ETV Bharat / state

...म्हणून साजरा केला जातो 'शिक्षक दिन'

author img

By

Published : Sep 5, 2019, 9:26 AM IST

देशाचे पहिले उपराष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. त्यांचा तब्बल २७ वेळा नोबेल पारितोषिकाच्या नामांकन यादीत समावेश झाला होता. यात साहित्यासाठी १६ वेळा तर शांततेसाठी ११ वेळा समावेश होता. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन

मुंबई - भारताचा शिक्षक दिन हा ५ सप्टेंबर रोजी सुरू झाला. माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिनादिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. इथपर्यंत सर्वांना माहिती आहे. मात्र, शिक्षक दिन नेमका का आणि कसा सुरू झाला याबद्दल फार कमी जणांना माहिती आहे. पहिला शिक्षक दिन १९६२ साली साजरा केला होता. यामागची पार्श्वभूमी आपण जाणून घेऊया.

सुरूवात कशी झाली?

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे राष्ट्रपती झाले होते. त्यानंतर त्यांचा येणारा वाढदिवस साजरा करण्यासाठी त्यांचे मित्र, विद्यार्थी आणि नातेवाईक त्याच्या कार्यालयात आले होते. मात्र, राधाकृष्णन यांनी सर्वांना सांगितले की, 'माझा वाढदिवस साजरा करू नका, त्याऐवजी '५ सप्टेंबर' हा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला तर, मला अभिमान वाटेल.' यावेळी त्यांनी यामागचा उद्देश सर्वांना समजून सांगितला. ते म्हणाले, 'हा दिवस शिक्षक दिन म्हणुन साजरा केला तर भारत आणि बांग्लादेशच्या सर्व शिक्षकांना त्यांच्या कार्याची मानवंदना ठरेल.' आणि तेव्हापासून ५ सप्टेंबर हा शिक्षक दिन म्हणुन सा़जरा होऊ लागला.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्याबद्दल -

जन्म - ५ सप्टेंबर १८८८ हा राधाकृष्णन यांचा जन्मदिन. त्यांचा जन्म तेलुगू ब्राम्हण कुटुंबातील तिरूतानी (आंध्रप्रदेश) या ठिकाणी झाला.

शिक्षण - त्यांनी मद्रास विद्यापीठातून तत्वज्ञान या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवली.

कामगिरी आणि पुरस्कार - सुरूवातीला राधाकृष्णन यांनी म्हैसूर विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. त्यानंतर त्यांनी कोलकाता विद्यापीठात अध्यापनाचे कार्य केले. तेथे राधाकृष्णन हे विद्यार्थ्यांमध्ये खूप लोकप्रिय होते. त्यांनी आंध्रा आणि बनारस हिंदू विद्यापीठात कुलगुरू म्हणूनही जबाबदारी पार पाडली. भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून राधाकृष्णन यांना ओळखले जाते. त्यांना १९३१ साली 'नाईटहूड' या खिताबाने गौरविण्यात आले आहे. त्यांना १९५४ साली 'भारतरत्न' बहुमान राधाकृष्णन यांना मिळाला आहे. त्यांना ब्रिटीश रॉयल ऑर्डर ऑफ मेरीटचे १९६३ साली सदस्यत्व मिळाले. त्यांचा तब्बल २७ वेळा नोबेल पारितोषिकाच्या नामांकन यादीत समावेश झाला होता. यात साहित्यासाठी १६ वेळा तर शांततेसाठी ११ वेळा समावेश होता. हाही एक विक्रमच म्हणावा लागेल.

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.