मुंबई - मुंबईची शान असलेले ऐतिहासिक शिवाजी पार्क मैदान जनता कर्फ्यूमुळे अक्षरशः ओस पडले आहे. विविध खेळांबरोबरच राजकीय सभांसाठी प्रथम प्रसिद्ध असलेले शिवाजी पार्क मैदान हे मुंबई महानगरपालिकेच्या शाळेत आहे. या मैदानावर भल्या सकाळी सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येने येऊन मॉर्निंगवॉकचा आनंद घेतात. शिवाजी पार्कवरील कट्टा हा तरुण आणि वयस्कर मंडळींसाठी विश्रांतीचा एक थांबा आहे. मात्र, जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर दादर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात शांतता दिसून येत आहे.
जनता कर्फ्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. त्याला प्रतिसाद देत नागरिक कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर पडले नाहीत, त्यामुळे शिवाजी पार्क मैदानदेखील ओस पडले. विविध खेळांबरोबरच राजकीय सभांसाठी प्रथम पसंती असलेले शिवाजी पार्क मैदान हे १९२५ मध्ये महानगरपालिकेने जनतेसाठी खुले केले. त्याचे मूळ नाव माहीम पार्क असे आहे. सन, १९६६ मध्ये या मैदानावर एका बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला.
हेही वाचा - 'कोरोनातून एकही धर्म वाचला नाही, देवानंही मैदान सोडलं'
या मैदानावर राज्य सरकारच्या अनेक शासकीय कार्यक्रम होतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून आज देशव्यापी 'जनता कर्फ्यू' आयोजित करण्यात आला आहे. पुढील काही दिवस संकटाचे असून नागरिकांनी बाहेर पडू नये, असे आवाहन राज्य सरकार आणि केंद्र सरकारने केले आहे. एक प्रकारे संपूर्ण देश 'लॉक-डाऊन' करण्याची ही प्राथमिक प्रक्रिया असून यापुढील काळात देखील नागरिकांना घरात बसूनच कोरोना विषाणूचा सामना करावा लागणार आहे.
हेही वाचा - कुर्ला एसटी डेपोचा 'जनता कर्फ्यू'ला प्रतिसाद