ETV Bharat / state

Abu Azmi Criticize on Government : हिंदू व्होट बॅंकेसाठीच माहीमच्या मजारीवर कारवाई : अबू आझमी यांची टीका - Abu Azmi Criticize on Government

समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी माहिमच्या मजारीवर होणाऱ्या कारवाईबद्दल सरकारवर जोरदार टीका केली. त्यांनी ई-टीव्ही भारतशी बोलताना सांगितले की, तत्काळ कारवाई करण्याचे एकमेव कारण म्हणजे असे केल्याने हिंदूंची व्होट बॅंक वाढते. ही एक प्रकारची स्ट्रॅटर्जी आहे, ज्यामुळे मतदान वाढवले जाते.

Abu Azmi Criticize on Government
अबू आझमी यांची सरकारवर टीका
author img

By

Published : Mar 23, 2023, 4:35 PM IST

Updated : Mar 23, 2023, 10:38 PM IST

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्क येथील गुढीपाडव्याच्या सभेत माहीम दर्ग्याच्या मागे खाडीत एका धार्मिक स्थळाचे अनधिकृत बांधकाम होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. हे अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी एक महिन्याचा अवधी दिला असता, मुंबई महानगरपालिका, पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांनी २४ तासांच्या आत हे अनधिकृत बांधकाम हटवले आहे. याबाबत समाजवादी पक्षाचे नेते, आमदार अबू आझमी यांनी सांगितले आहे की, राज ठाकरे यांनी मुद्दा उपस्थित केल्यावर अशा पद्धतीचे अनधिकृत बांधकाम लगेच हरवले जाते. पण, अशी अनेक अनधिकृत बांधकामे मुंबईत आहेत. त्यावरही कारवाई व्हायला पाहिजे. फक्त हिंदू-मुसलमान असा भेदभाव करून चालणार नाही.

हिंदू मुसलमान एकत्र नांदायला पाहिजेत : देशात, जगात शांती पाहिजे तर हिंदू मुसलमान एकत्र नांदायला पाहिजेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या उत्तर प्रदेशातून येतात त्या ठिकाणी हिंदू देवदेवतांची अनेक मंदिर आहेत व तिथे मुस्लिमांची संख्या सुद्धा जास्त आहे. परंतु अशा पद्धतीने भेदभाव करणे योग्य नाही असेही ते म्हणाले आहेत. त्यांच्याशी खास बातचीत आमच्या प्रतिनिधींनी केली. त्यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह या सरकारवर जोरदार टीका केली.

हिंदू-मराठी मतदारांची दिशाभूल : हिंदूत्ववादी असणारे हे नेते आता हिंदूंना मारले जात आहे. पनवेलनजीक एका मुलीला मारण्यात आले तेथे आरोपींवर कारवाई करण्यात आली नाही. एका मनुष्यासाठी सर्व उत्तर भारतीयांना दोषी ठरवून त्यांना घराबाहेर काढणे. त्यांना मारहाण करणे, हे अत्यंत अयोग्य आहे. असा अन्याय केला तर हे लोक नक्कीच त्यांना अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाहीत. हे हिंदू-मुसलमान या समाजात भाईचारा, प्रेमसंबंध वाढवण्याऐवजी त्यामध्ये फूट पाडून वाद वाढवण्याचे काम करीत आहेत.

नितेश राणेंवर जोरदार टीका : नितेश राणेंनी केलेल्या विधानावर त्यांनी जोरदार टीका करीत त्यांना खडे बोल सुनावले. नितेश राणेंनी मराठी माणूस मुंबईतून बाहेर चालला आहे, तर मुसलमान लोकांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले. यावर अबू आझमी यांनी नितेश राणेंवर टीका करीत. समाजात भाईचारा वाढवण्याचे आवाहन केले., तसेच, नितेश राणेंना लवकर मुख्यमंत्री व्हायचे असल्याने ते अशी विधाने करीत आहेत. यामुळे दोन समाजात फूट पडत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : Mahim Dargah Encroached Demolition: माहीम दर्ग्याजवळील अनधिकृत बांधकाम पाडले! वाचा, काय आहे मजार?

Last Updated : Mar 23, 2023, 10:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.