ETV Bharat / state

Risk Of Heart Attack : गुलाबी थंडीचा आस्वाद घ्या, पण हृदय सांभाळा!, डॉक्टरांचा सल्ला - Doctor advice

गुलाबी थंडीच्या दिवसांमध्ये पहाटे मॉर्निंग वॉक करताय ? मात्र जरा जपुन. थंडीत रक्तवाहिन्या कमी तापमानामुळे आकुंचन पावतात (In cold blood vessels constrict due to low temperature) आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवू (lead to risk of heart attack) शकतो, असे डॉक्टरांचे (Doctor advice) मत आहे. Risk Of Heart Attack

Risk Of Heart Attack
हृदय संभाळा
author img

By

Published : Nov 15, 2022, 6:51 PM IST

मुंबई : राज्यात गुलाबी थंडीला सुरुवात झाली असून; या थंडीचा आस्वाद घेण्यासाठी अनेक जण पहाटे मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने या थंडीचा मनमुराद आनंद घेताना दिसून येत आहेत. परंतु हा आनंद घेत असताना हृदयविकार असणाऱ्या लोकांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे. यादरम्यान रक्तवाहिन्या कमी तापमानामुळे आकुंचन पावतात (In cold blood vessels constrict due to low temperature) व त्यामुळे हृदयविकाराचा धोका उद्भवू (lead to risk of heart attack) शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे. म्हणून गुलाबी थंडीचा आस्वाद घ्या, पण हृदय जपा, असा प्रेमाचा सल्ला डॉक्टर (Doctor advice) देतात आहेत. Risk Of Heart Attack

प्रतिक्रिया व्यक्त करतांना नागरीक व डॉक्टर

ज्येष्ठांची संख्या अधिक : वयाची पन्नाशी गाठल्यानंतर उद्भवणारे विविध आजार नियंत्रणात आणण्यासाठी मॉर्निंग वॉक हा प्रमुख पर्याय डॉक्टर सुचवतात व यानिमित्ताने अनेक ज्येष्ठ नागरिक किंवा पन्नाशी ओलांडलेले नागरीक सकाळी चालायला विविध ठिकाणी मोकळ्या जागेत, मैदानात, पार्कमध्ये जातात. मुंबईतील जोगेश्वरी येथील हेमंत करकरे उद्यानामध्ये अनेक वर्षापासून न चुकता वरिष्ठ नागरिकांची एक टीम दररोज मॉर्निंग वॉक करायला येते. हे सर्व ज्येष्ठ नागरिक थंडीच्या दिवसातही वॉक चा आनंद घेताना दिसतात. विशेष म्हणजे यांना आता या वॉकची सवय झाली असून; ३६ लोकांच्या या ग्रुपमध्ये ७६ वर्षाचा सर्वात लहान व ५० वर्षाचा म्हातारा आहे, असं मजेत हे लोक सांगतात.

चाला मात्र प्रमाणात : शरीराला चालण्याची गरज आहे. सकाळी फ्रेश होण्यासाठी चालणे व व्यायाम करणे हा चांगला पर्याय आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक सुनील नलावडे यांच्या म्हणण्यानुसार त्यांना मधुमेहाचा, उच्च रक्तदाबाचा त्रास अनेक वर्षापासून होता. परंतु त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार चालायला व व्यायाम करायला सुरुवात केल्याने, हा त्यांचा आजार बऱ्या प्रमाणात कमी झाला असून आता ते एकदम तंदुरुस्त आहेत. परंतु ज्या दिवशी त्यांनी चालण बंद केलं त्या दिवशी त्यांची तब्येत बिघडते, म्हणूनच तब्येतीला व्यवस्थित ठेवण्यासाठी चालण्याचा मनमुराद आनंद घेताना ते दिसत आहेत. परंतु सध्या थंडी सुरू झाली असून; या थंडीमध्ये जास्त चालल्याने हृदयावर ताण पडू शकतो व त्याने हृदयविकाराचा झटका ही येऊ शकतो, म्हणून चालले पाहिजे पण ते प्रमाणात असेही ते सांगतात.

रक्तवाहिन्या आकुंचन पावतात : डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार लोकांमध्ये चालण्याचा उत्साह असतो. त्यांना भल्या पहाटे चालायला व्यायाम करायला आवडतं. परंतु या उत्सवाचे रूपांतर अति उत्साहात होता कामा नये. सकाळी थंड वातावरणात आपले शरीर विशेष रूपाने कार्य करत असते. अशा दरम्यान रक्तवाहिन्या आकुंचीत पावलेल्या असताना अचानक त्यावर दबाव आला तर ते शरीरासाठी घातक होऊ शकते. त्याचबरोबर सकाळच्या वेळी रक्त गोठण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतं. तसेच जर व्यवस्थित झोप झाली नसेल, तर पहाटे चालणे सुद्धा धोकादायक असू शकते, म्हणूनच चालण्याचा मनमुरात आनंद घेत असताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे ही दुर्लक्ष करून चालणार नाही.

अटॅक येण्याचा धोका : जास्त चालण्याची तयारी नसताना, जास्त तणाव घेतल्याने सुद्धा शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो, असंही डॉक्टर निशिकांत विभुते यांनी सांगितलं आहे. तसेच थंडीच्या दिवसात कमी तापमानामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात म्हणून या काळात शक्यतो मेहनतीची कामे करताना इतरांची मदत घ्या. कारण या कारणाने हृदयावर ताण येऊ शकतो. रक्तवाहिन्या आकुंचन पावलेल्या असल्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होण्यास अडथला निर्माण होतो व त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका निर्माण होतो. ज्यांना हृदयविकाराच्या तक्रारी असतील अशा लोकांनी विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असेही डॉक्टर विभुते यांनी सांगितले आहे. Risk Of Heart Attack

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.