ETV Bharat / state

Spinal Bifida Disease: देशात ४० ते ५० हजार बालकांना होतो जीवघेणा स्पायना बायफिडा आजार - Lilavati Hospital and Research Centre

आईच्या पोटातून जन्म घेताना वर्षभरात ४० ते ५० हजार बालकांना जीवघेणा स्पायनल बायफिडा हा आजार होतो. यामुळे स्पायनल कॉडमध्ये गुंतागुंत, प्यारेलिसीस, ब्रेन मध्ये पाणी होणे असे आजार होतात. वर्षभरात हा आजार झालेल्या ३० टक्के मुलांचा मृत्यू होतो. हा आजार जीवघेणा असला तरी यावर योग्य प्रकारे उपचार आणि उपाययोजना केल्यास ८० टक्के बालकांचा जीव वाचू शकतो अशी माहिती बाल रोगतज्ञ डॉ. संतोष करमरकर यांनी दिली.

Spinal Bifida Disease
स्पायना बायफिडा आजार
author img

By

Published : Feb 2, 2023, 10:13 AM IST

Updated : Feb 2, 2023, 11:10 AM IST

जीवघेणा स्पायनल बायफिडा आजार

मुंबई: स्पायनल बायफिडा या आजारात जन्मजात बालकांना प्यारेलिसीस हा आजार झालेला असतो. हा आजार झाला असला तरी अनेक पालक तसेच आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना याबाबत योग्य माहिती नसल्याने तसेच जनजागृती नसल्याने त्यावर वेळीच उपचार मिळत नाहीत. यामुळे बालकांच्या आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण होतो. मात्र आईच्या पोटात २० आठवड्यापर्यंत करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये बालकाला काही त्रास जाणवल्यास बाळ पोटात असतानाच ऑपरेशन करून बालकाला या आजारापासून वाचवता येते. तसेच लग्न झालेल्या बाईने फोलिक एसिड या व्हिटॅमिनच्या गोळ्या घेतल्यास तीच्या बाळाला या आजारापासून वाचवता येवू शकते अशी माहिती डॉ. करमकर यांनी दिली.

प्यारेलिसीस पासून वाचवता येते: ज्या महिलेच्या पोटात असलेल्या बाळाला काही अडचणी असल्याचे समोर आले तर, त्याचे त्याचवेळी ऑपरेशन करून बालकावर एक छोटेसे ऑपरेशन करून त्याला पुन्हा पोटात टाकले जाते. यामुळे जन्माच्या नंतर त्या बालकाला प्यारेलिसीस सारख्या आजारापासून वाचवता येते. तर अशा आजारापासून मुक्त झालेली मुले शिक्षण घेत आहेत. काही व्हील चेअरवर बसून शिक्षण घेत आहेत. यातील काहीही डॉक्टर बनण्याची इच्छा बोलून दाखवल्याचे डॉ. करमकर यांनी सांगितले.

मोफत तपासणीचा लाभ घ्या: लीलावती हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्यावतीने १२ व १३ जानेवारीला चेकअप आणि इतर चाचण्या केल्या जाणार आहेत. त्यानंतर ऑपरेशनची गरज भासल्यास त्यात काहीं रुग्णांना रक्कमेत सूट दिली जाईल, तर काही रुग्णांवर मोफत उपचार केले जाणार आहेत. यासाठी लिलावती रुग्णालयाकडून खासगी कंपन्यांचा फंड वापरला जाणार आहे. लिलावती रुग्णालयात या आजारावर उपचार करण्यासाठी लागणारी डॉक्टरांची टीम असल्याने योग्य प्रकारचे उपचार करता येत आहेत. येत्या १२ व १३ फेब्रुवारीला स्पायनल बायफिडा आजार झालेल्या मोफत चेकअप आणि स्क्रिनिंग केली जाणार आहे. तसेच त्यानंतर होणारी ऑपरेशन ज्यांना शक्य आहे त्यांना सवलतीच्या दरात तर ज्यांना शक्य नाही त्यांच्यावर मोफत केली जाणार असल्याची माहिती रुग्णालयाचे सी ई ओ डॉ. रवीशंकर यांनी दिली.

संशोधक काय म्हणतात: स्पायना बायफिडामध्ये पाठीचा मणका आणि मेरुदंड व्यवस्थित विकसित होत नाही. या दोषाला न्यूरल ट्यूब दोष या श्रेणीत सामील केले गेले आहे. ही ट्यूब म्हणजे भ्रूणची एक संरचना आहे जी बाळाचे मस्तक आणि मेरुदंड विकसित करते. संशोधक असे मानतात की बाळाच्या परिवारातील स्वास्थ्य समस्या, वातावरण आणि आईच्या शरीरातील फॉलिक अ‍ॅसिडची कमतरता या गोष्टी कारणीभूत असतात. सोबतच जर गर्भावस्थेच्या काळात फिट्स येण्याची औषधं घेतली तरी बाळाला न्यूरल ट्यूब डिफेक्ट होण्याची शक्यता वाढते.

हेही वाचा: Precautions For Girls Healthy Teenage मुलींचे निरोगी बालपण भविष्यासाठी आवश्यक जाणून घ्या तज्ञांचा सल्ला

Last Updated : Feb 2, 2023, 11:10 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.