ETV Bharat / state

जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा 'भार', व्हीजेटीआयच्या स्ट्रक्चरल ऑडिटमधून बाब उघड - जीएसटी भवन आग

माझगाव येथील जीएसटी भवनात दुपारी शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीवर सुमारे ३ तासानंतर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे. दरम्यान इमारतीचा दहावा मजला चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच जीएसटी भवनमध्ये दहावा मजला अनधिकृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा 'भार'
जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा 'भार'
author img

By

Published : Feb 17, 2020, 9:18 PM IST

मुंबई - माझगाव येथील जीएसटी भवनमध्ये आज(सोमवार) दुपारी शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. आग लागलेल्या इमारतीमध्ये काहीही अनधिकृत बांधकाम नसल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, या इमारतीमधील दहाव्या मजल्यावर बांधण्यात आलेल्या कार्यालयांमुळे इमारतीवर भार वाढत असल्याचा अहवाल व्हीजेटीआयने दिल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. यामुळे आता हा मजला पूर्णपणे तोडला जाणार असल्याचे समजते.

जीएसटी भवनवर दहाव्या मजल्याचा 'भार'

माझगाव येथे 'विक्रीकर भवन' आहे. काही वर्षांपूर्वी ते 'वॅट भवन' नंतर आता 'जीएसटी भवन' म्हणून ओळखले जाते. जीएसटी भवनच्या २ इमारती असून त्यातील एक इमारत १९६५ ला तर, दुसरी १९७२ ला बांधण्यात आली होती. तळ अधिक ९ मजली असलेल्या या इमारतीच्या नवव्या मजल्यावर आज दुपारी साडेबाराच्या दरम्यान आग लागली. या आगीवर सुमारे ३ तासानंतर अग्निशमन दलाने नियंत्रण मिळवले आहे.

हेही वाचा - जीएसटी भवनाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी होणार - उपमुख्यमंत्री

या इमारतीच्या नवव्या मजल्यावरील कार्यालये नूतनीकरण केली जात होती. त्याजागी जुने लाकडी सामान तसेच ठेवण्यात आले होते. त्यामुळे शॉर्ट सर्किटने आग लागल्यावर जुन्या लाकडी सामानाने पेट घेऊन आग भडकल्याचे समोर आले आहे. दरम्यान इमारतीचा दहावा मजला चर्चेचा विषय बनला आहे. सोबतच जीएसटी भवनमध्ये दहावा मजला अनधिकृत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, पालिकेने काहीही बेकायदेशीर बांधकाम नसल्याची माहिती दिली आहे. ही इमारत ५५ वर्ष जुनी होती आणि तिचे १ ते दिड वर्षांपूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले. ऑडिटसाठी व्हीजेटीआय संस्थेची नेमणूक करण्यात आली होती. इमारत नऊ मजल्याची असताना त्यात कर्मचाऱ्यांना जागा कमी पडत असल्याने दहावा मजला बांधण्यात आला. या मजल्यामुळे इमारतीवर भार वाढला असून तो निष्कासित करावा असा रिपोर्ट देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इमारतीचा दहावा मजला काढून टाकण्याचे काम सुरू होते. हे काम सुरू असतानाच आग लागून इमारतीचे वरील ३ मजले जाळून खाक झाले आहेत.

हेही वाचा - जीएसटी भवन आग: 'मुख्यंत्र्यांकडे चौकशी समितीची मागणी करणार'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.