETV Bharat / state

Exclusive:  म्हाडाला L&T चा 'जोर का झटका'.. बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातून माघार

मागील तीन वर्षांपासून प्रकल्प पुढे जात नसून रहिवाशांचा प्रकल्पाला विरोध आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेत एल अँड टीने म्हाडा आणि सरकारला पत्र लिहीत प्रकल्पाचे काम थांबवत प्रकल्प सोडत असल्याचे कळवले आहे. इतकेच नव्हे तर, एल अँड टीने नायगाव येथील आपल्या कंटेनरमधील ऑफिस बंद करत कंटेनरही हलवले आहे.

म्हाडा
म्हाडा
author img

By

Published : Aug 25, 2020, 8:51 PM IST

Updated : Aug 25, 2020, 9:00 PM IST

मुंबई- मुंबईची ओळख असलेल्या नायगाव, ना. म. जोशी मार्ग आणि वरळी बीडीडी चाळीचा पुनर्विकास राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत म्हाडाच्या माध्यमातून हाती घेतला. पण आता मात्र सरकार आणि म्हाडाचा हा ड्रीम प्रोजेक्ट ठप्प होणार आहे. कारण नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकासातील कंत्राटदार एल अँड टीने हा प्रकल्प गुंडळण्याचा निर्णय घेतला आहे.

मागील तीन वर्षांपासून प्रकल्प पुढे जात नसून रहिवाशांचा प्रकल्पाला विरोध आहे. या दोन्ही बाबी लक्षात घेत एलअँडटीने म्हाडा आणि सरकारला पत्र लिहीत प्रकल्पाचे काम थांबवत प्रकल्प सोडत असल्याचे कळवले आहे. इतकेच नव्हे तर, एलअँडटीने नायगाव येथील आपल्या कंटेनरमधील ऑफिस बंद करत कंटेनरही हलवले आहे, त्यामुळे आता सुमारे ३ हजार कोटींचा नायगाव प्रकल्प बंद होण्याची शक्यता दाट झाली आहे. हा सरकार- म्हाडासाठी मोठा झटका असल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा देत असे पत्र आल्याचे 'ईटीव्ही भारत' ला सांगितले आहे. नायगाव पुनर्विकासाचे कंत्राट एलअँडटीला मार्च २०१७ मध्ये देण्यात आले, तर २२ एप्रिल २०१७ ला तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या प्रकल्पाचे थाटामाटात उद्घाटन झाले. त्यानंतर म्हाडाच्या मुंबई मंडळाने रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम हाती घेतले. पण हा प्रकल्प म्हाडाकडे गेल्यापासून रहिवाशांचा प्रकल्पाला व म्हाडाला विरोध सुरू आहे. कित्येकदा रहिवाशांनी पात्रता निश्चिती करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना हुसकावून लावले आहे. तर, विविध कारणावरून या प्रकल्पाला विरोध सुरूच असून ३ वर्षात ४१ पैकी केवळ ५ इमारतींचीच पात्रता निश्चिती म्हाडा करू शकले आहे. असेच काम सुरू राहिले तर प्रकल्प पूर्ण कसा व्हायचा, हा प्रश्न आहे. आणि हाच प्रश्न एलअँडटीला भेडसावत होता.

काहीही काम करता येत नसल्याने आणि भविष्यात कधी काम सुरू करता येईल याचे चित्रही स्पष्ट नसल्याने एल अँड टीने म्हाडा-सरकारला पत्र पाठवत प्रकल्प सोडण्याचा निर्णय कळवला आहे. ३ वर्षात काहीही काम होत नसल्याने, त्याचा मोठा आर्थिक फटका बसत असल्याने हा निर्णय घेत असल्याचेही पत्रात म्हटले आहे. तर, दुसरीकडे एल अँड टीचे ३ मोठे कंटेनर नायगाव ललित कला भवन मैदानात होते. यातील २ कंटेनरही आता कंपनीने हलवले आहेत. यातील एका कंटेनरमध्ये त्यांचे ऑफिस होते.

याविषयी एल अँड टीला मेल केला असता त्यांच्याकडून याबाबत काहीही बोलण्यास नकार देण्यात आला आहे. तर म्हाडातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत अधिक गुप्तता पाळण्यावर भर दिला आहे. पण असे असले तरी प्रकल्प पुढे जात नसल्याने प्रकल्प थांबवत असल्याचे पत्र एल अँड टीकडून आल्याच्या वृत्ताला मात्र दुजोरा दिला आहे. आता म्हाडा आणि सरकार यावर काय भूमिका घेते हे पाहणे महत्वाचे आहे. पण मुंबईतील एक मोठा आणि ड्रीम प्रोजेक्ट आता रखडला हे मात्र खरे. तर, दुसरीकडे हक्काच्या मोठ्या घरात, फ्लॅटमध्ये, टॉवरमध्ये राहायला जाण्याचे नायगाव बीडीडीवासीयांचे स्वप्नही आता लांबले आहे.

हेही वाचा- दिलासादायक! मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा होतोय कमी

Last Updated : Aug 25, 2020, 9:00 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.