मुंबई : लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आजही ब्लॉकमुळे त्रासाला सामोरे जावे लागणार आहे. ट्रॅक सिग्नलिंग आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी, पश्चिम रेल्वे चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल (between Church gate Mumbai Central) स्थानकांदरम्यान (announced Sunday) आज ( 27 नोव्हेंबर 2022 ) रोजी सकाळी 10.35 ते दुपारी 15.35 वाजेपर्यंत अप आणि डाउन धीम्या मार्गांवर पाच तासांचा जंबो ब्लॉक (Jumbo local train block of Western Railway) पाळण्यात येणार आहे.
ब्लॉक कालावधीत चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या मार्गावरील गाड्या जलद मार्गावर चालवल्या जातील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही उपनगरीय गाड्या रद्द राहतील. प्रवास सुरू करताना वरील व्यवस्था लक्षात, अशी विनंती पश्चिम रेल्वेच्या वतीने प्रवाश्यांना करण्यात आली आहे. याबाबत पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी माहिती दिली की, 'इतर दिवशी लोकल ट्रेन सुरळीत धावण्याकरीता, हा ब्लॉक गरजेचा आहे'.
वीस वर्षापासून मेगाब्लॉक नियमित : मेगा ब्लॉक साधारणत: 20 ते 25 वर्षापासून मध्य आणि पश्चिम रेल्वेवर सुरू झाला. त्याचे कारण असे की, जेव्हा ओव्हरड वायर आणि रूळ मार्ग आणि विविध तांत्रिक गोष्टीमुळे रेल्वेच्या अडचणी समोर यायला लागल्या. या अडचणींना सोडवण्यासाठी मध्य रेल्वे महामंडळाद्वारे निर्णय घेतला गेला की, दर रविवारी देखभाल आणि दुरुस्ती केल्याशिवाय बारा महिने विनाअडथळा रेल्वे धावू शकणार नाही, असा रेल्वे महामंडळाचा दावा (Mega block needs alternative) आहे.