ETV Bharat / state

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आता लोकलमध्ये आरपीएफचे 'गर्ल्स पॉवर' पथक

मुंबईच्या लोकल प्रवासात महिला प्रवाशांना बरोबर अनकेदा विनयभंग, छेडछाड, धक्काबुक्की अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे महिला सुरक्षेविषयी अनेकदा प्रश्न ऐरणीवर आले आहे. तसेच महिला प्रवाशांना लोकल प्रवास सुरक्षित आणि सुखरूप होण्यासाठी रेल्वेकडून सखी ग्रुप, दामिनी पथक, व्हाट्सअ‌ॅप ग्रुप आणि सतत सीसीटीव्ही कॅमेरांची संख्या वाढवली आहे.

mumbai local
मुंबई लोकल
author img

By

Published : Feb 20, 2021, 10:04 PM IST

मुंबई - लोकल प्रवास करणाऱ्या महिलांचा प्रवास सुरक्षित व्हावा यासाठी रेल्वेकडून अनेक प्रयोग करण्यात येत आहे. याप्रमाणेच मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्यावतीने 50 महिला कर्मचार्‍यांचे 'गर्ल्स पॉवर' पथक तयार करण्यात आले आहे. 22 फेब्रुवारीपासून हे पथक मुंबई विभागातील उपनगरीय लोकलमध्ये अचानक भेटी देणार आहे. जिथे महिला प्रवाशांच्या समस्या, तक्रारी जास्त असतील, तिथे 'गर्ल्स पॉवर'चे पथक जास्त प्रमाणात भेटी देतील, अशी माहिती मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी 'ईटीव्ही भारत'ला दिली.

50 आरपीएफ महिला जवान -

मुंबईच्या लोकल प्रवासात महिला प्रवाशांना बरोबर अनकेदा विनयभंग, छेडछाड, धक्काबुक्की अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. त्यामुळे महिला सुरक्षेविषयी अनेकदा प्रश्न ऐरणीवर आले आहे. तसेच महिला प्रवाशांना लोकल प्रवास सुरक्षित आणि सुखरूप होण्यासाठी रेल्वेकडून सखी ग्रुप, दामिनी पथक, व्हाट्सअ‌ॅप ग्रुप आणि सतत सीसीटीव्ही कॅमेरांची संख्या वाढवली आहे. आता मध्य रेल्वेच्या आरपीएफ विभागाकडून 50 महिला कर्मचाऱ्यांची 'गर्ल्स पॉवर' पथक तयार केले आहे. या पथकाचे 10 छोट्या पथकात तयार करण्यात येणार आहे.

हेही वाचा - विना मास्क लोकलमधून प्रवास करणाऱ्या 5 हजार प्रवाशांवर कारवाई

सात जणांची टीम -

मध्य रेल्वेला दिलेल्या माहितीनुसार, या 50 आरपीएफ महिला जवानांचे पथक मध्य रेल्वेच्या सीएसएमटी ते पनवेल, कर्जत, खोपोली, कसारापर्यंत अचानक भेटी देणार आहेत. महिला प्रवाशांच्या समस्या सोडविणार आहेत. सुरुवातीला पाच महिलांच्या पथकाला साहाय्य करण्यासाठी, सूचना देण्यासाठी 2 पुरुष आरपीएफ अधिकारी असणार आहेत, अशी सात जणांची टीम पाहणी दौरे करणार आहे.

या 50 महिला आरपीएफ जवानांना विशेष प्रशिक्षण -

मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त जितेंद्र श्रीवास्तव यांनी सांगितले, रेल्वे सुरक्षा दलात महिला कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. नुकतेच 50 महिला आरपीएफ जवानांची नियुक्ती झालेली आहे. त्यामुळे या महिलांचे गर्ल्स पॉवर' पथक तयार केले आहे. या पथकाला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. ज्याठिकाणी महिला समस्या, तक्रारी अधिक आहेत, तिथे हे पथक भेटी देऊन महिला प्रवाशांच्या समस्या सोडविण्याचे काम करणार आहे. तसेच महिला सुरक्षेबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.