मुंबई - दोन दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने काल (दि. 22 जुलै) रात्री मुंबईत काही ठिकाणी हलक्या सरी बरसल्या. गेल्या 24 तासात सांताक्रूझ 49.4, वांद्रे 24, राम मंदिर 33, महालक्ष्मी 14 मिमी पावसाची नोंद झाली आहे. ठाणे आणि नवीमुंबई भागात काही भागात जोरदार सरी कोसळल्या आहेत.कोकणात आणि राज्याच्या अंतर्गत भागात पावसाच्या जोर वाढण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
गेल्या 24 तासांंत मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक तर काही भागात मुसळधार पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील गगनबावडा 110, गडहिंग्लज 50, हर्सूल 30, खंडाळा बावडा, फलटण, विटा 20 मिमी पावसाची नोंद करण्यात आली होती. तर मराठवाड्यातील अहमदपूर, चाकून, केज, तुळजापूर, वडावणी याठिकाणी 20 मिमी पाऊस पडला. विदर्भातील वर्धा 60, ब्रम्हपुरी, सेलू 30, देसाईगंज, हिंगणा, कुरखेडा 20 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
पुढील हवामानाचा अंदाज
२३ - २४ जुलै: गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
२५ जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता
२६ जुलै: कोंकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाडा विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता..
इशारा
२३ - २४ जुलै: गोव्यासह संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांचा कडकडाट होण्याची शक्यता.
महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
२५ जुलै: कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता
२६ जुलै: कोकण गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता. महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता