ETV Bharat / state

जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडच्या भूखंडाची चौकशी करा; किरीट सोमैयांची मागणी

जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोड भूखंड घोटाळ्याची चौकशी करा

Kirit Somaiya
किरीट सोमैया
author img

By

Published : Dec 7, 2020, 5:59 PM IST

मुंबई - महानगरपालिके अंतर्गत येणाऱ्या जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे आमरोही स्टुडिओच्या जमीनीसाठी मुंबई महानगरपालिकेने ७४ कोटी रूपये रोख देऊन घोटाळा केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी त्यांनी मागणी केली आहे.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंकरोडच्या भूखंडाची चौकशी करण्याची मागणी भाजपा तर्फे करण्यात आली

काय आहेत सोमैयांचे आरोप -
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर दहिसर येथील एक भूखंड खासगी बिल्डरकडून घेण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने ३४९ कोटी रुपये असून हा बिल्डर आणखी ९०० कोटी रुपये मागत आहे. या व्यवहारात घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. आता विक्रोळी येथील भूखंडात घोटाळा झाला असल्याचा आरोप सोमैया यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला. विक्रोळी येथे एक भूखंड होता. तो पालिकेचा होता, त्या ठिकाणी 'महाल पिक्चर्स' यांचा एक खासगी प्रकल्प, बिल्डर गोयंका यांच्याकडून उभारण्यात येणार होता. यातील एफएसआयचे देणे हे पालिकेने रोखीत न देता इतर माध्यमातून देणे हा नियम आहे. मात्र, असे असूनही सर्व नियम धाब्यावर बसवून पालिकेने हे देणे रोखीतच दिले, असा आरोप सोमैया यांनी केला. बिल्डर गोयंका यांचे ठाकरे आणि पवार कुटुंबीयांशी पारिवारिक संबंध आहेत. म्हणूनच मुख्यमंत्री कार्यालयातून आदेश निघाला की, यांचे पेमेंट रोखीतच करावे, असे देखील आरोप सोमैया यांनी केला.

काय आहे प्रकरण?

'महाल पिक्चर्स' यांनी विक्रोळी भूखंडासाठी मुंबई महानगरपालिकेला २०१८ मध्ये प्रस्ताव दिला होता. हा भूखंड जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मातोश्री क्लबच्या समोर आहे. गेली वीस वर्षे रस्त्यासाठी लोक त्याचा वापर करत आहेत. त्या ठिकाणी एक नवीन प्रकल्प महानगरपालिका उभारणार होती. तो प्रकल्प गोयंका बिल्डरला दिला होता. गेल्या दोन वर्षांपासून टीडीआर देण्याचा विचार चालू होता. पण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सत्तेत येताच मुंबई महानगरपालिकेने या भूखंडासाठी रोख ७४ कोटी रुपये बिल्डरला दिले. गेल्या काही दिवसात मुंबई महानगरपालिकेवर मुख्यमंत्री कार्यालयाकडून महाल पिक्चर्सला रोखीने भरपाई द्यावी म्हणून दबाव आणला जात होता. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात स्वतः रस घेतला आहे. ठाकरे सरकारच्या आवडत्या बिल्डरसाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणत हा घोटाळा केला, अशी माहिती किरीट सोमैया यांनी दिली आहे.

प्रकरणाची व्हावी चौकशी -

या प्रकारामुळे अंतर्गत रस्त्यांसाठी मुंबईकरांचे एकूण एक लाख कोटी रुपयांपर्यंत नुकसान होऊ शकते, अशी भीती सोमैया यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, गेली अनेक वर्षे मुंबई महागनरपालिके अंतर्गत रस्त्यांच्या विकासासाठी एखाद्या भूखंडाचा मोबदला संबंधित बिल्डरला टीडीआर किंवा एफएसआयच्या स्वरुपातच देते. त्यासाठी महानगरपालिका आणि महाराष्ट्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना आहेत. मात्र, ते न जुमानता हे प्रकरण घडले त्यामुळे याची चौकशी व्हावी, अशी मागणी भाजपातर्फे सोमैया यांनी केली.

सरनाईक यांना मुख्यमंत्री वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत -
एनएसीएलमध्ये मोहित अगरवाल आस्था गृप आणि प्रताप सरनाईक यांच्या गृपने छोट्या गुंतवणुकदारांचे पैसे अडवून तब्बल 250 कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. इतकेच नव्हे तर सरनाईक यांनी अनेक घोटाळे केले आहेत. 175 कोटींचा एमएमआरडीए घोटाळा, 250 कोटींचा एनएसीएल घोटाळा हा हजार कोटींपेक्षाही जास्त असू शकतो. म्हणूनच सरनाईक हे ईडीसमोर चौकशीला जात नाही आहेत, असा आरोप भाजप नेते किरीट सोमैया यांनी केला आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार त्यांना वाचवत असल्याची टीकाही त्यांनी केली.

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.