ETV Bharat / state

आज...आत्ता  रात्री १२ पर्यंतच्या महत्वाच्या बातम्या - rain news

रायगडमध्ये हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश, सिनेसृष्टीतील अभिनेत्रीचाही समावेश. अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू, विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आवाहन. MUMBAI RAIN UPDATE :मुंबईत पावसाचे ३ बळी तर ५ जण जखमी, येत्या ४८ तासांत धुवाँधार. माऊलींच्या पालखीने 'दिवेघाट' केला पार, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी. ये भगवा रंग...भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे बीसीसीआयकडून अनावरण.

महत्वाच्या बातम्या
author img

By

Published : Jun 28, 2019, 11:44 PM IST

रायगडमध्ये हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग्‍ज रॅकेटचा पर्दाफाश, सिनेसृष्टीतील अभिनेत्रीचाही समावेश

रायगड - एका हायप्रोफाईल सेक्‍स आणि ड्रग रॅकेटचा रायगड पोलीसांच्‍या स्‍थानिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेने पर्दाफाश केलाय. याप्रकरणी 5 महिलांसह 9 जणांना पोलीसांनी अटक केली आहे. वेश्‍या व्‍यवसायासाठी आणलेल्‍या 7 मुलींची रवानगी कर्जतच्‍या सुधारगृहात करण्‍यात आली आहे. यामध्‍ये सिनेक्षेत्रात काम करणाऱ्या मुली असल्‍याची माहिती मिळाली आहे. महत्‍वाचे म्‍हणजे आरोपींकडे 26 ग्रॅम वजनाचे कोकेन सापडले असून त्‍याची बाजारातील किंमत अडीच लाख रूपये इतकी सांगितली जाते. आरोपींना न्यायालयात हजर केले असता 3 जुलै पर्यत पोलीस कोठडी सुनावली. राखी नोटानी, रंजीत सिंह उर्फ रेणु, राजकमल, निकेश मोदी, वरुण अदलखॉ, सईद अमीर रज्जाक तसेच सिमा सिंग, श्रुती गावकर, आरोही सिंग यांना गुन्हयात अटक करण्यात आली आहे. वाचा सविस्तर...

अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू, विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचे शिक्षणमंत्र्यांचे आवाहन

मुंबई - उच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब केल्यानंतर आता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत ही हे आरक्षण लागू झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या आरक्षणासाठी अर्ज दाखल करावेत असे आवाहन शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी विधानसभेत केले आहे. वाचा सविस्तर...

MUMBAI RAIN UPDATE :मुंबईत पावसाचे ३ बळी तर ५ जण जखमी, येत्या ४८ तासांत धुवाँधार

मुंबई - गेले चार महिने उकाड्याने त्रस्त असलेल्या मुंबईकरांना बुधवारी रात्री पासून पडत असलेल्या पावसाने दिलासा दिला आहे. पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केल्याने मुंबईमध्ये अनेक ठिकाणी पाणी तुंबले आहे. ठाण्याच्या मखमली तलाव, मुंबईत सायन, हिंदमाता, अंधेरी, कुर्ला आदी सखल विभागात पाणी साचल्याने बेस्टचे बस मार्ग वळवण्यात आले आहेत. मुंबईच्या लोकल ट्रेनही उशिराने धावत असल्याने मुंबईकरांना आपल्या नियोजित ठिकाणी जाण्यास उशीर लागत आहे. वाचा सविस्तर...

माऊलींच्या पालखीने 'दिवेघाट' केला पार, नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

पुणे - संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गातील सर्वात अवघड असणाऱ्या दिवेघाटाचा रस्ता लाखो वारकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पार केला. टाळ-मृदंगाचा गजर आणि हरिनामाच्या जयघोषात विठुरायाच्या भेटीसाठी निघालेल्या वारकऱ्यांच्या स्वागतासाठी वरूणराजानेही आवर्जून हजेरी लावली होती. वाचा सविस्तर...

ये भगवा रंग...भारतीय संघाच्या नव्या जर्सीचे बीसीसीआयकडून अनावरण

नवी दिल्ली - सध्या चालू असलेल्या आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाचा पुढील सामना इंग्लडविरूद्ध होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ नव्या भगव्या आणि निळ्या रंगाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. आज या नव्या जर्सीचे अनावरण बीसीसीआयकडून ट्विटरद्वारे करण्यात आले आहे. वाचा सविस्तर...

