ETV Bharat / state

Good Bye Kaali Peeli : मुंबईची शान काळी-पिवळी 'पद्मिनी टॅक्सी' रस्त्यावरुन होणार गायब; सोमवारी शेवटची धावणार - काळी पिवळी टॅक्सी बंद

Good Bye Kaali Peeli : मुंबईतील जुनी डबलडेकर बस बंद झाल्यानंतर काळी-पिवळी 'पद्मिनी टॅक्सी'ही मुंबईच्या रस्त्यांवरून गायब होणार आहे. सोमवारपासून (30 ऑक्टोबर) मुंबईच्या रस्त्यांवर काळ्या-पिवळ्या 'पद्मिनी टॅक्सी' दिसणार नाहीत. पाच दशकांहून अधिक काळ ही टॅक्सी मुंबईच्या रस्त्यावर धावत होती.

Good Bye Kaali Peeli
Good Bye Kaali Peeli
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2023, 7:21 PM IST

Updated : Oct 30, 2023, 11:34 AM IST

मुंबई Good Bye Kaali Peeli : लोकल सेवा ही मुंबईची जीवनवाहिनी मानली जाते. दररोज लाखो प्रवासी रेल्वे लोकलनं प्रवास करतात. तर बेस्ट, टॅक्सी, रिक्शा यांचा देखील मुंबईच्या दळणवळणात मोठा वाटा आहे. यातूनसुद्धा हजारो मुंबईकर रोज प्रवास करतात. मात्र, काही दिवसांपूर्वी मुंबईतील डबलडेकर बेस्ट बस बंद करण्यात आली होती. यावेळी शेवटची डबलडेकर रस्त्यावरुन धावत असताना चालक, कंडक्टरसोबत प्रवासीही भावूक झाले होते. यानंतर मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेमधील काळी-पिवळी 'पद्मिनी टॅक्सी' ही देखील मुंबईकरांचा निरोप घेणार आहे. सोमवारी शेवटची टॅक्सी चालवण्यात येणार आहे.

ही टॅक्सी म्हणजे मुंबईची शान आहे. परंतु, या टॅक्सीला आता मुंबईकरांना कायमचा निरोप द्यावा लागत असल्यामुळं खूप दु:ख होत आहे - अब्दुल करीम कारसेकर, टॅक्सी चालक

अनेक दशकं ‘पद्मिनी टॅक्सी’ मुंबईकरांच्या सेवेत : गेल्या 60 वर्षांपासून मुंबईच्या अस्मितेशी या ‘पद्मिनी टॅक्सी’चा संबंध आहे. अनेक बॉलीवूड तसंच मराठी चित्रपटांमध्ये ही टॅक्सी दाखवण्यात आली आहे. त्यामुळं प्रीमियर पद्मिनी टॅक्सी आता मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही. पद्मिनी टॅक्सीची सुरूवात १९६४ साली झाली होती. या टॅक्सीचे उत्पादन 2001 साली बंद करण्यात आलं होतं. परिवहन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबर 2023 रोजी ताडदेव आरटीओ येथे काळी-पिवळी टॅक्सीची नोंद ही शेवटची ‘प्रीमियर पद्मिनी टॅक्सी’ होती. यानंतर या टॅक्सीचं उत्पादन बंद करण्यात आलं. त्यामुळं नोंद देखील बंद झाली होती.

सोमवारी शेवटची टॅक्सी चालवण्यात येणार : नव्या मॉडेल्समुळं ही टॅक्सी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, नव्या मॉडेलच्या काळ्या पिवळ्या टॅक्सी मुंबईच्या रस्त्यांवरुन धावताना आगामी काळात दिसणार आहेत. सोमवारी मॉरिस ऑक्सफर्ड/ ॲम्बेसेडर/ फियाट टॅक्सीच्या युगाचा अंत होईल. ही शेवटची टॅक्सी खरेदी करणारे मालक अब्दुल करीब कारसेकर म्हणाले की, ही टॅक्सी म्हणजे मुंबईची शान आहे, परंतु या टॅक्सीला आता मुंबईकरांना कायमचा निरोप द्यावा लागत आहे. त्यामुळं खूप दु:ख होत आहे. सोमवारी प्रभादेवी येथील अब्दुल करीम कारसेकर हे शेवटची काळी-पिवळी टॅक्सी चालवणार आहेत. त्यांची टॅक्सी MH-01-JA-2556 ही मुंबईच्या रस्त्यावर धावणारी शेवटची टॅक्सी आहे. अब्दुल यांनी 30 ऑक्टोबर 2003 रोजी या टॅक्सीची नोंदणी केली होती.

हेही वाचा -

  1. Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी समाज आक्रमक, अनेक नेत्यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द; जाणून घ्या राज्यात कुठे काय परिस्थिती
  2. Maratha Reservation : केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी शिवीगाळ केलेला मराठा तरुण 'ईटीव्ही भारत'वर; म्हणाला...
  3. Maratha Reservation : मनोज जरांगे पाटलांची तब्येत खालावली, मराठा समाज आक्रमक; पाहा व्हिडिओ

Last Updated : Oct 30, 2023, 11:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.