ETV Bharat / state

शैक्षणिक दिनदर्शिकेमधून राष्ट्रभाषा ‘हिंदी’ गायब; शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचा प्रताप

author img

By

Published : Jun 24, 2020, 12:14 PM IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देता यावे, यासाठी पालकांच्या सहाय्याने स्वयंअध्ययन व मार्गदर्शनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने विषयनिहाय शैक्षणिक दिनदर्शिका तयार केली आहे. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षक आणि पालकांनी जून ते ऑगस्टदरम्यान विषयनिहाय कशा पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यासाठी ही दिनदर्शिका परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र, या दिनदर्शिकेत हिंदी विषयच समाविष्ट केला नसल्याचे उघडकीस आले आहे.

शैक्षणिक दिनदर्शिकेमधून राष्ट्रभाषा ‘हिंदी’ गायब

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील शाळा प्रत्यक्षात आतापर्यंत सुरू होऊ शकल्या नाहीत. त्यातच राज्यातील शैक्षणिक सत्राला सुरुवात झाली असली तरी त्यात विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या सहाय्याने स्वयंअध्ययन करण्यास मदत व्हावी. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने सर्व वर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक दिनदर्शिका जाहीर केली आहे. मात्र, त्या दिनदर्शिकेमधून राष्ट्रभाषा असलेल्या ‘हिंदी’ विषयच गायब करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने (एससीईआरटी) पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक दिनदर्शिकेची निर्मिती केली आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मार्गदर्शनातून व पालकांच्या मदतीने स्वयंअध्ययन कसे करावे, याबाबत माहिती देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये व त्यांना ऑनलाइन पद्धतीने शिक्षण देता यावे, यासाठी पालकांच्या सहाय्याने स्वयंअध्ययन व मार्गदर्शनासाठी एससीईआरटीने विषयनिहाय शैक्षणिक दिनदर्शिका तयार केली आहे. यामध्ये पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांकडून शिक्षक आणि पालकांनी जून ते ऑगस्टदरम्यान विषयनिहाय कशा पद्धतीने अभ्यास करून घ्यायचा, याचे सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे. त्यासाठी ही दिनदर्शिका एससीईआरटीच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मात्र, या दिनदर्शिकेत हिंदी विषयच समाविष्ट केला नसल्याचे उघडकीस आले आहे.

पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी देशात सर्वाधिक बोलल्या व लिहिल्या जाणार्‍या, व्यवहारातील महत्त्वपूर्ण भाषा हिंदीला स्थानच देण्यात आलेले नाही. तर, दिनदर्शिकेत हिंदी विषय समाविष्ट न केल्याने हिंदी शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. यावर राज्य शिक्षण मंडळाचे माजी सदस्य उदय नरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. राष्ट्रभाषा म्हणून ओळख असलेल्या व देशात सर्वाधिक बोलल्या आणि लिहिल्या जाणार्‍या हिंदी भाषेच्या विषयाला शैक्षणिक दिनदर्शिकेत स्थान न देणे हे फारच खेदजनक आहे. त्यामुळे एससीईआरटीने तातडीने शैक्षणिक दिनदर्शिकेची पुनर्रचना करून यासाठी झालेल्या चुकीबद्दल माफी मागावी, अशी मागणी केली आहे.

हेही वाचा - 'शरद पोंक्षेंवर गांधीवादी लोकांचे आभार मानण्याची वेळ येणे हाच महात्मा गांधींच्या विचारांचा विजय'

राज्य शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनीही एससीईआरटीने केलेली चूक मोठी असल्याचे म्हटले आहे. परिषदेकडून अनेकदा अशा प्रकारच्या चुका केल्या जात असून त्याचा शिक्षकांना त्रास झाला आहे. त्यामुळे आतातरी त्यांनी ही चूक सुधारून पुढील चुका टाळाव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.