ETV Bharat / state

खूशखबर... एसटीच्या भरतीमध्ये आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य

राज्यातील दुष्काळी आणि वाढत्या शेतकरी आत्महत्यांची स्थिती लक्षात घेता, महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाने पीडित परिवारातील मुलांना आणि मुलींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याचे निवेदन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

मुंबई
author img

By

Published : Jun 25, 2019, 9:23 PM IST

मुंबई - दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यातील ४४१६ तसेच कोकणातील जिल्हे वगळता इतर ९ जिल्ह्यांतल्या ३६०६ अशा एकूण राज्य परिवहन महामंडळामध्ये ८०२२ चालक आणि वाहकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार आहे. याबाबतची माहिती परिवहन मंत्री रावते यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील दुष्काळी आणि वाढत्या शेतकरी आत्महत्यांची स्थिती लक्षात घेता, महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाने पीडित परिवारातील मुलांना आणि मुलींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याचे निवेदन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधानसभेत दिले.

राज्यातील बेरोजगार तरुण, विधवा महिला, हुतात्मा जवानांचे वारस, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस, दुष्काळग्रस्त भागाताली तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती रावतेंनी यावेळी दिली. तसेच २०१६-१७ मध्ये चालक आणि वाहक पदाची चाचणी उत्तीर्ण असलेल्या ९४५ तसेच किरकोळ त्रुटीच्या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या आणि वाहन चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८७८ अशा एकूण १८२३ उमेदवारांना कोकण प्रदेशांतर्गत विभागात सामावून घेण्यात येणार असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले.

गेल्या पाच वर्षांत सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन परिवहन विभागाने एकूण ३८,१९८ लोकांना रोजगार दिला आहे. त्याचबरोबर परवाना वाटप २,६४,५६९ आणि बॅच वाटप ३,५८,३७६ अशी एकूण ६ लाख २२ हजार ९४५ इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केल्याचे रावते यांनी सांगितले.

महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २१ आदिवासी युवतींना एसटीमध्ये चालकपदी नियुक्ती देण्यासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरु केले आहे. या प्रशिक्षणात युवतींना अटी आणि शर्तींमध्ये शिथिलता दिली असून प्रशिक्षणाच्या दरम्यान मोफत पास, गणवेश आणि विद्यावेतन दिले जाणार असल्याची माहिती रावते यांनी दिली.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना अंमलात आणण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या योजनेव्दारे ३९२ अर्जदारांना ऑटोरिक्षाचे परवाने वितरित केले आहेत. तसेच परिवहन विभागाव्दारे मागील साडे चार वर्षात ३ लाख ५८ हजार ३७६ ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांना बँजेस देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यात २ लाख ३२ हजार ०३९ रिक्षांचे व ४९०१ टॅक्सीचे परवाने जारी करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.

Intro:एसटीच्या भरतीमध्ये आत्महत्याग्रस्त आणि दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य

मुंबई २५

राज्यातली दुष्काळाची आणि वाढत्या शेतकरी आत्महत्यांची स्तिथी लक्षात घेता महाराष्ट राज्य परिवहन महामंडळाने पीडित परिवारातल्या मुलांना आणि मुलींना रोजगाराची मोठी संधी उपलब्ध करून दिल्याचे निवेदन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी मंगळवारी विधानसभेत केले . दुष्काळग्रस्त १२ जिल्ह्यातील ४४१६ तसेच कोकणातील जिल्हे वगळता इतर ९ जिल्ह्यांतल्या ३६०६ अशा एकूण राज्य परिवहन महामंडळामध्ये ८०२२ चालक आणि वाहकांच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून या भरतीमध्ये दुष्काळग्रस्त जिल्ह्यांतील उमेदवारांना तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना प्राधान्य देण्यात येणार असल्याची माहिती परिवहन मंत्री रावते यांनी विधानसभेत दिली.

राज्यातील बेरोजगार तरुण, विधवा महिला, शहीद जवानांचे वारस, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे वारस, दुष्काळग्रस्त भागाताली तसेच सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी परिवहन विभागाने केलेल्या उपाययोजनांची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. तसेच २०१६-१७ मध्ये चालक आणि वाहक पदाची चाचणी उत्तीर्ण असलेल्या ९४५ तसेच किरकोळ त्रुटीच्या तपासणीनंतर पात्र ठरलेल्या आणि वाहन चाचणी उत्तीर्ण झालेल्या ८७८ अशा एकूण १८२३ उमेदवारांना कोकण प्रदेशांतर्गत विभागात सामावून घेण्यात येणार असल्याचेही रावते यांनी स्पष्ट केले .

गेल्या पाच वर्षांत सामाजिक बांधिलकी लक्षात घेवून परिवहन विभागाने एकूण ३८,१९८ रोजगार दिला आहे . त्याचबरोबर परवाना वाटप २,६४,५६९ आणि बॅच वाटप ३,५८,३७६ असा एकूण ६ लाख २२ हजार ९४५ इतक्या मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती केल्याचे रावते यांनी सांगितले .

महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी २१ आदिवासी युवतींना एसटीमध्ये चालकपदी नियुक्ती देण्यासाठी सहा महिन्यांचे प्रशिक्षण सुरु केले आहे. या प्रशिक्षणात युवतींना अटी आणि शर्तींमध्ये शिथिलता दिली असून प्रशिक्षणाच्या दरम्यन मोफत पास, गणवेश आणि विद्यावेतन दिले जाणार असल्याची माहितीही रावते यांनी दिली.

राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध होण्यासाठी हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे निराधार स्वावलंबन योजना अंमलात आणण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या योजनेव्दारे ३९२ अर्जदारांना आँटोरिक्षाचे परवाने वितरित केले आहेत. तसेच परिवहन विभागाव्दारे मागील साडे चार वर्षात ३ लाख ५८ हजार ३७६ आँटोरिक्षा व टँक्सी चालकांना बँजेस देण्यात आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. तसेच राज्यात २ लाख ३२ हजार ०३९ रिक्षांचे व ४९०१ टॅक्सीचे परवाने जारी करण्यात आल्याचे रावते यांनी सांगितले.Body:.....Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.