ETV Bharat / state

जाणून घ्या : मुंबईत कुठे किती झाला पाऊस

author img

By

Published : Jun 10, 2021, 5:12 AM IST

मुंबईमध्ये मंगळवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर पकडला होता. सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाने मुंबईला झोडपून काढले. मुंबई महापालिकेच्या पाऊस नोंद करणाऱ्या केंद्रांवरची आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडला आहे तर सर्वात कमी पाऊस शहर विभागात पडला आहे.

today mumbai rain news report
मुंबईत कुठे किती झाला पाऊस

मुंबई - मुंबईमध्ये मंगळवारी रात्रीपासून पाऊस पडत आहे. बुधवारी पहाटेपासून पावसाने जोर पकडला होता. सकाळी ५ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पावसाने मुंबईला झोडपून काढले. यादरम्यान मुंबईमध्ये विक्रोळी, सायन रावळी कॅम्प, चेंबूर या ठिकाणी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर सर्वात कमी पाऊस नरिमन पॉईंट, कुलाबा, मलबार हिल या विभागात पडल्याची नोंद झाली आहे.

पूर्व उपनगरात सर्वाधिक पाऊस -

मुंबईत पहाटे ५ वाजल्यापासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत तब्बल १२ तास मुंबईत पाऊस पडत होता. या कालावधीत मुंबई शहर विभागात १३७.८२ मिलीमीटर, पश्चिम उपनगरात १९०.७८ मिलीमीटर तर पूर्व उपनगरात २१४.४४ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई महापालिकेच्या पाऊस नोंद करणाऱ्या केंद्रांवरची आकडेवारी पाहिल्यास सर्वाधिक पाऊस पूर्व उपनगरात पडला आहे तर सर्वात कमी पाऊस शहर विभागात पडला आहे.

या विभागात सर्वाधिक पावसाची नोंद -

मुंबईच्या पूर्व उपनगरातील विक्रोळी फायर स्टेशन येथे २८५.९० मिलीमीटर, शहर विभागातील सायन रावळी कॅम्प येथे २८२.६१ मिलीमीटर, पूर्व उपनगरात चेंबूर फायर स्टेशन येथे २८०.५२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्या खालोखाल धारावी फायर स्टेशन येथे २७६.९३ मिलीमीटर, अंधेरी येथील मरोळ फायर स्टेशन येथे २७२.१९ मिलीमीटर, अंधेरी येथील के ईस्ट कार्यालय येथे २७१.७६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या विभागात सर्वात कमी पावसाची नोंद -

मुंबईत सर्वात कमी पाऊस शहर विभागात पडला. शहर विभागातील नरिमन पॉईंट फायर स्टेशन येथे ५३.२२ मिलीमीटर, कुलाबा फायर स्टेशन येथे ५४.८५ मिलीमीटर, कुलाबा पम्पिंग स्टेशन येथे ५७.२२ मिलीमीटर, सी वॉर्ड येथे ८६.६२ मिलीमीटर, मलबार हिल डी वॉर्ड येथे ८९.५७ मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात सांताक्रूझ एच वेस्ट कार्यालय येथे ८६.९९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

या विभागात पडला सर्वाधिक पाऊस (मिलीमीटरमध्ये)

मुंबई शहर

  • रावळी कॅम्प - २८२.६१
  • धारावी फायर स्टेशन - २७६.९३
  • दादर फायर स्टेशन - २३७.९७
  • माटुंगा एफ नॉर्थ वॉर्ड कार्यालय - २३४.९३

पश्चिम उपनगर

  • अंधेरी मरोळ फायर स्टेशन - २७२.१९
  • अंधेरी के ईस्ट कार्यालय - २७१.७६
  • मालवणी फायर स्टेशन - २५३.८८
  • गोरेगाव - २१७.३६

पूर्व उपनगर

  • विक्रोळी फायर स्टेशन - २८५.९९
  • चेंबूर फायर स्टेशन - २८०.५२
  • चेंबूर एम वेस्ट कार्यालय - २४९.५१
  • मानखुर्द गोवंडी एम ईस्ट कार्यालय - २४८.८७

हेही वाचा - VIDEO : मिठी नदी ओव्हरफ्लो; इमारतींमध्ये शिरलं पाणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.