मुंबई बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्सने चार महिन्यांहून अधिक काळानंतर बुधवारी महत्त्वपूर्ण 60 हजार अंकां वर पोचला. अमेरीका आणि भारत या दोन्ही देशांमध्ये आणि भारतीय भांडवली बाजारात परदेशी निधीच्या नव्या प्रवाहाने गुंतवणूकदारांच्या सकारात्मक भावना वाढल्याचे पहायला मिळत आहे. महागाईतील घसरणीमुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेत थोडे बदल पहायला मिळू शकतात. भारतात, महागाईतील घसरण, क्रूडचा घसरणारा दर, मजबूत वाढीचा वेग, चांगला मान्सून असे घटक परीणाम करु शकतात.
जुलैच्या सुरुवातीपर्यंत, विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार FPIs प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आर्थिक धोरण कडक करणे, डॉलरची वाढती मागणी आणि उच्च परतावा यासह विविध कारणांमुळे गेल्या नऊ ते दहा महिन्यांपासून भारतीय बाजारांमध्ये सातत्याने समभागांची विक्री करत होते. यूएस बॉण्ड्स मधे 2022 मध्ये आतापर्यंत 1,75,653 कोटी रुपयांच्या इक्विटी काढल्या आहेत असे एनएसडीएल NSDL च्या अहवालातुन समोर आले आहे. ऑगस्टमध्ये आतापर्यंत त्यांनी आणखी 36,716 कोटी रुपयांच्या इक्विटी खरेदी केल्याचे दिसुन येते
हेही वाचा Cryptocurrency Prices Today बिटकॉईनचे दर झाले कमी जाणून घ्या किती आहेत बिटकॉईनचे दर