मुंबई : शरद पवारांनी पक्षाच्या अध्यक्षपदाच्या राजीनामाची घोषणा केल्यानंतर कार्यकर्त्यांनी राजीनामा अस्त्राचे हत्यार उपसले आहे. शरद पवारांनी अध्यक्षपदी कायम रहावे, अशी मागणी जोर धरली आहे. अध्यक्षपदी राहिल्यास सर्व समाजातील घटकांना योग्य न्याय मिळेल. मात्र, पवार साहेब नसतील तर आपल्याला न्याय मिळेल का? अशी भावना अनेक कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. मुंबईत पत्रकार परिषदेचे बोलत होते.
राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी उद्या बैठक : पक्ष पुढे नेण्यासाठी काहीतरी पावले टाकली पाहिजे अशी शरद पवारांची भूमिका दिसते. त्यामुळे त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला असावा. त्यांच्या मतापासून अजून ते बाजूला गेलेले नाहीत. त्यांची भूमिका काय अजून तरी दिसते. पण महाराष्ट्रातल्या हजारो कार्यकर्त्यांचा फोन करून वेगळ्या प्रकारे आपल्या भावना मांडल्या आहेत. देशभरातील नेत्यांकडून शरद पवारांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा अशा पद्धतीची मागणीवजा विनंती राज्यातील नेत्यांकडून तसेच कार्यकर्त्यांकडून होत आहेत. राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी उद्या एक महत्त्वपूर्ण बैठक प्रदेश कार्यालय होणार आहे. या बैठकीच्यापूर्वी ज्या नावांचा समावेश किंवा ज्या नावांची चर्चा ऐकायला येते त्यामध्ये सर्वात वरती नाव जे आहे खासदार सुप्रिया सुळे, त्यानंतर विरोधी पक्षांचे अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ यांच्या नावाची देखील चर्चा रंगताना पाहायला मिळत आहे.
मी महाराष्ट्रात काम करतो, दिल्ली तसेच दुसऱ्या राज्यांची देखील मला ओळख नाही. माझा संपर्कही दुसऱ्या राज्यांशी नाही. लोकसभेत किंवा राज्यसभेत बसणाऱ्या संसदेत बसून देश बघणाऱ्या व्यक्तीने अनेक जबाबदाऱ्या पार पडलेल्या असतात. तो सर्व अनुभव शरद पवार यांना आहे. त्यांच्यावर लोकांची श्रद्धा, विश्वास आहे. प्रत्येक राज्यातील लोक या पक्षात आलेली आहे. शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम आहेत. आम्ही सर्वच सांगतो असे करणे योग्य नाही. मात्र, पक्ष पुढे नेण्यासाठी काहीतरी पावले टाकली पाहिजे अशी शरद पवारांची भूमिका दिसते. आम्हाला सर्वांना असे वाटते की 2024 च्या सर्व निवडणूक त्यात लोकसभा, विधानसभा होईपर्यंत शरद पवार यांनी स्वतःकडे अध्यक्ष पद कायम ठेवावे. सर्वांना योग्य न्याय देता अशी सर्वांची भावना आहे. मात्र पवार साहेब आपल्या मतावरती ठाम आहे.
पक्षात न्याय मिळेल का : माझ्याकडे पक्ष कार्यालयात राजीनामा आले आहे. शरद पवार नसतील तर, आपल्याला या पक्षात न्याय मिळेल का अशी भावना अनेकांची झाली आहे. म्हणून भीतीपोटी राजीनामा सत्र सुरू झाले आहे. राजीनामा देऊन आपली नाराजी व्यक्त करत आहे. अशा सर्वांची समजूत आम्हाला काढावी लागणार आहे. राष्ट्रीय पातळीवर काम केलेल्या नेत्यांना अध्यक्षपद भूषवावे. राजीनामाच्या निर्णयाचा कोणताही परिणाम महाविकास आघाडी वरती होणार नाही. उद्याच्या बैठकीविषयी मी आता काही बोलणार नाही.
सुप्रिया सुळेंकडून कार्यकर्त्यांची मन धरणी : आज तिसऱ्या दिवशी देखील वाय. बी. सेंटर समोर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केल्याचे चित्र पाहायला मिळते. साहेबांनी राजीनामे मागे घ्यावा यावर कार्यकर्ते ठाम आहे. एका कार्यकर्त्यांनी तर शरद पवारांना आपल्या रक्ताने पत्र लिहले आहे. त्यात राजीनामा मागे घेण्याचे विनंती पत्रातून केली आहे. वाय. बी. सेंटर प्रवेशद्वारवर पक्षाचे कार्यकर्ते घोषणा सुरु होत्या. सर्व कार्यकर्त्यांची भेट सुप्रिया सुळे यांनी घेतली. तुमच्या भावना शरद पवारांपर्यंत पोहोचल्या आहे. आपण कृपया शांत बसाव अशा पद्धतीच्या हातजोडत विनंती यावेळेस त्यांनी केली. यावेळी शरद पवार साहेब तुम्हाला भेटले की, नाही सर्व नेते देखील तुम्हाला भेटले तुमचे ऐकून घेतले. आजच्या दिवस आपल्या घोषणांना स्थगिती दिली पाहिजे. उद्या मी तुमच्यासोबत बसेल 11 वाजता अशी ग्वाही देखील यावेळी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना दिली. उद्या पक्षाची मिटींग आहे. सुप्रिया सुळे यांच्या विनंतीनंतरही कार्यकर्ते आपल्या भूमिकेवर ठाम होते, मात्र त्यानंतर कोणीही घोषणा बाजी देणार नाही, आम्ही एका बाजूला शांत बसू अशा पद्धतीची भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली आहे.
हेही वाचा - Sharad Pawar : 'लोक माझे सांगाती'मधून उद्धव ठाकरे विरोधात शरद पवारांची उघड भूमिका