मुंबई - मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक संजीव मित्तल यांनी आज मुंबई विभागातील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस व कल्याण स्थानकादरम्यानच्या उपनगरी भागाची (सेक्शन) विकास कामांची वार्षिक तपासणी केली. विभागांचे प्रधान प्रमुख आणि मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक शलभ गोयल आपल्या मुंबई विभागातील अधिकारी यांच्या पथकासह या वेळी उपस्थित होते. ही तपासणी कोविड -१९ च्या अनिवार्य सर्व नियमांनुसार केली गेली.
रोड अपघाती निवारण ट्रेनचे उद्घाटन
संजीव मित्तल यांनी मध्य रेल्वेच्या हेरिटेज लेन, पर्यावरण आणि हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट स्टॉल, आयआरएसडीसी स्टॉल, इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन, एस्केलेटर, बॅगेज सॅनिटायझर मशीन, एक्झिक्युटिव्ह लाऊंज, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स कार्यालय, सीएसएमटी यार्ड रीमॉडलिंग डिस्प्लेची पाहणी केली. तसेच, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकात नेत्रदीपक अशा प्रकाशित साइन बोर्ड व रोड अपघाती निवारण ट्रेनचे उद्घाटन देखील केले.
भायखळा रेल्वे स्थानकाची पाहणी
संजीव मित्तल यांनी ‘आय लव्ह मुंबई’ या शायना एनसी यांच्या नेतृत्वात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने भायखळा स्थानकाच्या हेरिटेज जीर्णोद्धाराच्या कामाच्या प्रगतीची पाहणी केली आणि कामाच्या तपशीलाबद्दल चर्चा केली. भायखळा स्थानकातील पादचारी पूल आणि नव्याने बसविलेल्या एस्केलेटरचीही त्यांनी तपासणी केली.
ट्रॅकमेनना प्रोत्साहन
मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात, संजीव मित्तल यांनी व्हीआयपी रूमचे उद्घाटन केले, वेटिंग हॉलची तपासणी केली, सेफ्टी स्टॉलवर डीएमपी पुस्तक २०२१ प्रकाशित केले. मेकॅनिकल स्टॉल, इलेक्ट्रिकल स्टॉल, ऑपरेटिंग स्टॉलना भेट दिली. त्यांनी कमर्शियल स्टॉलवर इलेक्ट्रिक व्हेइकल्सची पाहणी केली. तसेच ट्रॅकमेनना प्रोत्साहन व प्रेरणा दिली.
संपूर्ण स्थानक महिलांद्वारे परिचालित अशा माटुंगा स्थानकात संजीव मित्तल यांनी महिला कर्मचार्यांशी संवाद साधला आणि महिलांच्या सुरक्षिततेसाठी ई-बुकचे उद्घाटन केले. शीव स्थानकाच्या फलाट क्र. ४ वर प्रोजेक्ट मुंबई यांनी चितारलेल्या पेंटिंग्जची पाहणी केली. रेल्वे कर्मचारी निवासी कॉलनीला भेट दिली. नवीन कम्युनिटी हॉलचे उद्घाटन केले. निवासी घरांची व खेळाच्या मैदानाची पाहणी केली. शीव स्थानक, फूट ओव्हर ब्रिज, रोड ओव्हर ब्रिज आणि स्थानक परिसराची पाहणी करीत असताना कॅपेसिटर बँकेचे उद्घाटन केले. तसेच टीआरडी, कार्मिक, स्टोअर्स व लेखा स्टॉल्सन संजीव मित्तल यांनी भेट दिली.
बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि ड्रोन प्रात्यक्षिक
घाटकोपर स्थानकात रेल्वे कर्मचाऱ्यांची भेट घेतली. नंतर मुलुंड स्टेशन व रेल्वे सुरक्षा दलाच्या परिसराला भेट दिली. त्यांनी शस्त्रे आणि दारूगोळा स्टॉल्सच्या प्रदर्शन, ईएमयू कारशेड आणि टीआरओ स्टॉल्सची पाहणी केली. सौर पॅनेलच्या प्रतिष्ठानांची, आरपीएफ बॅरेक्सची देखील तपासणी केली. खुल्या मैदानावर सुरक्षा संबंधित बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड आणि ड्रोन प्रात्यक्षिकेच्या कामांची प्रात्याक्षिके पाहिली.
रेल्वे शाळेची पाहणी
एमआरव्हीसीचे ठाणे - दिवा विभागातील पाचव्या व सहाव्या मार्गावरील सादरीकरण पाहिले. नंतर त्यांनी ठाणे ते मुंब्रा दरम्यानचा बोगदा, मुंब्रा खाडी पूल, पारसिक ते दिवा दरम्यान वक्र मार्ग आणि किलोमीटर ४१ येथील लहान पुलाची पाहणी केली. दिवा स्थानकाजवळ त्यांनी लेव्हल क्रॉसिंग गेटचीही पाहणी केली. तसेच मित्तल यांनी कल्याण येथील रेल्वे स्कूल येथे, वातानुकूलित प्रेक्षागृह, प्रयोगशाळेचे उद्घाटन केले. त्यांनी राजभाषा स्टॉल्सना भेट दिली. सेल्फ प्रोपेल्ड अपघात निवारण ट्रेन (SPARME) पनवेलचे उद्घाटन केले. तसेच, मालवाहतूक व परिचालन स्टॉलला भेट दिली.