मुंबई - कंगना रणौत मालमत्ता कारवाई प्रकरणाची सुनावणी येत्या सोमवार (28 सप्टेंबर) पर्यंत तहकूब करण्यात आली आहे. कंगनाच्या वकिलाने आज न्यायालयात युक्तीवाद सादर केला. मुंबई पालिकेने इतक्या लवकर काम कसे केले. एक दिवस आधी सर्वेक्षण केले आणि दुसर्याच दिवशी आपण कारवाई केली. कंगनाच्या कार्यालयाचे सर्वेक्षण करण्यासाठी गेलेले बीएमसीचे अधिकारी कोण आहेत? असा प्रश्न उच्च न्यायालयाने विचारला. हे प्रकरण पहिल्यांदा पाहिल्यावर असे दिसते की, चुकीच्या हेतूने ही कारवाई केली गेली आहे.
कंगनाचे वकील म्हणाले की, ही कृती संशयास्पद आहे, कंगना महाराष्ट्र सरकार आणि शिवसेनेच्या विरोधात उभी होती. त्यामुळे बीएमसीला शस्त्र बनविण्यात आले आहे.
काय म्हणाले कंगणाचे वकील
- कंगनाविरुद्धची कारवाई बेकायदेशीर आहे
- मालमत्तेवरील कारवाईनंतर सदर मालमत्तेची केली पाहणी
- 2017 साली कंगनाने सदर मालमत्ता विकत घेतली, 2018 साली सदर मालमत्ता दुरुस्ती करायची परवानगी महापालिकेकडे मागितली
- 2019 साली महापालिकेने परवानगी दिली
- 2020 मधील कंगणाने केलेल्या प्रशासनावरच्या टीकेमुळे महापालिकेने ही कारवाई केली
- कंगनाच्या जीवाला धोका आहे, तिला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. त्यामुळे विशेष सुरक्षा कंगनाला द्यावी