ETV Bharat / state

Bomb Blast Case : हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानीं एनआयएच्या ताब्यात, 1993 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी चौकशी

author img

By

Published : May 9, 2022, 4:13 PM IST

Updated : May 9, 2022, 5:41 PM IST

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम च्या संबंधित व्यक्तींविरोधात आज मुंबईत विविध 29 ठिकाणी एनआयएने छापेमारी केली. यात हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानी (Haji Ali Dargah Trustee Suhail Khandwani ) यांना एनआयए ने ताब्यात (ANI custody) घेतले आहे. 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील प्रकरणाशी ( 1993 bomb blast case) संबंधित चौकशी एनआयएने कडून सुरू आहे.

Haji Ali Dargah Trustee Suhail Khandwani
हाजी अली दर्गाचे ट्रस्टी सुहैल खंडवानीं

मुंबई: इडीच्या अटकेत असलेले महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक (Minister Nawab Malik) यांचा साथीदार सुहेल खांडवानी याच्या घरावर एनआयएने छापा टाकला आहे. सुहेल खांडवानी हा मुंबईतील माहिम आणि हाजी अली दर्ग्याचा विश्वस्त (Haji Ali Dargah Trustee Suhail Khandwani ) आहे. माहिममधील त्याच्या घरी पहाटेपासूनच छापेमारी सुरु आहे. याशिवाय मुंबईत 1993 मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणाशी संबंधित तिघांच्या ठिकाण्यांवर राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या धाडी सुरु आहेत.

सुहेल खांडवानी कांडलामधील असोसिएट हाय प्रेशर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड आणि टचवुड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेड चा संचालक आहे. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक देखील याच फर्ममध्ये 2006 ते 2016 पर्यंत संचालक होता. फराज शिवाय टचवुड रिअल इस्टेट प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालकांमध्ये फारूक आणि झकेरिया दरवेश, मनोहर आणि श्रीचंद अगीचा आणि सुहेल खंडवानी यांचा समावेश आहे.

Last Updated : May 9, 2022, 5:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.