ETV Bharat / state

Diwal Pahat Dispute : ठाकरे गटाला उच्च न्यायालयाचा झटका.. 'या' कार्यक्रमासाठी शिंदे गटाला दिली परवानगी - High Court permission to Shinde group for Diwali

Thackeray Vs Shinde : पहिले दादर येथील दसरा मेळाव्यावरून वाद तर आता ठाण्यातील दिवाळी पहाटच्या वाद (Thackeray and Shinde group Diwali dawn dispute) मुंबई उच्च न्यायालयात आला होता. यावेळी मात्र शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला (Mumbai HC gives relief to Shinde group) असल्याने यावर्षी शिंदे गट दिवाळी पहाट कार्यक्रम साजरा करणार (permission to Shinde group for Diwali morning program) आहे.

Diwal Pahat Dispute
Diwal Pahat Dispute
author img

By

Published : Oct 19, 2022, 8:57 PM IST

मुंबई : Thackeray Vs Shinde : पूर्वीच्या शिवसेनेमध्ये बंद झाल्यानंतर राज्यात सत्ता परिवर्तन देखील झाले आहे. त्यानंतर शिवसेनेमध्ये दोन गट पडले होते. ठाकरे गट आणि शिंदे गट. पहिले दादर येथील दसरा मेळाव्यावरून वाद तर आता ठाण्यातील दिवाळी पहाटच्या वाद (Thackeray and Shinde group Diwali dawn dispute) मुंबई उच्च न्यायालयात आला होता. यावेळी मात्र शिंदे गटाला मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला (Mumbai HC gives relief to Shinde group) असल्याने यावर्षी शिंदे गट दिवाळी पहाट कार्यक्रम साजरा करणार (permission to Shinde group for Diwali morning program) आहे. (Latest news from Mumbai)

दसरा ठाकरेंचा होता आता दिवाळी शिंदेंची - दसरा ठाकरेंचा होता आता दिवाळी शिंदेंची असे म्हणण्याची वेळ राज्यातील जनतेवर आली आहे. ठाण्यातील दिवाळी पहाटच्या वादावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. ठाण्यात दिवाळी पहाटच्या निमित्ताने ठाकरे आणि शिंदे गट पुन्हा आमने आले होते. दोन्ही गटाला ठाणे महापालिकेने दिवाळी पहाट कार्यक्रमाची परवानगी दिली होती. मात्र आता मुंबई हाय कोर्टाने ठाकरे गटाला दणका देत आता फक्त शिंदे गटालाच दिवाळी पहाट कार्यक्रम घेण्याची परवानगी दिली आहे.

पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन गटात राजकीय वाद- दसरा मेळाव्यानिमित्त शिवतीर्थावर सभा घेण्यावरुन ठाकरे आणि शिंदे गटात जोररदार वाद झाला होता. आता या वादाचा दुसरा अध्याय दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या निमित्ताने पहायला मिळाला. ठाण्यात मासुंदा तलाव शेजारील रस्त्यावर दिवाळी पहाटचा कार्यक्रम घेण्यासाठी दोन्ही गटांमध्ये चढाओढ होती. कार्यक्रम स्थळावरून दोन्ही गटाकडून दावा करण्यात आला होता. ठाणे महापालिकेने दोन्ही गटांना परवानगी दिली होती. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित करत पोलिसांनी दोन्ही गटांना परवानगी नाकारली होती. यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहचले.

शिंदे गटात राजकीय फटाक्यांची दिवाळी- 12 वर्षांपासून आम्हीच दिवाळी पहाटचा कार्यक्रम करत असल्याचा दावा दोन्ही गटांकडून करण्यात आला. अखेरीस कोर्टाने शिंदे गटाला दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यास परवानगी दिली आहे. दिवाळी पहाटच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ठाण्यात दिवाळी आधीच राजकीय फटाके फुटू लागले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.