ETV Bharat / state

Uday Samant On BMC Tanker Scam : मुंबईतील शेकडो कोटींच्या टँकर गैरव्यवहारांची चौकशी होणार; उदय सामंत यांची घोषणा

मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत टँकर लॉबी सक्रिय आहे. ज्यांच्याकडून महिन्याला हजारो कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी केली जाते. या टँकर माफियांची अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, अशा इशारा नगर विकास खात्याचे मंत्री उदय सामंत यांनी आज (शुक्रवारी) विधानसभेत केली.

Uday Samant On BMC Tanaker Scam
टॅंकर घोटाळा
author img

By

Published : Mar 24, 2023, 7:02 PM IST

मुंबई: शहरामध्ये गेल्या काही वर्षांपासून टँकर माफिया प्रशासनावर वरचढ ठरत आहेत. हजारो कोटी रुपयांच्या पाण्याची चोरी होत असल्याबाबत भाजपचे आमदार एडव्होकेट अशी शेलार यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी बोलताना अशी शेलार म्हणाली की, मुंबईतील दोन प्रभागांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाण्याचा प्रकल्प राबविण्यात आला. त्यापैकी एक मुलुंड आणि वांद्रे पश्चिम या दोन भागांची निवड करण्यात आली. मात्र हे दोन्ही प्रकल्प यशस्वी ठरले आहेत. यासाठी दीडशे कोटी रुपये सल्लागाराला देण्यात आले. तर अडीचशे कोटी रुपये कंत्राटदाराला दिले. म्हणजे साधारण चारशे कोटीपेक्षा जास्त रक्कम खर्चूनही महापालिकेचे हे प्रकल्प यशस्वी झाले आहेत. उलट वांद्रे पश्चिम येथे ज्या लोकांना पाणी मिळत होते त्या वेळेत बदल केल्यामुळे आता लोकांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.

दशलक्ष लिटर पाणी वाया: मुंबईमध्ये गळतीमुळे सुमारे 30 टक्के म्हणजे 500 दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. ते पाणी वाचवण्यासाठी महानगरपालिका काही प्रयत्न करणार का, असा सवालही शेलार यांनी यावेळी उपस्थित केला. मुंबई शहरात 1900 विहिरी असून साडेबारा हजार बोअरवेल आहेत. केंद्रीय भूजल विभागाने केलेल्या पाहणीत असे दिसून आले की, या बोरवेलमधून 80 कोटींची चोरी केली जाते. याचा अर्थ मुंबईतून दररोज दहा हजार कोटी रुपये पाणी चोरीला जाते. या टँकर माफियांवर कारवाई करणार का? अशा प्रश्नही त्यांनी विचारला.

सर्वसामान्यांचा मूलभूत हक्क : या संदर्भात बोलताना वर्षा गायकवाड यांनीही सरकारला आणि महापालिकेला जबाबदार ठरवत पाणी मिळणे हा सर्वसामान्यांचा मूलभूत हक्क आहे आणि धारावीसारख्या वस्तीत या हक्कापासून गरिबांना वंचित ठेवले जाते. यासंदर्भात सरकारने ताबडतोब उपाययोजना कराव्या, अशी मागणीही त्यांनी केली.

अतिरिक्त आयुक्तांमार्फत चौकशी करणार: टँकर माफिया बाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, पाण्याच्या चोरीची चौकशी केली जाईल. तसेच पाणी का वाया जाते, त्याबद्दल सर्वकश विचार केला जाईल. वांद्रे पश्चिममधील पाण्याचे वेळापत्रक बदलण्याच्या सूचना महापालिकेला केल्या जातील. मुंबईमध्ये होणाऱ्या पाण्याच्या चोरीबद्दल अतिरिक्त महापालिका आयुक्त मार्फत पाणीमाफियांची चौकशी केली जाईल, असेही सामंत म्हणाले.

हेही वाचा: Pune Crime : धक्कादायक! कोयत्याने वार करुन तरुणाचा पंजा तोडला...'हे' होते वैमनस्याचे कारण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.