ETV Bharat / state

Devendra Fadnavis : मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जाऊ शकतो, जनतेला पूर्ण विश्वास - देवेंद्र फडणवीस - Gujarat Assembly Elections

गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपला यश ( Gujarat Assembly Elections ) मिळाले. भाजप नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी भाष्य केले. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका ( Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray ) केली. उद्धव ठाकरे यांना आम्हाला शुभेच्छा देण्याची मानसिकता नाही असे त्यांनी म्हटले आहे.

DEVENDRA FADANVIS
देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Dec 8, 2022, 5:01 PM IST

मुंबई : गुजरात विधानसभा निवडणुकीत ( Gujarat Assembly Elections ) भाजपला भेटलेल्या घवघवीत यशानंतर देशभरातून भाजप नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडवणीस यांनी सुद्धा याचे श्रेय ( BJP success in Gujarat ) पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा त्याचबरोबर राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, माजी मुख्यमंत्री भूपेंद्र बघेल यांना दिले. त्याबरोबरच सर्वात मोठ्या प्रमाणामध्ये याचे श्रेय गुजरात मधील जनतेला दिले आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी ते बोलत ( Devendra Fadnavis comments on BJP victory ) होते.

आप पक्ष तोंडावर आपटला : याप्रसंगी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अभूतपूर्व असा विजय गुजरातमध्ये मिळाला आहे. २७ वर्ष राज्य केल्यानंतर इतक्या जागा जनता देते म्हणजे त्यांना विश्वास आहे की हा देश मोदीजीच्या नेत्तृत्वात देश पुढे जाऊ शकतो. ५२ टक्के मतदान भाजपाला भेटले आहे. आम्हाला १५७ जागा भेटल्या आहेत. काँग्रेसला फक्त १६ जागा जिंकता आल्या. आम्ही निवडून येणारं असे म्हटले होते. आप पार्टीला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले आहे. ती पार्टी तोंडावर पडली आहे. असेही फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांची अद्याप मानसिकता नाही : हिमाचलमध्ये अपेक्षित यश तिथे आम्हाला भेटले ( BJP defeat in Himachal ) नाही. ४२ टक्के मते आम्हाला भेटली आहेत. तिकडचा ट्रेण्ड आम्हाला बदलायचा होता. पण ते शक्य झाले नाही. असे सांगत जेव्हा अशा पद्धतीचा मोठा विजय संपादन केला जातो तेव्हा मोठ्या मनाने अभिनंदन करायचे असते,.पण अद्याप तसे करण्याची मानसिकता उद्धव ठाकरे यांची अद्याप नाही. असा टोलाही त्यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला ( Devendra Fadnavis criticizes Uddhav Thackeray ) आहे.

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद एक षडयंत्र : मुंबई महानगर पालिकेवर भाजप, ( बाळासाहेबांची शिवसेना ) शिंदे गट, आर पी आय हे सर्व एकत्र येऊन आमचाच झेंडा फडकेल.
असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला आहे. कर्नाटक सीमा वाद या बाबत, मला असे वाटतेय की यात राजकीय षडयंत्र आहे. मी दोन्ही बाजूंनी बोललो आहे. सर्वांनी शांत राहण्याचे ठरवले आहे. तरी अशा घटना घडत आहेत. काही जण जाणूनबुजून अशा घटना करत आहेत. त्या अनुषंगाने नक्कीच यामध्ये राजकीय षडयंत्र आहे. या बाबत सर्व माहिती समोर आल्यावर मी बोलेन, असेही ते म्हणाले. महाराष्ट्रतील मोठ मोठे उद्योग बाहेर पाठवण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. असे सांगत ठाकरे परिवाराच्या संपत्ती संदर्भामध्ये सुरू असलेल्या वादावर आपणाला काही माहिती नसून याबाबत आपण सध्या काही बोलणार नाही असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.