ETV Bharat / state

नालेसफाईच्या वाढीव दराच्या निविदांची चौकशी, बेजबाबदार कंत्राटदारांना 'काळ्या यादी'त टाकण्याची मागणी

मुंबईत यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना नालेसफाई करण्यात आली. नालेसफाईसाठी कामगार मिळत नसतानाही कंत्राटदारांनी नालेसफाई केल्याचा दावा पालिका प्रशासनाचा आहे. नालेसफाईचा दावा केल्यानंतरही यावर्षी मुंबई अनेकवेळा तुंबली. त्यानंतरही पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना जास्त रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता.

MUMBAI MNC
मुंबई मनपा
author img

By

Published : Nov 18, 2020, 9:17 PM IST

Updated : Nov 18, 2020, 10:36 PM IST

मुंबई - दरवर्षी पावसाळ्यात नालेसफाई केल्यानंतरही मुंबईची तुंबते. यामुळे नालेसफाईच्या कामांवर नेहमीच टीका होत आली आहे. मंगळवारी स्थायी समितीच्या बैठकीत पाणी तुंबण्याचे प्रकार का घडतात? असा सवाल करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. नालेसफाईत बेजबाबदारपणा करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका? अशी मागणी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केली. त्यावर २८ ते ३० टक्के वाढीव किमतीच्या निविदांची चौकशी करून अहवाल सादर करा, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पालिका प्रशासनाला दिले.

विरोधी पक्षनेते रवी राजा आणि स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव याबाबत प्रतिक्रिया देताना.

नालेसफाईवर सत्ताधारी नाराज -

मुंबईत यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना नालेसफाई करण्यात आली. नालेसफाईसाठी कामगार मिळत नसतानाही कंत्राटदारांनी नालेसफाई केल्याचा दावा पालिका प्रशासनाचा आहे. नालेसफाईचा दावा केल्यानंतरही यावर्षी मुंबई अनेकवेळा तुंबली. त्यानंतरही पालिका प्रशासनाने कंत्राटदारांना जास्त रक्कम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला होता. वाढीव दरामुळे पालिकेला नाहक आर्थिक फटका बसत असल्याचे सांगत सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी संबंधित प्रस्ताव प्रशासनाकडे फेरविचारार्थ परत पाठवण्याची उपसूचना मांडली. प्रशासनाच्या चुकीच्या नियोजनामुळे वांद्रे पश्चिमचे पाणी पूर्वमध्ये येत असल्याचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर म्हणाले. एच पूर्व भागातील चमडावाला नाला, गोळीबार नाला, वाकोला नदीच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. तर चतुर्थ श्रेणी कामगारांची भरती करून नालेसफाई केल्यास परिणामकारक काम होईल, असे राजूल पटेल म्हणाल्या.

हेही वाचा - 2022 मध्ये मुंबई पालिकेत भाजपचीच सत्ता - फडणवीस

कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका -

नालेसफाई यावेळी झाली नसल्याचा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला आहे. यावर्षी कोरोनाची परिस्थिती असताना कामगार नसल्याने कंत्राटदारांनी नालेसफाई कशी केली? गाळ कुठे नेवून टाकला? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. नालेसफाईच्या नावाखाली कंत्राटदार मुंबईकर करदात्यांच्या पैशांची लूट करीत असल्याने कंत्राटदारांना वाढीव पैसे देऊ नका? त्यांच्या कामाची चौकशी करून कंत्राटदारांना काळ्या यादीत टाका? अशी मागणी रवी राजा यांनी केली. यावेळी भाजपाचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट, यांनीदेखील नालेसफाईबाबत संताप व्यक्त केला.

कामचुकार कंत्राटदारांची बिले रोखा -

पालिका नालेसफाईसाठी लाखो रुपये खर्च करीत असताना कंत्राटदारांच्या बेजबाबदारपणामुळे पालिकेवर आरोप केले जातात. त्यामुळे अशा कामचुकार कंत्राटदारांची बिले रोखा, अशी मागणी यावेळी सदस्यांनी केली. निविदा भरणाऱ्यांमध्ये एकमेव ठेकेदार वेगवेगळ्या नावांनी निविदा सादर करीत असल्याचे निदर्शनास येते. या प्रकारांची चौकशी करावी, पालिकेचे अभियंते-अधिकारी आणि कामगारांची भरती करून नालेसफाई करावी, असे निर्देशही स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले. तर यावर्षी लॉकडाऊनच्या काळात मजुरांची कमतरता, त्यांची कोरोना चाचणी अशा कामामुळे खर्चवाढ झाल्याचे अतिरिक्त आयुक्त पी. वेलरासू यांनी सांगितले.

Last Updated : Nov 18, 2020, 10:36 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.