मुंबई - स्वातंत्र्यपूर्व काळात मुंबई पोलिसांकडे अश्वदल कार्यरत होते. 1932 मध्ये हे दल बंद करण्यात आले होते. मात्र, आता परत 88 वर्षांनी हे युनिट सुरू करण्यात येणार आहे. 26 जानेवारी पासून हे युनिट सुरू होणार आहे. या दलामध्ये 30 घोडे असणार आहेत.
हेही वाचा - जकात नाक्याच्या जागेतून उत्पन्न मिळण्यासाठी पालिका करणार सल्लागाराची नियुक्ती
मुंबईतील शिवाजी पार्क येथे पार पडणाऱ्या संचलनात हे अश्व पथक सहभागी होणार आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिवाजी पार्क परिसरात ठेवण्यात आलेल्या या अश्व पथकाची पाहणी केली. या अश्व पथकामध्ये 30 घोडे असून ज्यांची तात्पुरती सोय मुंबईतील शिवाजी पार्क येथे करण्यात आली आहे. या पथकामध्ये 1 पीएसआय, 1 एएसआय, 4 हेड कॉन्स्टेबल, 32 कॉन्स्टेबल असे मनुष्यबळ असणार आहे.
हेही वाचा - शरद पवार स्वतः करणार इंदू मिलच्या जागेची पाहणी, उद्या होणार पाहणी दौरा
मुंबईची लोकसंख्या पाहता गर्दीच्या ठिकाणी जमावावर नियंत्रण ठेवण्यासाठी, समुद्र किनारी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून या अश्व पथकाचा वापर करण्यात येणार आहे. मुंबई पोलीस दलात शामिल होणाऱ्या अश्व पथकाला माऊंटन पोलीस म्हणून सुद्धा संबोधले जाणार आहे. मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलवर याबद्दल माहिती देण्यात आलेली असून प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी या पथकाच्या अधिकारांच्या युनिफॉर्म डिझाईन केला आहे. गर्दीच्या ठिकाणी अश्व पथकाला आणण्यासाठी वाहनांचा वापर केला जाणार आहे. मात्र, गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी हे अश्व पथक उपायकारक असणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांना वॉकीटॉकी यांच्यासह बॉडी माऊंटेड कॅमेरा सुद्धा देण्यात येणार आहे.