ETV Bharat / state

महापालिकेच्या कोल्डमिक्स प्लांटमध्ये १२८ पैकी ८७ जागा रिक्त, उत्पादनावर परिणाम - Mumbai Municipal Corporation

दरवर्षी पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे भरण्यासाठी पालिका ज्या प्लांटमध्ये कोल्डमिक्स तयार करते, त्या प्लांटमधील १२८ मंजूर पदांपैकी ८७ जागा रिक्त आहेत. त्यामुळे ठरलेल्या लक्षापेक्षा उत्पादन कमी झाल्याचा आरोप, माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केला आहे.

महापालिका
author img

By

Published : Sep 1, 2019, 10:02 PM IST

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडतात. हे खड्डे भरण्यासाठी पालिका ज्या प्लांटमध्ये कोल्डमिक्स तयार करते, त्या प्लांटमधील १२८ मंजूर पदांपैकी ८७ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कोल्डमिक्सच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे यावर्षी ठरवून दिलेल्या लक्षापेक्षा ८९ टक्के उत्पादन कमी झाले असल्याचा आरोप, माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केला आहे.

माहिती देताना माहिती अधिकारी कार्यकर्ते शकील अहमद

मुंबई महानगरपालिका ही देशातील श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळखली जाते. शहरातील रस्ते बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. तर त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वर्षाला शंभर कोटीहून अधिक निधी खर्च केला जातो. पालिका खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्सचा वापर करत होती. मात्र गेले दोन ते तीन वर्ष पालिका कोल्डमिक्स या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे.

गेल्यावर्षीपासून पालिकेने आपल्या वरळी येथील प्लांटमध्ये २७ रुपये प्रति किलो या दराने कोल्डमिक्स बनविण्याचा निर्णय घेतला. पालिकेकडून स्वतः बनवलेल्या कोल्डमिक्सचा वापर खड्डे बुजवण्यासाठी होत आहे. यावर्षी पालिकेने १२०० टन कोल्डमिक्स बनवण्याचा उद्दिष्ट ठेवला होते. मात्र विभाग कार्यालयात कोल्डमिक्स न मिळाल्याने खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने पेव्हर ब्लॉक आणि डेब्रिजचा वापर केला आहे.

पालिकेने बनवलेले कोल्डमिक्स मिळत नसल्याची तक्रार होती. त्यामुळे माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी पालिकेकडून पालिकेच्या प्लांटमध्ये किती कर्मचारी काम करतात, किती जागा रिक्त आहेत, याची माहिती मागवली होती. याबाबत माहिती देताना वरळी येथील प्लांटमध्ये एकूण १२८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ४१ कर्मचारी कार्यरत असून ८७ पदे रिक्त आहेत. या प्लांटची दिवसाला किमान उत्पादन क्षमता ५० मेट्रिक टन असून कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे दररोज सरासरी १०.२० टन कोल्डमिक्स तयार होत असल्याचे कळविण्यात आले आहे. प्लांटमध्ये पदे रिक्त असल्याने कोल्डमिक्सच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शकील अहमद यांनी सांगितले.

तर स्वतः खड्डे भरू

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या म्हणण्यानुसार, वरळी प्लांटमध्ये कोल्डमिक्सचे उत्पादन कमी असल्याने मुंबईचे खड्डे भरले जात नाहीत. कोल्डमिक्सची गुणवत्ता खराब आहे. कोल्डमिक्सने खड्डा भरल्यानंतर पुन्हा खड्डे होत आहेत. याबात पालिकेच्या (@mybmc) ट्विटरवर तक्रार केली. त्यानंतर हा खड्डा २७ ऑगस्ट रोजी भरण्यात आला. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी कोल्डमिक्स निघून गेले आहे. या संदर्भात शकील अहमद शेख यांनी पुन्हा ट्विटरच्या माध्यमातून तक्रार दाखल केली आहे. खड्डे भरले नाही तर आपण स्वतः खड्डे भरू असा इशारा शकील अहमद यांनी दिला आहे.

२०१९ मधील मासिक उत्पादन व वितरण

जानेवारी २०१९ मध्ये एकूण १६६.५० मेट्रिक टन उत्पादन झाले, आणि १४३.५० मेट्रिक टन वितरण झाले. फेब्रुवारी २०१९ मध्ये एकूण १४३.४० मेट्रिक टन उत्पादन झाले, आणि १९१.२५ मे.टन वितरण झाले. मार्च २०१९ मध्ये एकूण ३१०.१० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि ३२४.५० मे.टन वितरित केले गेले. एप्रिल २०१९ मध्ये एकूण ४४४.९० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि ३७८ मेट्रिक टन वितरण झाले. मे २०१९ मध्ये एकूण ५८१.४० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि ५८३ मेट्रिक टन वितरण झाले. जून २०१९ मध्ये एकूण १९०.३० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि २८४ मे.टन वितरित केले.

