ETV Bharat / state

माहिम मच्छिमार नगर परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात - म्हाडा

माहिम मच्छिमार नगर परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे.

अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात
author img

By

Published : Mar 31, 2019, 7:28 PM IST

मुंबई - अनधिकृत बांधकाम मुंबई शहरात आपल्याला जागोजागी पाहावयास मिळते. या अनधिकृत बांधकाम पाडल्यामुळे किंवा या बांधकामामुळे संकट ओढवले की प्रशासन जागे होते हे आपल्याला मुंबई शहरात वेळोवेळी दिसते. अशाच एका माहीम येथील अनधिकृत बांधकामाला नागरिक कंटाळले आहेत. वारंवार या बांधकामाबद्दल संबधित म्हाडा व बीएमसी प्रशासनाला तक्रार करूनदेखील यावर कारवाई केली जात नाही, असे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांचे जीव धोक्यात

माहिम मच्छिमार नगर (इमारत क्र. २२ब/११६१) येथे शंकर धडके यांनी पूर्वकडे व उत्तरेकडे इमारतीच्या तळमजल्यावरील सामायिक जागेत अनधिकृत बांधकाम केले. तर पश्चिमेकडे इमारतीच्या परिसरात झोपडीधारकांच्या झोपड्यांमुळे नियमित वर्दळीला मोठी बाधा निर्माण झाली आहे. दुर्दैवाने येथे एखादी आपत्ती उद्भवल्यास मदत पोहोचू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याविरोधात इमारतीतील व गुरुदत्त कोळी समाज रामगड येथील नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबईचे पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री-राज्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे. तरीदेखील म्हाडा प्रशासन या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नाही. एखाद्याचा जीव किंवा एखादी अपरिचित घटना घडल्यावर यावर कारवाई होणार का ?असे स्थानिक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.

यावर संबंधित प्रशासनाला स्थानिक लोक तक्रार करूनही प्रशासनाचे अधिकारी इकडे फिरत देखील नाहीत. तसेच प्रशासनाच्या गलथान व्यवहारामुळे हे प्रशासन या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांना फूस लावून आहे की काय हाही प्रश्न यामुळे उपस्थित होत आहे.

याबाबत नागरिकांनी म्हाडा व मुंबई महापालिकेसह इतर संबधित यंत्रणांकडे इमारत क्र. २२ ब, माहिम मच्छिमार नगर व गुरुदत्त कोळी समाज, रामगड परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिसरातील निकेत ताडेल, मोहन सोनी, दिनेश वाघेला, राजन पारकर, राज सकपाळ, महेश ठाकूर, अनिसा सय्यद, अलका ओडावेकर, भरत केणी, अशफाक शेख, मकसूद सय्यद, संगिता पाटील, जावेद शेख आणि आनंद साळवी यांच्यासह इतर नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर पालकमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे निवेदनाद्वारे हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी यंत्रणांना आदेश देण्याची विनंती केली आहे. याचे आता पुढे काय होते हे पाहणे उचित ठरेल.

Intro:
माहिम मच्छिमार नगर, परिसरातील अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांचे जीवन धोक्यात

मुंबई

अनधिकृत बांधकाम मुंबई शहरात आपल्याला जागोजागी पहावयास मिळत.या अनधिकृत बांधकाम पडल्यामुळे किंवा या बांधकामुळे संकट ओढवले की प्रशासन जागं होत हे आपल्याला मुंबई शहरात वेळोवेळी दिसतं.अशाच एका माहीम येथील अनधिकृत बांधकामाला नागरिक कंटाळले आहेत,वारंवार या बांधकामाबद्दल संबधित म्हाडा व बीएमसी प्रशासनाला तक्रार करून देखील यांवर कारवाई केली जात नाही असं स्थानिक नागरिकांचं म्हण आहे.

माहिम मच्छिमार नगर, इमारत क्र. २२ब/११६१ शंकर धडके यांनी पूर्वकडे व उत्तरेकडे इमारतीच्या तळमजल्यावरील सामायिक जागेत अनधिकृत बांधकाम आणि पश्चिमेकडे इमारतीच्या परिसरात झोपडीधारकांनी झोपडीचे नियमित वर्दळीला मोठी बाधा निर्माण झाली आहे. दुर्दैवाने येथे एखादी आपत्ती उद्भवल्यास मदत पोहचू शकणार नाही, अशी परिस्थिती निर्माण केली जातआहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या विरोधात इमारतील व गुरुदत्त कोळी समाज रामगड येथील नागरिकांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, मुंबईचे पालकमंत्री, गृहनिर्माण मंत्री-राज्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे न्याय देण्याची मागणी केली आहे.तरी देखील म्हाडा प्रशासन या अनधिकृत बांधकामावर कारवाई करत नाही एखाद्याचा जीव किंवा एखादी अपरिचित घटना घडल्यावर यांवर कारवाई होणार का ?अस स्थानिक लोक प्रश्न उपस्थित करत आहेत.

यावर संबंधित प्रशासनाला स्थानिक लोक तक्रार करतात परंतु प्रशासनाचे अधिकारी हिकडं फिरत देखील नाहीत व प्रशासनाचा या गलथान व्यवहारामुले हे प्रशासन या अनधिकृत बांधकाम करणाऱ्या लोकांना फूस लावून आहे की काय हाही प्रश्न यामुळे पडतो.

याबाबत नागरिकांनी मुंबई म्हाडा व मुंबई महापालिकेसह इतर संबधित यंत्रणांकडे इमारत क्र. २२ब, माहिम मच्छिमार नगर व गुरुदत्त कोळी समाज रामगड परिसरातील नागरिकांनी तक्रार केल्यानंतरही कुठलीच कार्यवाही करण्यात आलेली नाही. परिसरातील निकेत ताडेल, मोहन सोनी, दिनेश वाघेला, राजन पारकर, राज सकपाळ, महेश ठाकूर, अनिसा सय्यद, अलका ओडावेकर, भरत केणी, अशफाक शेख, मकसूद सय्यद, संगिता पाटील, जावेद शेख आणि आनंद साळवी यांच्यासह इतर नागरिकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई शहर पालकमंत्री सुभाष देसाई, गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्याकडे निवेदनाद्वारे हे अनधिकृत बांधकाम हटविण्यासाठी यंत्रणांना आदेश देण्याची विनंती केली आहे आता पुढे काय होतं हे पाहणं उचित ठरेल.
Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.