बातमी, सर्वांच्या आधी
www.etvbharat.com/marathi/maharashtra

Intro:मुंबई -
दोन आठवड्याहून अधिक लांबलेल्या पावसाने आज मुंबईला अक्षरशा झोडपून काढले. सकाळपासून पावसाने संततधार ठेवल्याने चाकरमान्यांची चांगलीच धावपळ उडाली. पहिल्या पावसांतच मुंबईत अनेक सखल भागात पाणी साचले. यामुळे रेल्वे उशिराने धावत होत्या. सकल भागात काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने बेस्ट वाहतूक वळवण्यात आली. पावसामुळे शॉर्टसर्किटच्या दुर्घटना घडल्या असून त्यात तीन जणांचा मृत्यू झाला आहे, तर ५ जण जखमी झाले आहेत. दरम्यान येत्या २४ तासात जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.Body:जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची प्रतीक्षा असते. मात्र जून संपता संपता पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळपासूनच पावसाने मुंबईला झोडपून काढल्याने हिंदमाता, घाटकोपर, कुर्ला, मुलुंड, चेंबूर, वांद्रे, सायन, वडाळा, अंधेरी सब वे, मिलन सबवे, बोरिवली, मानखुर्द, परळ, दादर आदी सखल भागात पाणी साचले होते. सखल भागात पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूक वळवण्यात आली. अंधेरी सबवेत कंबरेपर्यंत पाणी साचल्याने येथील वाहतुकीचा खोळंबा झाला. येथील मोगरा नाला तुंबल्याने परिसरात पाण्याचा निचरा होणे कठीण झाले आणि परिसरात पाणीच पाणी साचले होते. चेंबूरच्या पी. एल. लोखंडे मार्ग, शेल कॉलनी येथे रस्त्यावर पाणी तुंबले होते. पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतूक वळवण्यात आली होती. भांडुप, कांजूरमार्ग येथील रेल्वे ट्रकमध्ये पाणी भरल्याने या मार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. वाहतूक कोंडीमुळे कार्यालयात नियोजित वेळेत पोहचण्यास उशिर झाला.

दिवसभरात पडलेला पाऊस -
शहर विभागापेक्षा पूर्व आणि पश्चिम उपनगरात जास्त प्रमाणात पाऊस पडला आहे. गेल्या २४ तासात शहरात ३.५० मिलिमीटर पूर्व उपनगरात १८.२३ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात १०.६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळी ८ वाजल्यापासून ११ पर्यंत शहरात ३४.२३ मिमी, पूर्व उपनगरात ६४.१४ मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात ७८.२१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून वरळी अग्निशमन केंद्र येथे २७, पूर्व उपनगरात चेंबूर अग्निशमन केंद्र येथे २५ तर पश्चिम उपनगरात गोरेगांव येथे ३४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पाण्याचा निचरा करण्यासाठी ६१ पंपाचा वापर -
सखल भागात साचलेल्या पाण्याचा निचरा करण्यासाठी ६१ पंपाचा वापर करण्यात आला. शहरात १०, पूर्व उपनगरात ३० तर पश्चिम उपनगरात २१ पंप सुरू करून साचलेल्या पाण्याचा निचरा करावा लागला.

या ठिकाणी साचले पाणी -
शहरात माझगाव चाळ नंबर ५२ अे, ताडदेव बीएमसी गॅरेज, पूर्व उपनगरमध्ये सायन सोनापूर गल्ली, शितल टॉकीज, साकिनाका, घाटकोपर पश्चिम बर्वे नगर, पश्चिम उपनगरात नॅशनल कॉलेज बांद्रा, अंधेरी मेट्रो स्टेशन, मिलन सबवे, अंधेरी सब वे, हिंदमाता, चेंबूर, मुलुंड, वांद्रे, आदी ठिकाणी पाणी साचण्याच्या तक्रारी पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे नोंद झाल्या.

पाणी साचल्याने बस मार्ग वळवले -
ठाण्याच्या मखमली तलाव येथे पाणी साचल्याने ४९४ व ४९९ हे दोन मार्ग वंदना टॉकीज येथून फिरवण्यात आले. मुंबईत सायन रोड क्रमांक २४ येथे पाणी साचल्याने २५,२२,३०२, ३०५ आणि २१३ हे मार्ग मुख्य रस्त्याने वळवण्यात आले. हिंदमाता येथे पाणी साचल्याने बस क्रमांक १,४ ,५ ,६ ,७,८ ,११, २१ हे मार्ग हिंदमाता पुलावरून तसेच शिवडीला जाणाऱ्या बस मार्ग २१२, २१३, ४० हे शारदा टॉकीज व दादरच्या मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालय येथून वळवण्यात आल्या.

विजेच्या धक्क्याने तीन जणांचा मृत्यू -
दिवसभरात विजेच्या धक्क्याने पाच पैकी तीन जणांचा मृत्यू झाला. तर दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. पश्चिम उपनगरांत अंधेरी पश्चिम येथे सकाळी पावणे आठच्या सुमारास आण्णा नगर, आरटीओ कार्यालय समोर विजेच्या धक्क्याने काशिमा युडीयार (६०) या महिलेचा मृत्यू झाला. तर गोरेगाव पूर्व येथील दुर्गामाता मंदिराच्या मागे चार जणांना विजेचा धक्का लागला. यातील राजेंद्र यादव (६०), संजय यादव (२४) या दोघांचा मृत्यू झाला तर आशादेवी यादव (५) व दिपू यादव (२४) हे दोघे जखमी झाले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. शॉक लागल्यावर एकमेकांना वाचवताना यादव कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला आहे.

भिंत कोसळून तीन जण जखमी -
दादर येथील सेनापती बापट मार्गावरील कामगार मैदान येथे संरक्षक भिंत कोसळून तीन जण जखमी झाले. जखमींना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. चंद्रकांत तोडवले (३५), विजय नागर (३५) व चेतन ताठे (२८) अशी जखमींची नावे आहेत.

सोबत p2c Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.