मुंबई Naresh Goyal News : ईडीनं जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल यांना आज ईडी कोठडी संपत असताना विशेष न्यायालयात हजर केलं. ईडीनं आणखी कोठडी वाढवून न मागितल्यानं त्यांना विशेष न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिलीय. नवी मुंबईतील तळोजा कारागृहाऐवजी भायखळा येथील ऑर्थर तुरुंगात पाठवण्याची विनंती नरेश गोयल यांच्या वकिलांनी केली. ही विनंती न्यायालयानं मान्य केलीय.
कॅनरा बँकेमध्ये बेकायदेशीर कर्ज उचलणे, पैशाची हेराफेरी करणे या आरोपात ईडीकडून नरेश गोयल यांना आज पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आलं. पीएमएलए न्यायालयाचे न्यायाधीश एम. जी. देशपांडे यांनी गोयल यांना 14 दिवसांची म्हणजे 28 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीनं कोठडी दिलीय. तसेच पत्नीसोबत रोज काही काळ बोलण्याची परवानगी न्यायालयाने दिली.
गोयल यांच्याकडून न्यायालयात दोन अर्ज दाखल- नरेश गोयल यांनी न्यायालयाकडं अर्ज करत रोज डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणीची परवानगी मागितली आहे. तसेच आरोग्याच्या समस्या असल्यानं रोज वैद्यकीय सुविधा पुरवाव्यात अशी विनंतीही गोयल यांनी केलीय. अर्जातील माहितीप्रमाणं गोयल यांच्या डाव्या मुख्य धमनीत ८० टक्के ब्लॉकेज असल्यानं रुग्णालयात यापूर्वी शस्त्रक्रियादेखील करण्यात आली होती. घरून आलेले अन्न घेण्याची परवानगी मागणारा दुसरा अर्ज देखील नरेश गोयल यांनी केलाय. त्यावर न्यायालयानं ईडीला उत्तर देण्यास सांगितलयं.
न्यायालयात काय झाला युक्तीवाद?- ईडीकडून युक्तीवादात म्हटले की, अनेक घोटाळे नरेश गोयल यांच्या यांच्या नावावर आहेत. त्यांनी बँकांची रक्कम एकत्रित करून कर्ज उचलून मोठी हेराफेरी केलीय. तर कन्सल्टिंग फीच्या नावाने 2500 कोटी रुपयेचे उचललेले कर्ज त्यांनी रिपेमेंटसाठी वापरलं. आज तिसऱ्यांदा न्यायालयात नरेश गोयल यांना हजर करण्यात आले. त्यावेळी नरेश गोयल यांच्यावतीने वकील नाईक वकिल आबाद फोंडा यांनी बाजू मांडली की त्यांची शारीरिक स्थिती नाजूक आहे. वय भरपूर झालं आहे. त्यांच्या पत्नीला कॅन्सर झालेला आहे. त्यामुळे त्याच्या आधारावर न्यायालयाने विचार करावा. तळोजा तुरुंगात नको, ऑर्थर रोड तुरूंगात कोठडी मिळावी, अशी त्यांनी विनंती केली.
न्यायालयानं काय दिले आदेश? न्यायालयानं आपल्या आदेश पत्रात हेदेखील नमूद केलं की, त्यांना डॉक्टरांनी निश्चित केलेली औषधे तुरूंगात मिळतील. घरगुती जेवण त्यांना मिळू शकेल. रोज सकाळी आठ ते नऊ या काळामध्ये 15 मिनिट आरोपी नरेश गोयल हे पत्नी अनिता यांना भेटू शकतात. त्यांची उपलब्धतेची खात्री संबंधित अधिकारी फोनद्वारे करेल. जे जे सरकारी रुग्णालयामध्ये आरोपीची नियमित तपासणी केली जाईल. जर अति गंभीर आजार असेल आणि खासगी उपचाराची गरज वाटल्यास तसा सरकारी वैद्यकीय अधिकाऱ्यानं अहवाल दिल्यास तेव्हा विचार केला जाईल.
हेही वाचा-