ETV Bharat / state

संतापजनक... सख्ख्या भाचीच्या अंगावर ओतले गरम पाणी; आरोपी महिलेला मालवणी पोलिसांकडून अटक - Hot water poured on the body of the niece

मावशीने आपल्या 10 वर्षीय भाचीच्या शरीरावर गरम पाणी ओतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना मालाड पश्चिम (malad west) येथील मालवणी गेट क्रमांक ८ हाऊसिंग बोर्ड परिसरात घडली. (malad police station) याप्रकरणी पीडित मुलीची चौकशी केल्यानंतर मालवणी पोलिसांनी साफिया नावाच्या महिलेला अटक केली आहे. (malad police)

Hot water poured on the body of the niece
सख्ख्या भाचीच्या अंगावर ओतले गरम पाणी
author img

By

Published : Nov 21, 2021, 7:59 PM IST

मुंबई - मावशीने आपल्या 10 वर्षीय भाचीच्या शरीरावर गरम पाणी ओतल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. ही घटना मालाड पश्चिम (malad west) येथील मालवणी गेट क्रमांक ८ हाऊसिंग बोर्ड परिसरात घडली. सफिया अब्दुल हमीद शेख (26) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. जेव्हा ही जखमी मुलगी आपल्या मावशीच्या घरातून पळून गेली आणि थोड्या अंतरावर जाऊन आपला जीव वाचवण्यासाठी स्थानिक लोकांकडे गयावया करू लागली तेव्हा 19 नोव्हेंबरला ही घटना समोर आली. (Hot water poured on the body of the niece)

संबंधित व्हिडिओ

स्थानिक रहिवासी महंमद शारुख आणि अब्दुल हन्नान शेख यांनी तातडीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला १०० क्रमांकावर फोन करून घडलेला प्रकार सांगितला. यानंतर मालवणी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. (malad police station) याप्रकरणी पीडित मुलीची चौकशी केल्यानंतर पोलिसांनी साफिया नावाच्या महिलेला अटक केली आहे.

मुलीच्या आईची मानसिक स्थिती -

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, साफियाचे आतापर्यंत दोनदा लग्न झाले आहे. साफियाचे दुसरे लग्न 2019मध्ये झाले आणि सुमारे 10 महिन्यांपूर्वीच साफियाने एका मुलीला जन्म दिला. ज्या निष्पाप मुलीवर साफियाने अत्याचार केले ती तिच्या सख्ख्या बहिणीची मुलगी आहे. पीडित मुलीची आई मुंबईतील नागपाडा भागात तिच्या भावाच्या घरी राहते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वडील तिच्या आईसोबत राहत नाहीत आणि मुलीच्या आईची मानसिक स्थितीही चांगली नाही. साफियाने आपल्या मुलीला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी तिने आपल्या बहिणीच्या मुलीला मालवणी बोलावले होते.

हेही वाचा - Mumbai Crime Branch Seized Drug : मुंबईत 5 कोटींहून अधिक किमतीचे ड्रग्ज जप्त, एका आरोपीला अटक

पीडित मुलीने आपल्या जबाबात सांगितले की,

साफिया तिला पुन्हा-पुन्हा दुकानात छोट्या-छोट्या वस्तू आणण्यासाठी पाठवत असे आणि जमीन साफ ​​करणे, झाडू आणि भांडी साफ करून घेत असे. साफियाने दिलेल्या कामात काही कमतरता असेल तर साफिया मुलीवर असे अत्याचार करत असे. साफियाचे हे संतापजनक कृत्य समोर आल्यानंतर या परिसरात राहणाऱ्या नागरिकांकडून मालवणी पोलिसांकडून साफियाला कठोरात कठोर शिक्षा करण्याची मागणी होत आहे. पीडित मुलीला उपचारासाठी मोठ्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.