मुंबई - कोरोनाच्या लढ्यात जीवाची बाजी लावून लढणाऱ्या डॉक्टर-आरोग्य कर्मचाऱ्यांच्याच जिवावर काही जण उठले आहेत. रुग्णसेवा देणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला होत आहे. याची गंभीर दखल घेत अखेर केंद्र सरकारने कोविड-19 साठी काम करणाऱ्या डॉक्टरांवर हल्ला करण्याऱ्यांना कठोर शिक्षेची तरतूद केली आहे. हीच तरतूद कायमस्वरूपी केंद्र स्तरावर करावी अशी मागणी आता इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रने केली आहे.
कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर आयएमए आक्रमक झाली होती. अशा आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत डॉक्टरांनी व्हाइट अलर्ट आणि काळा दिवस पाळण्याचा इशारा दिला होता. पण त्याआधीच केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेत कायदा कडक केला आहे. 1897 साथीचे रोग प्रतिबंध कायद्यात बदल करत डॉक्टरांवर हल्ले करणाऱ्या विरोधातील शिक्षा आणखी कठोर केली आहे. त्यानुसार आता 3 महिने ते 7 वर्षे कैद तसेच 50 हजार ते 5 लाख असा दंड आकारण्यात येणार आहे. तर हा गुन्हा दखलपात्र आणि अजामीनपात्र असणार आहे.
केंद्राच्या या निर्णयानंतर आयएमएने समाधान व्यक्त करत बुधवारी व्हाइट अलर्ट आणि काळा दिवस आंदोलन मागे घेतल्याची माहिती आयएमए महाराष्ट्रचे सचिव डॉ. पंकज भांडारकर यांनी दिली आहे. तर आता हा कायदा 1897 साथीचे रोग प्रतिबंध कायद्यापुरता न करता तो केंद्रीय स्तरावर कायमस्वरूपी करावा, अशी मागणी ही त्यानी केली आहे. 22 राज्यांमध्ये असा कायदा आहे. पण केंद्राने कायमस्वरूपी कायदा केल्यास देशाला त्याचा फायदा होईल. त्याची अंमलबजावणी कडक होईल, असे म्हणत ही मागणी केली आहे. कारण डॉक्टरांवरील हल्ला हे नेहमीचीच बाब झाली असून त्याला चाप बसविण्यासाठी हे गरजेचे आहे असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
डॉक्टरांवरील हल्ल्यांबाबत कडक शिक्षेची तरतूद कायमस्वरूपी करावी, आयएमएची मागणी - mumbai doctors
कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या डॉक्टरला मारहाण झाल्यानंतर आयएमए आक्रमक झाली होती. अशा आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी करत डॉक्टरांनी व्हाइट अलर्ट आणि काळा दिवस पाळण्याचा इशारा दिला होता.