ETV Bharat / state

IPS Deven Bharti: देवेन भारती यांच्याकडे मोठी जबाबदारी, मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती - आयपीएस अधिकारी देवेन भारती

तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis) यांनी देवेन भारती ( Special Police Commissioner Of Mumbai ) यांच्यावर मोठी जबाबदारी टाकली होती. निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर त्यांची बदली ( Deven Bharti Appointed As A Special Police Commissioner ) थांबवण्यासाठीही राज्य सरकारने प्रयत्न केले होते. त्यानंतर पुन्हा निवडणूक आयोगाने बदलीचे आदेश दिल्याने त्यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली होती. आता मात्र देवेन भारती ( IPS Deven Bharti Appointed SCP ) यांच्यासाठी पहिल्यांदा मुंबई विशेष पोलीस आयुक्तपद निर्माण करण्यात आले आहे.

IPS Deven Bharti
आयपीएस अधिकारी देवेन भारती
author img

By

Published : Jan 4, 2023, 5:16 PM IST

Updated : Jan 4, 2023, 8:09 PM IST

मुंबई - महाराष्ट्राच्या गृह विभागाने आज 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती ( IPS Deven Bharti Appointed SCP ) यांची मुंबई पोलिसांच्या विशेष आयुक्तपदी नियुक्ती केली. राज्य सरकारने प्रथमच विशेष मुंबई पोलीस आयुक्तपद ( Special Police Commissioner Of Mumbai ) निर्माण केले आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांना यापूर्वी मुंबई पोलीस, कायदा व सुव्यवस्था विभाग आणि आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त तसेच गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती. त्याचप्राणे यापूर्वी ते महाराष्ट्र एटीएसचे प्रमुखही होते.

विशेष पोलीस आयुक्त पदाची निर्मिती राज्यातील सत्तांतरानंतर विविध सरकारी विभागांमध्ये मोठे फेरबदल होत असल्याचे दिसत आहे. पोलीस प्रशासनातही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. अशातच वरिष्ठ आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केली गेली आहे. एटीएसच्या प्रमुखपदासह अनेक महत्त्वाच्या पदांवर राहिलेल्या देवेन भारती यांना सामावून घेण्यासाठी विशेष पोलीस आयुक्त हे पद तयार करण्यात आले आहे.

देवेन भारतींच्या खांद्यावर महत्त्वाच्या पदांची धुरा देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) हे राज्याचे मुख्यमंत्री असताना २०१४ ते २०१९ या काळात देवेन भारती यांच्या खांद्यावर अनेक महत्त्वाच्या पदांची धुरा सोपवण्यात आली होती. सुरुवातीला सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) या पदाची जबाबदारी सांभाळत असलेल्या भारती यांना नंतर अतिरिक्त डीजीपी म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात हलवण्यात आले. लोकसभा निवडणुका ( Lok Sabha Election ) जाहीर होताच एकाच पदावर तीन वर्षापेक्षा अधिक कार्यकाळ झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या इतरत्र बदल्या करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जाहीर केले होते. मात्र, देवेन भारती ( Deven Bharti Appointed Special Police Commissioner ) यांचा दांडगा अनुभव लक्षात घेता त्यांना या आदेशातून वगळण्यासाठी राज्य सरकारने खूप प्रयत्न केले. सरकारची विनंती मान्यही करण्यात आली होती. तरीदेखील निवडणुकीच्या वेळी पुन्हा निवडणूक आयोगाने बदलीचे आदेश दिल्याने देवेन भारती यांना त्यावेळी आर्थिक गुन्हे शाखेची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

Last Updated : Jan 4, 2023, 8:09 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.