मुंबई : दरवेळी प्रत्येक गोष्टींला आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करतात. एसआरएने कळवलं आहे की किशोरी पेडणेकर यांचा संबंध नाही. वारंवार दबाव तत्रांचा वापर सुरू आहे. वार करून जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. एक जरी गाळेधारक बोलला की गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे असं बोलले तर कुलुप लावा. येथे भाड्याने राहणे गुन्हा होता का ?
दादरच्या पोलिस स्टेशनला बोलवलं जातेय यामुळे विचार करा किती दबाव आहे. न्याय व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया बीएमसीच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
भाजपा नेते किरीट सोमैय्या यांनी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर ( kishori pednekar slammed kirit somaiya ) यांनी लोअर परेल गोमातानगर येथे एसआरएचे ५ ते ६ गाळे बळकावल्याची तक्रार केली आहे. या प्रकरणी दादर पोलिसांनी पेडणेकर यांना चौकशीला बोलावले आहे. यावर आरोप केलेल्या पैकी माझ्या नावावर एकही गाळा निघाला तर त्याला टाळे लावा असे आव्हान पेडणेकर यांनी सोमैय्या यांच्यासह सरकारला दिले आहे. माझा व्यवस्थेवर माझा विश्वास आहे, असेही पेडणेकर म्हणाल्या.
काय आहेत किरीट सोमैय्या यांचे आरोप - किरीट सोमैय्या यांनी काही वर्षांपूर्वी किशोरी पेडणेकर यांनी लोअर परेल येथील गोमाता नगर येथे ५ ते ६ गाळे बळकावल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली. राज्यात महाविकास आघाडी सरकार असल्याने सोमैय्या यांनी याप्रकरणी चौकशीसाठी आंदोलनही केले होते. राज्यात सत्तापरिवर्तन होताच पेडणेकर यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपाची चौकशी सुरू करण्यात आली आहे. शुक्रवारी पेडणेकर यांना दादर पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. त्यानंतर आजही त्यांना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याची माहिती किरीट सोमैय्या यांनी दिली आहे. यावर किशोरी पेडणेकर बोलत होत्या.
तर त्या गाळ्याला टाळे लावा - किरीट सोमैय्या ( kishori pednekar SRA Scam ) हे दरवेळी प्रत्येक गोष्टींला विरोधकांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करतात. एसआरएने आधीच कळवलं आहे की माझा संबंध नाही. तरीही वारंवार दबाव तत्रांचा वापर सुरू आहे. एका सामान्य महीलेला तुमचा एक माणुस त्रास देतोय. गोमातानगरमध्ये मी २०१७ ला अर्ज भरला होता. कारण नसताना रान उठवले आहे. गोमातानगरमध्ये काही दुकाने आणि बालवाड्या सोसायटीच्या ताब्यात आहेत. येथे भाड्याने राहणे गुन्हा होता का ? असा प्रश्न विचारत जर गोमाता नगरमधील एक जरी गाळेधारक बोलला की गाळा किशोरी पेडणेकर यांचा आहे तर त्या गाळ्याला टाळे लावा, असे आवाहन किरीट सोमैय्या यांच्यासह मुख्यमंत्र्यांना केले आहे.
न्याय व्यवस्थेवर विश्वास -हिशोब तर द्यावाच लागेल असे सांगत वार करून जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जातोय. ज्यांना जेरीस आणले ते भाजपच्या वाॅशिंग मशिनमध्ये गेले आणि स्वच्छ झाले. आज टार्गेट केलं जातंय तथ्य नसताना तथ्तहीन बोलले जात आहे. दादरच्या पोलिस स्टेशनला बोलविले जातेय. यामुळे विचार करा किती दबाव आहे. मला पोलिसांनी बोलवलेले नाही, जर बोलवलं तर जाईन. माझा न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे असे पेडणेकर म्हणाल्या आहेत.