Intro:मुंबई - मुंबईत पावसाळ्यात दरवर्षी रस्त्यावर खड्डे पडतात. हे खड्डे भरण्यासाठी पालिका ज्या प्लांटमध्ये कोल्डमिक्स तयार करते त्या प्लांटमधील १२८ मंजूर पदांपैकी ८७ जागा रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे कोल्डमिक्सच्या उत्पादनावर परिणाम झाला असून यावर्षी ठरवून दिलेल्या लक्षापेक्षा ८९ टक्के उत्पादन कमी झाले असल्याचा आरोप माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी केला आहे. Body:मुंबई महानगरपालिकेची देशातील श्रीमंत अशी महानगरपालिका म्हणून ओळख आहे. मुंबईमधील रस्ते बांधणीसाठी आणि दुरुस्तीसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात. तर त्या रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी वर्षाला शंभर कोटीहून अधिक निधी खर्च केला जातो. पालिका खड्डे बुजवण्यासाठी हॉटमिक्सचा वापर करत होती. गेले दोन ते तीन वर्ष पालिका कोल्डमिक्स या तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. गेल्या वर्षीपासून पालिकेने आपल्या वरळी येथील प्लांटमध्ये २७ रुपये प्रति किलो या दराने कोल्डमिक्स बनवण्याचा निर्णय घेतला. पालिकेने स्वतः बनवलेले कोल्डमिक्स खड्डे बुजवण्यासाठी वापरत आहे. यावर्षी पालिकेने १२०० टन कोल्डमिक्स बनवण्याचा उद्दिष्ट ठेवले होते. मात्र कोल्डमिक्स विभाग कार्यालयात मिळाले नसल्याने खड्डे बुजवण्यासाठी पालिकेने पेव्हर ब्लॉक आणि डेब्रिजचा वापर केला आहे.

पालिकेने बनवलेले कोल्डमिक्स मिळत नसल्याची तक्रार असल्याने माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांनी पालिकेकडून पालिकेच्या प्लांटमध्ये किती कर्मचारी काम करतात, किती जागा रिक्त आहेत याची माहिती मागवली होती. याबाबत माहिती देताना वरळी येथील प्लांटमध्ये एकूण १२८ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ४१ कर्मचारी कार्यरत असून ८७ पदे रिक्त आहेत. या प्लांटची दिवसाला किमान उत्पादन क्षमता ५० मेट्रिक टन असून कर्मचार्‍यांच्या कमतरतेमुळे दररोज सरासरी १०.२० टन कोल्डमिक्स तयार होत आहे असल्याचे कळविण्यात आले आहे. प्लांटमध्ये पदे रिक्त असल्याने कोल्डमिक्सच्या उत्पादनावर परिणाम होत असल्याचे शकील अहमद यांनी सांगितले.

कोल्डमिक्स उत्पादन -
जानेवारी २०१९ मध्ये एकूण १६६.५० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि १४३.५० मेट्रिक टन वितरण झाले. फेब्रुवारी २०१९ मध्ये एकूण १४३.४० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि १९१ .२५ मे.टन वितरण झाले. मार्च २०१९ मध्ये एकूण ३१०.१० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि ३२४.५० मे.टन वितरित केले गेले. एप्रिल २०१९ मध्ये एकूण ४४४.९० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि ३७८ मेट्रिक टन वितरण झाले. मे २०१९ मध्ये एकूण ५८१.४० मेट्रिक टन उत्पादन झाले आणि ५८३ मेट्रिक टनचे वितरण झाले. जून २०१९ मध्ये एकूण १९०.३० मे.टन उत्पादन झाले आणि २८४ मे.टन वितरित केले.

तर स्वतः खड्डे भरू -
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या म्हणण्यानुसार, वरळी प्लांटमध्ये कोल्डमिक्सचे उत्पादन कमी असल्याने मुंबईचे खड्डे भरले जात नाहीत. कोल्डमिक्सची गुणवत्ता खराब आहे. कोल्डमिक्सने खड्डा भरल्यानंतरच पुन्हा खडे होत आहेत. याबात पालिकेच्या (@mybmc) ट्विटरवर तक्रार केली. त्यानंतर हा खड्डा २७ ऑगस्ट रोजी भरला, परंतु त्याच दिवशी संध्याकाळी कोल्डमिक्स निघून गेले आहे. या संदर्भात शकील अहमद शेख यांनी पुन्हा ट्विटरवरच्या माध्यमातून तक्रार दाखल केली आहे. खड्डे भरले नाही तर आपण स्वतः खड्डे भरू असा इशारा शकील अहमद यांनी दिला आहे.

बातमीसाठी माहिती अधिकार कार्यकर्ते शकील अहमद यांचा बाईट Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.