मुंबई - मुंबई, पुणे, रायगड, पालघर, रत्नागिरी या प्रमुख शहरांसह संपूर्ण महाराष्ट्रात येत्या काही दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) या भागात आधीच पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र आता हा ऑरेंज अलर्ट 5 दिवसंवरून पुढचे 8 दिवस करण्यात आला आहे.
पुढचे काही दिवस ऑरेंज अलर्ट - मुंबई आणि परिसरात सोमवारी पहाटे पासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्याचवेळी भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) येत्या २४ तासांत मुंबई आणि उपनगरात मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. या पावसाळ्यात महाराष्ट्रासाठी 'ऑरेंज' आणि 'यलो' अलर्ट देखील जारी करण्यात आला आहे, तर भारतीय हवामानशास्त्र विभागाने वेगळ्या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या या अंदाजामुळे प्रशासनाकडून लोकांना योग्य खबरदारी घेण्यास आणि पाणवठ्यांजवळ न जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल - मागील दोन-तीन दिवसांपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. पुढील आठवडाभरही तो तसाच कोसळण्याची शक्यता आहे. त्याशिवाय मुंबई, कोकण किनारपट्टीला हवामान विभागाने हायटाईडचा इशारा दिला आहे. त्यामुळे किनारपट्टीच्या भागात शक्यतो नागरिकांनी जाऊ नये असेही सांगण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकांनाही या भागात मदतकार्य करण्यासाठी तैनात करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा - या सर्वांबाबत हवामान विभागाचे अधिकारी जयंत सरकार यांनी दिलेल्या माहितीनुसार, "अरबी समुद्रात तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पुढचे काही दिवस पडेल. या मुसळधार पावसाचा फटका मुंबई तसेच उपनगरासह मुंबईच्या आजूबाजूच्या कोकण किनारपट्टीला मोठ्या प्रमाणात बसण्याची शक्यता आहे. तसेच याचा काहीसा परिणाम उर्वरित महाराष्ट्रात देखील थोड्या प्रमाणात दिसेल. त्यामुळे मुंबई हवामान विभागाकडून या परिसरात काही ठिकाणी ऑरेंज तर काही ठिकाणी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा." असं आवाहन जयंत सरकार यांनी केल आहे.
नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली - कोकणात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. या पार्श्वभूमीवर, जिल्हाधिकाऱ्यांनी खबरदारी घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. तसेच चिपळूणच्या परिस्थितीकडेही लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. राज्यात सोमवारी सकाळपासून पाऊस कोसळत आहे. रायगड, रत्नागिरी जिल्ह्यात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे काही नद्यांनी इशारा पातळी गाठली असून खबरदारी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ( Maharashtra Rain Update ) कुंडलिका नदीने इशारा पातळी ओलांडली असून अंबा, सावित्री, पाताळगंगा, उल्हास व गाढी या नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा थोडे कमी आहे. याशिवाय जगबुडी, काजळी नदीचे पाणी इशारा पातळीवरून वाहत असल्याने या भागातील नागरिकांना वेळीच सूचना देणे, प्रसंगी त्यांना हलविणे तसेच जीवितहानी होऊ देऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी तसेच जलसंपदा विभागाना सावध राहून योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश दिले. चिपळूण येथील परिस्थितीकडेही सातत्याने लक्ष ठेवण्याचे आणि नागरिकांना वारंवार सूचना देऊन त्यांना सावध ठेवण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत. ( Mumbai Heavy Rain )
मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, परशुराम घाटात कोसळली दरड - मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा, परशुराम घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परशुराम घाटात दरड कोसळली आहे. ( Mumbai Heavy Rain ) वाढता पाऊस आणि पुराची शक्यता पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली आहे. सबंधित पालक सचिवांना त्या त्या जिल्ह्यांमध्ये पोहचून प्रत्यक्ष देखरेख व नियंत्रण करण्याचे निर्देश दिले आहेत. नागरिकांनी समुद्र किनारी जाऊ नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
सखल भागांत पाणी साचले - सोमवारपासून पावसाने दमदार हजेरी मुंबई आणि महाराष्ट्राच्या ( Mumbai and Maharashtra ) काही जोरदार भागांमध्ये लावली. मुंबईत सोमवारी पहाटेपासून पडणाऱ्या जोरदार पावसामुळे सकाळी कार्यालयाला पोहोचणार्या चाकरमान्यांना कसरत करावी लागत आहे. मुंबईत अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने या भागांमधील वाहतूक मंदावली होती.
मुंबईत 5 टीम तैनात - दरवर्षी मुंबईमध्ये पावसाळ्यात अनेक भागात पाणी तुंबत व त्यामुळे परिस्थिती निर्माण होते. मुंबईतील सायन, दादर, हिंदमाता परिसर या भागात मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणी साचते. तर, उपनगराचे अनेक भागात देखील अशीच समस्या पाहायला मिळते. त्यासोबतच अनेक वेळा मुंबईत दरड कोसळण्याच्या घटना देखील घडत असतात. यात जीवित हानीचाही धोका असतो.(Maharashtra Rain Update ) त्या पार्श्वभूमीवर मुंबईसह उपनगरात खबरदारीचा उपाय म्हणून एनडीआरएफच्या एकूण पाच तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ( Mumbai Heavy Rain )
-
Mumbai | Situation favorable. Expect Maharashtra to get widespread rainfall in next 5 days. Heavy to very rainfall in scattered areas. Ghat areas also expected to get good rains. In Mumbai, 5,7&8 July will see heavy rainfall. Red alert for Ratnagiri & Raigad: Jayant sarkar, IMD pic.twitter.com/JYqQzTLHGv
— ANI (@ANI) July 5, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Mumbai | Situation favorable. Expect Maharashtra to get widespread rainfall in next 5 days. Heavy to very rainfall in scattered areas. Ghat areas also expected to get good rains. In Mumbai, 5,7&8 July will see heavy rainfall. Red alert for Ratnagiri & Raigad: Jayant sarkar, IMD pic.twitter.com/JYqQzTLHGv
— ANI (@ANI) July 5, 2022Mumbai | Situation favorable. Expect Maharashtra to get widespread rainfall in next 5 days. Heavy to very rainfall in scattered areas. Ghat areas also expected to get good rains. In Mumbai, 5,7&8 July will see heavy rainfall. Red alert for Ratnagiri & Raigad: Jayant sarkar, IMD pic.twitter.com/JYqQzTLHGv
— ANI (@ANI) July 5, 2022
हेही वाचा - sanjay raut on Gulabrao Patil: 'उद्धव ठाकरे दूध खुळे नाहीत' बंडखोर आमदारांना संजय राऊत यांचे प्रत्युत्तर