ETV Bharat / state

माझ्या मतदारसंघात एकाही डॉक्टरवर हल्ला होणार नाही, खासदार शेवाळेंनी घेतली जबाबदारी - चेंबूर

जागतिक डॉक्टर दिनानिमीत्त मुंबईत रविवारी चेंबूर येथे खासदार राहुल शेवाळे यांच्यातर्फे 'डायलॉग विथ डॉक्टर्स' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात देशभरात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत उपस्थित डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. सोबतच यावर काय उपाययोजना करण्यात येईल? याबाबत चर्चाही करण्यात आली.

जागतिक डॉक्टर दिन
author img

By

Published : Jun 30, 2019, 9:04 PM IST

मुंबई - "माझ्या मतदारसंघात एकाही डॉक्टरवर हल्ला होणार नाही, जर शिवसैनिकाने असा हल्ला केला तर त्याची जबाबदारी देखील मी घेईन", अशी खात्री खासदार राहुल शेवाळे यांनी डॉक्टरांना दिली.

international-doctors-day-celebrates-in-mumbai
मुंबईत 'डायलॉग विथ डॉक्टर्स' कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक डॉक्टर दिवसानिमीत्त रविवारी चेंबूर येथे खासदार राहुल शेवाळे यांच्यातर्फे 'डायलॉग विथ डॉक्टर्स' हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने यांचासह मुंबईतील अनेक नामवंत सरकारी आणि खासगी रुग्णलायचे डॉक्टर्स मोठ्या संख्येने आले होते.

जागतिक डॉक्टर दिनानिमीत्त मुंबईत 'डायलॉग विथ डॉक्टर्स' कार्यक्रमाचे आयोजन

देशात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत यावेळी सर्वच डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर यावर काय उपाययोजना करण्यात येईल? याबाबत चर्चा करण्यात आली. डॉक्टरांनी त्यांना रोज समोर येणाऱ्या अनेक समस्या या ठिकाणी मांडल्या. उपस्थित डॉक्टरांना भारतीय संविधानाच्या प्रती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी डॉ. लहाने यांनी नागरिकांना डॉक्टरांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

'रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा' असली तरी सध्या डॉक्टरांवर होत असलेले हल्ले पाहता लोकप्रतिनिधींनी याबाबत पुढे येणे गरजेचे होते. या कार्यक्रमातून डॉक्टरांनी अनेक समस्या उपस्थित केल्या. त्या सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार शेवाळे यांनी सांगितले. पालिकेची रुग्णालये, दवाखाने अद्ययावत करून वैद्यकीय सेवेवर येणरा ताण कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले म्हणाले.

Intro:मुंबई ।
माझ्या मतदार संघात एकाही डॉक्टरवर हल्ला होणार नाही, जर शिवसैनिकाने असा हल्ला केला तर त्याची जबाबदारी देखील घेईन, अशी खात्री खासदार राहुल शेवाळे यांनी डॉक्टरांना दिली.
जागतिक डॉक्टर दिवस निम्मित आज चेंबूर येथे खासदार राहुल शेवाळे यांच्यातर्फे 'डायलॉग विथ डॉक्टर्स' हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला प्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने यांचासह मुंबईतील अनेक नामवंत सरकारी आणि खाजगी रुग्णलायचे डॉक्टर्स मोठ्या संख्येने आले होते.Body:देशात डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत या वेळी सर्वच डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली. त्याच बरोबर याबाबत काय उपाययोजना करण्यात येईल? या बाबत चर्चा करण्यात आली.या वेळी डॉक्टरांनी त्यांना रोज समोर येणाऱ्या अनेक समस्या या ठिकाणी मांडल्या. उपस्थित डॉक्टराना भारतीय संविधानाच्या प्रती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला .या वेळी डॉ. लहाने यांनी नागरिकांना डॉक्टरांचा सन्मान करण्याचे आवाहन केले.

रुग्ण सेवा ईश्वर सेवा ... असली तरी सध्या डॉक्टरांवर होत असलेले हल्ले पाहता लोकप्रतिनिधींनी या बाबत पुढे येणे गरजेचे होते. अशा कार्यक्रमातून डॉक्टरांनी अनेक समस्या उपस्थित केल्या. त्या सरकारपुढे मांडण्याचा प्रयत्न करणार असल्याचे खासदार शेवाळे यांनी सांगितले. पालिकेची रुग्णालये , दवाखाने अद्ययावत करून वैद्यकीय सेवेवर येणाआ ताण कमी करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले म्हणाले.

बाईट
डॉ तात्याराव लहाने
खासदार राहुल शेवाळे
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.