ETV Bharat / state

'अंतर्गत गुणांमुळेच दहावीच्या निकालाचा फुगवटा वाढला' - १० वीच्या निकालात वाढ

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाचा निकाल हा मागील सहा वर्षांतील सर्वात विक्रमी निकाल लागला आहे. राज्यात एकुण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षांच्या तुलनेत केवळ अंतर्गत गुण देण्यात आल्याने १८.२ टक्के इतका जास्त आहे.

increase in the result of 10th class  due to internal marks
अंतर्गत गुणांमुळेच दहावीच्या निकालाचा फुगवटा वाढला
author img

By

Published : Jul 29, 2020, 6:35 PM IST

मुंबई - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. यंदाचा निकाल हा मागील सहा वर्षांतील सर्वात विक्रमी निकाल लागला आहे. राज्यात एकुण ९५.३० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, मागील वर्षांच्या तुलनेत केवळ अंतर्गत गुण देण्यात आल्याने १८.२ टक्के इतका जास्त आहे. राज्य शिक्षण मंडळाने यंदा सर्वच विषयाला अंतर्गत गुण देण्यात आल्याने हा निकाल वाढला असल्याचे शिक्षण तज्ज्ञांकडून सांगण्यात आले.

मागील वर्षी दहावीचा निकाल हा अंतर्गत गुण देण्यात न आल्याने तो ७०.१० टक्के इतका लागला होता. यामुळे यावर खूप टीका झाल्या होत्या. शिक्षण विभागाने यात बदल करुन यंदा पुन्हा 20 गुणांची अंतर्गत मूल्यमापन परीक्षा घेतली. हे गुण विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात दिल्याने दहावीच्या निकालाचा फुगवटा पुन्हा वाढला असल्याचे सांगण्यात येते.

राज्यभरात देण्यात आलेल्या अंतर्गत गुणांमुळे यंदा राज्याचा निकाल हा 18.2 टक्के तर मुंबई विभागाचा निकाल 19.68 टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळेच राज्यातील शिक्षण मंडळाच्या सर्वच नऊ विभागात 75 टक्के ते त्याहून अधिक गुण मिळवणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे. तर 8 हजार 360 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे.

राज्य शिक्षण मंडळाचा 2015 नंतर यावर्षी दहावीच्या निकालाची टक्केवारी 90 हून अधिक आहे. यंदा राज्यातील तब्बल 83 हजार 262 विद्यार्थ्यांना 90 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळाले असून गेल्यावर्षीपेक्षा ही संख्या कित्येक पटीने जास्त आहे. यंदाही मुलांच्या तुलनेत मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाणही जास्त आहे. यंदा मुलींचा निकाल 96.91 तर मुलांचा निकाल 93.90 टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी अधिक आहे.

गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज....
ऑनलाइन निकालानंतर दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांची छायांकित प्रति, पुनर्मूल्यांकन व स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार आहे. तर या अर्जाचे शुल्क ऑनलाइन पद्धतीने भरावे लागणार आहे. गुणपडताळणी ऑनलाइन अर्जकरता येतीलय त्याची मुदत 30 जुलै ते 8 ऑगस्टपर्यंत असणार आहे. यासाठी 50 रुपये शुल्क मंडळाकडे जमा करावे लागणार आहे. उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागणीसाठी 30 जुलै ते 18 ऑगस्ट या कालावधीत विद्यार्थांना अर्ज करावा लागणार आहे.

असा आहे विभागीय निकाल..‍

विभाग - उत्तीर्ण विद्यार्थी - टक्केवारी

1) पुणे - 2 लाख 50 हजार 168 - 97.34 टक्के
2) नागपूर - 1 लाख 51हजार 444 - 93.84 टक्के
3) औरंगाबाद - 1 लाख 69 हजार 991 - 92.00 टक्के
4) मुंबई - 3 लाख 20 हजार 284 - 96.72 टक्के
5) कोल्हापूर - 1 लाख 30 हजार 751- 97.64 टक्के
6) अमरावती - 1 लाख 59 हजार 313- 95.14 टक्के
7) नाशिक 1 लाख 3 गहजार 26 - 93.73 टक्के
8) लातूर 1 लाख 77 हजार 73- 93.09 टक्के
9) कोकण- 3 लाख 36 हजार 86 - 98.77 टक्के
एकुण - 1501105 95.30

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.