ETV Bharat / state

SRA Scam: सोमैयांचा मोर्चा किशोरी पेडणेकरांकडे; अनधिकृतरित्या गाळे हस्तगत केल्याचा आरोप - taken possession of the flat without permission

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची एसआरए घोटाळ्याप्रकरणी दादर पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी पेडणेकर यांच्यावर काही आरोप केलेले आहेत. त्यावर आता पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विरोधातील नेत्यांना जेरीस आणण्याचा प्रयत्न केला जात आहे, अस त्या म्हणाल्या आहेत.

किशोरी पेडणेकर आणि भाजपा नेते किरीट सोमैया

author img

By

Published : Oct 29, 2022, 9:04 PM IST

मुंबई - संजय राऊत यांच्यानंतर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. एसआरए घोटाळ्याप्रकरणी भाजपा नेते किरीट सोमैया यांनी आरोप केल्यानंतर दादर पोलिसांनी काल अर्धा तास किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. याबाबत जूनमध्ये एफआयआर नोंदवण्यात आला होता. तर आज शनिवार (29 ऑक्टोबर)रोजी किरीट सोमैया दादर पोलीस स्टेशनला कागदपत्रांसह पोहोचले होते. पेडणेकर यांनी वरळी येथील गोमाता जनता एसआरएमधील ६ गाळे (सदनिका) हस्तगत केल्याचा सोमैया यांनी आरोप केलेला आहे. दरम्यान, सोमैया यांच्या या आरोपानंतर पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. दवाबतंत्राचा वापर केला जात आहे. तुमच्याकडे केंद्रात सत्ता आहे. राज्यात सत्ता आहे. सत्ता असली म्हणून काहीही करायचे का? असा प्रश्न पेडणेकर यांनी केला आहे.

भाजपा नेते किरीट सोमैया

लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले - किशोरी पेडणेकर यांनी २०१७ साली निवडणुकीमध्ये आपल्या शपथपत्रात एसआरएचा पत्ता दिला आहे. इमारत क्रमाक २, वरळी गोमाता जनता एसआरएमध्ये राहत असल्याचे त्यांनी आपल्या शपथपत्रात लिहिलेले आहे. पेडणेकर यांनी अर्धा डझन गाळे हस्तगत केले आहेत. त्याचा हिशोब घेण्यास सुरुवात झाली आहे. त्यांनी गरीब झोपडपट्टीवासीयांचे गाळे ढापले आहेत. आम्ही तुम्हाला गाळे देऊ, असे म्हणत लोकांकडून पैसे वसूल करण्यात आले. यासंदर्भातच दादर पोलीस ठाण्याकडून चौकशी सुरू आहे. मी किशोरी पेडणेकर यांचे नाव दिलेले नाही. तर जे लोक फसलेले आहेत, त्यांनीच पेडणेकर यांचे नाव घेतले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना न्यू मरीन लाईन पोलीस ठाण्यानेही या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे, अशी माहिती सोमय्या यांनी दिली आहे.

उद्धव ठाकरे यांनीच दबावतंत्राचा वापर केला - करोना साथीला पेडणेकर यांनी कमाईचे साधन बनवण्याचा प्रयत्न केला. मुंबईकरांना लाज वाटत आहे. करोना साथीला हाताळण्यासाठी पेडणेकरांनी त्यांच्याच कंपनीला कंत्राट दिलेले आहे. याबाबतही पेडणेकरांनी स्पष्टीकरण द्यावे. आम्ही दबावतंत्राचा वापर केलेला नाही. उद्धव ठाकरे यांनीच दबावतंत्राचा वापर केला होता. त्यांनी सगळी चौकशी दाबून ठेवली होती. आता चौकशीला सुरुवात झालेली आहे. त्यामुळे पेडणेकर यांना भाऊबीज आठवत आहे, असा टोला किरीट सोमैया यांनी लगावला आहे.

ही नौटंकी बंद करा - वरळी गोमाता जनता एसआरए घोटाळा तो वरळीतील आहे. तिथे तर कागदपत्रे बनावट बनवण्यात आली. बोगस आधार कार्ड, बोगस बिलं याचा अर्थ काय होतो. हा एसआरए घोटाळा खूप मोठा आहे. आता तपास चालू आहे. आज आपल्याला एक कागद दिलाय. किशोरीताई पेडणेकर इतका सुंदर अभिनय करू शकतात याची प्रचिती आज झाली. कुलूप घेऊन गेल्या. अहो नाटक कशाला करताय तुम्ही जे तुमचं नामांकन शपथपत्र भरलं त्यात तुम्ही लिहिले वरळी गोमाता जनता येते फ्लॅट नंबर 601 मध्ये राहतात. हे किशोरी पेडणेकर यांनीच लिहिले. मग ही नौटंकी बंद करा. मग हा फ्लॅट तुमच्या ताब्यात आला कसा पाच वर्ष तुमच्या ताब्यात आहे. बेनामी प्रॉपर्टी आणि इथे पण तीन आरोपी यांना अटक झालेली आहे असही किरीट सोमैया म्हणाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.