मुंबई - शंभर कोटींच्या घरकुल घोटाळा प्रकरणात शिक्षा झालेले माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई हायकोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय कारणांसाठी तीन महिन्यांसाठी हंगामी जामीन मंजूर केला.
जळगाव सत्र न्यायालयाने दिलेल्या शिक्षे विरोधात सुरेश जैन यांनी काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. प्रकृती ठीक नसल्याचे कारण देत त्यांनी जामीनाची मागणी केली होती.
हेही वाचा - अकोल्यातील प्रसिद्ध पानमळे नामशेष होण्याच्या मार्गावर; शेतकरी आर्थिक संकटात
मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी पाच लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर सुरेश जैन यांची तात्पुरती सुटका केली आहे. सत्र न्यायालयाने जैन यांना घरकुल घोटाळ्या संदर्भात 7 वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यातील 4 वर्षांची शिक्षा जैन यांनी भोगली आहे.