ETV Bharat / state

राज्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही - राजेश टोपे - News about the Corona virus

राज्यात कोरोना आजाराचा नवीण रुग्ण आढळलेला नाही राज्य सरकार आणि प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.

health-minister-rajesh-tope-said-no-new-patient-found-on-corona-disease-in-state
राज्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही - राजेश टोपे
author img

By

Published : Mar 17, 2020, 12:53 PM IST

मुंबई - आजची कोरोनाबाधितांची आकडेवारी 39 इतकीच आहे, नवा रुग्ण आढळलेला नाही. राज्य सरकार आणि प्रशासन सर्व खबरदारी घेत आहे. मंत्रिमंडळ बैठकीत आज कोरोना विषाणूवर चर्चा होईल. उपायांची कठोर अंमलबजावणी गरजेची आहे, असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. काही दिवसांपासून शासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे. मात्र, या उपाययोजनांसाठी निधीची गरज असून, सरकारने कंपन्यांकडे धाव घेतली आहे. आज दुपारी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत या कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राज्यात कोरोनाचा नवा रुग्ण आढळलेला नाही - राजेश टोपे

महाराष्ट्रात उपद्रव करणाऱ्या करोना संसर्गाला थांबवण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. यासंदर्भात सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाविषयी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली. करोनाविषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. त्या बैठकीला जाण्यापूर्वी टोपे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ‘राज्यातील करोनाबाधितांचा आकडा स्थिर आहे. सध्या राज्यात ३९ करोनाबाधित रुग्ण आहेत. सध्या करोनाचा संसर्ग रोखण्याला सरकारचा प्राधान्यक्रम आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळवी. खाजगी कंपन्यांनीही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याच्या सूचना द्याव्यात, असे आवाहन त्यांनी केले.

करोनाचा सामना करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना माहिती देणार आहोत. त्यानंतर सह्याद्री अतिथीगृहात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे. करोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी कंपन्यांनी मदत करावी. सीएसआर निधीतून ही मदत करावी. त्याचबरोबर मास्क, सॅनिटायझर आदी साहित्य कंपन्या देऊ शकतात. सरकारकडून सर्व कंपन्यांना आवाहन केले जाणार आहे,’ असे टोपे म्हणाले

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.