ETV Bharat / state

मुंबईत रात्री पासून जोरदार पावसाची हजेरी - Mumbaikar angry

Heavy rains in Mumbai
मुंबईत रात्री पासून जोरदार पावसाची हजेरी
author img

By

Published : Jul 16, 2021, 9:07 AM IST

Updated : Jul 16, 2021, 1:23 PM IST

13:07 July 16

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना नाहक त्रास, मुंबईकर संतप्त

वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना नाहक त्रास, संतप्त मुंबईकराची प्रतिक्रिया

मुबंई - शहरात गुरुवार रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू होता. यामुळे मुंबईत सकल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. रस्त्यावर आणि रुळावर पाणी साचल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. या होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यावर शिवाजी मोरे या मुंबईकरांना संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

12:29 July 16

मुंबईत रेल्वे वाहतूक धिम्या गतीने

मुंबईत रेल्वे वाहतूक धिम्या गतीने

मुंबई - शहरात झालेल्या पावसामुळे रेल्वे वाहतूक मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली असून रेल्वे मार्गावर पाणी साचले आहे. रेल्वे रुळावर पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे.

11:39 July 16

लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी, सोशल डिस्टंसिंगचा उडाला फज्जा

मुंबई - शहरात झालेल्या मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी असल्याने अनेक मुंबईकर हे रेल्वेने प्रवास करत आहेत. यामुळे लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी झाली आहे. सर्वसामान्यांना कोरोनामुळे रेल्वेसेवा बंद असताना लोकलमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. या दरम्यान नागरिकांनी सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला आहे.

11:11 July 16

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्राफिक जाम

मुंबई - शहरात झालेल्या मुसळधार पावसाचा फटका रस्ते वाहतुकीला मोठ्या प्रमाणात बसला असून वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहतुकीची कोंडी झाली आहे. वाहतुकीच्या कोंडीमुळे मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तर हायवेवर दोन किलोमीटर पर्यंत लांबच लांब गाड्यांच्या रांगा लागल्या आहेत. 

10:30 July 16

मुंबईत पावसाची विश्रांती; वाहतूक कोंडी कायम

मुंबई - शहरात पावसाने थोडी विश्रांती दिली आहे. मात्र अद्यापही मुंबईतील वाहतूक कोंडी ही सुटलेली नाही. तर सकलभागात पाणी साचलेले असल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने धिम्या गतीने रेल्वे वाहतूक सुरू आहे. तर पावसाने थोडी विश्रांती दिली असली तरी वाहतूक कोंडी कायम आहे. 

10:02 July 16

मुंबईकरांचा लागणार आज लेट मार्क?

मुंबई - पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक फटका बसला आहे. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकलची गती मंदावली आहे. तसेच हार्बर मार्गावरील चुनाभट्टी ते किंग सर्कल दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने हार्बरची ही वाहतूक मंदावली होती जवळजवळ 20 ते 25 मिनिटे उशिराने मध्य आणि हार्बर च्या लोकसेवा धावत होत्या. त्यामुळे अनेक रेल्वे गाड्या एकामागे एक खोळंबलेल्या होत्या. मात्र आता मुंबईत पाऊस थांबल्याने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक हळूहळू सुरळीत होत आहे मात्र सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांना आज लेट मार्क लागलेला आहे.

09:27 July 16

मुंबई लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने

मुंबईत रात्री पासून जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. यामुळे वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम होत आहे. पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक फटका बसला आहे. कुर्ला ते विद्याविहार दरम्यान लोकल गाड्या दहा ते पंधरा मिनिटे उशिराने धावत आहे.

गुरुवारी रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत 12 तासात मुंबई शहरात 64.45 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 120.67 मिलिमीटर तर पश्चिम उपनगरात 127.16 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

08:42 July 16

मुंबईत रात्री पासून जोरदार पावसाची हजेरी, सखल भागात पाणी साचले

मुंबईत रात्री पासून जोरदार पावसाची हजेरी

मुंबई - रात्री पासून जोरदार पावसाची हजेरी सुरू आहे. पहाटे 4 ते सकाळी 7 वाजेपर्यंत तीन तासांत मुंबई शहरात 36 मिलिमीटर, पूर्व उपनगरात 75 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 73 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे मुंबईतील हिंदमाता, किंग सर्कल, सायन आदी सखल भागात पाणी साचले आहे. परिसरात पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. 

Last Updated : Jul 16, 2021, 1:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.