ETV Bharat / state

आग लागलेल्या 'जीएसटी भवन'चे कामकाज आजपासून पुन्हा सुरू - GST Bhavan fire

माझगाव येथे विक्रीकर भवन आहे. काही वर्षांपूर्वी ते 'वॅट भवन' नंतर 'जीएसटी भवन' म्हणून ओळखले जाते. तळचा मजला अधिक इतर नऊ मजले असलेल्या इमारतीच्या छतावर सुशोभिकरणाचे काम सुरू असतानाच सोमवारी दुपारी आग लागली होती.

mazgaon gst bhavan
आग लागलेल्या 'जीएसटी भवना'चे कामकाज आजपासून पुन्हा सुरु
author img

By

Published : Feb 20, 2020, 10:02 AM IST

मुंबई - माझगाव येथील जीएसटी भवनला सोमवारी आग लागली होती. आगीनंतर येथील कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. तज्ज्ञांनी इमारतीची तपासणी केल्यावर कामकाजासाठी इमारत सुरक्षित असल्याचा अहवाल दिला आहे. यामुळे आजपासून जीएसटी भवनमधील कामकाज पुन्हा सुरू केले जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

आग लागलेल्या 'जीएसटी भवना'चे कामकाज आजपासून पुन्हा सुरु

हेही वाचा - पवई आयआयटी मेन गेटसमोर मालवाहू ट्रकला अचानक आग

माझगाव येथे विक्रीकर भवन आहे. काही वर्षांपूर्वी ते 'वॅट भवन' नंतर 'जीएसटी भवन' म्हणून ओळखले जाते. तळचा मजला अधिक इतर नऊ मजले असलेल्या इमारतीच्या छतावर सुशोभिकरणाचे काम सुरू असतानाच सोमवारी दुपारी आग लागली होती. आगीमध्ये ८ ते १० असे तीन मजले जळून खाक झाले. सुरक्षेच्यादृष्टीने या इमारतीत काम करणाऱ्या सुमारे दोन ते सव्वादोन हजार कर्मचाऱ्यांना दोन दिवस सुट्टी देण्यात आली होती. बेस्टचा विद्युत विभाग, अग्निशमन दल, स्ट्रक्चरल ऑडिटर आदी तज्ञ मंडळांनी तपासणी केल्यावर कामकाज करण्यासाठी इमारत योग्य असल्याचा अहवाल दिला आहे. त्यानुसार आज गुरुवारपासून जीएसटी भवनमधील कामकाज पुन्हा सुरू केले जाणार आहे.

तीन दिवसांनंतर कर्मचारी, अधिकारी कामावर रुजू होणार असून पुन्हा कामकाज सुरु होणार आहे. दरम्यान, आग कशामुळे लागली, इमारतीत कोणती महत्वाची कागदपत्रे जळाली याचा तपास सुरू असून, त्याचा अहवाल लवकरच संबंधित यंत्रणेकडून सादर केला जाणार आहे.

सहाव्या मजल्यापर्यंत कामकाज -

जीएसटी भवनला लागलेल्या आगीत आठ, नऊ आणि दहा असे तीन मजले जळून खाक झाले होते. सातव्या मजल्यावर कॉन्फरन्स हॉल आणि इतर छोटी कार्यालये असल्यामुळे हा मजलाही सुरक्षेच्या कारणांमुळे बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सहाव्या मजल्यापर्यंतच कामकाज चालणार आहे.

हेही वाचा - 'जीएसटी भवन आगीची एसआयटी चौकशी करा; दहाव्या मजल्याची माहिती लोकांसमोर समोर आणा'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.