मुंबई - अभिनेत्री कंगना रणौत आणि अभिनेता हृतिक रोशन यांच्यामधील 2016 साली झालेला विवाद मुंबई पोलिसांकडे गेल्यानंतर यासंदर्भात सायबर विभागाकडून कुठलाही तपास होत नसल्यामुळे हृतिक रोशनचे वकील महेश जेटमलानी यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र लिहून या संदर्भातील तपासात प्रगती झाली नसल्याची तक्रार केली आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकाकडे देण्यात आलेला आहे.
काय आहे प्रकरण
हृतिक रोशन-कंगना रणौत यांच्यामध्ये बिनसल्यानंतर हृतिक रोशनवर आरोप करत कंगणाने म्हटले होते की, हृतिक रोशनने त्याच्या मेल आयडी वरून मला आमच्या प्रेम संबंधाबद्दल बऱ्याचदा मेल केलेले होते. मात्र हे सर्व आरोप हृतिक रोशनने फेटाळून लावत या संदर्भात पोलीस तक्रार दाखल केलेली होती.
मुंबई पोलिसांच्या बांद्रा कुर्ला संकुलातील सायबर पोलीस ठाण्यामध्ये ही तक्रार दाखल करण्यात आलेली होती. न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर सदरचा लॅपटॉप, मोबाईल फोन हृतिक रोशनला परत करण्यात यावा, असे आदेश देण्यात आले होते. मात्र या प्रकरणाचा तपास सुरू असल्यामुळे हृतिक रोशनने त्याचा लॅपटॉप मोबाईल फोन घेतलेला नव्हता.
दरम्यान कंगना रणौतने आपल्याला हजाराहून अधिक इमेल केले असल्याचा आरोप हृतिक रोशन याने केलेला होता. त्यानंतर या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून केला जात होता. हा तपास व्यवस्थित होत नसल्याचा आरोप हृतिक रोशनचे वकील महेश जेटमलानी यांनी मुंबई पोलिस आयुक्तांना पत्र लिहून केला होता. यामुळे या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांच्या सीआययु पथकाकडे देण्यात आलेला आहे.
हेही वाचा - 'आयएनएस विराट टिकवण्यासाठी एनओसी मंजूर करायला त्वरित हस्तक्षेप करावा'
हेही वाचा - मराठा आणि ओबीसी समाजातील नाराजी दुर करण्याचे सरकारचा प्रयत्न; अधिवेशनात पुरवणी मागण्यात केल्या 'या' तरतुदी